स्फुटनिक
” डॉ.अनिल मोकाशी यांचे “स्फुटनिक “
प्रासंगिक, मिश्किल, हलका विनोद, वैज्ञानिक दृष्टिकोन, विश्लेषण आणि चारोळ्या
सिनेमावरील अनपेक्षित अभिप्राय.
समिहनच्या आजीने वीर सावरकर सिनेमा पाहून सिनेमागृहातून बाहेर पडतांना समिहनला विचारले.
समिहन (10),
या सिनेमात तुला सगळ्यात जास्त काय आवडले? क्षणाचाही विचार न करता
त्यानी उस्फूर्तपणे एका दमात उत्तर दिले.
“अच्छा किया, मुझे गिरफ्तार किया।
नही तो मैं पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर की कार बम से उडा देता ।”
आम्ही दोघे ‘सत्तरीतले आजी आजोबा'()
या अनपेक्षित धारदार उत्तराने ताडकन उडालो. अवाक झालो.
काय जाज्वल्य “फायर”, राष्ट्रप्रेम
ठासून भरलंय इतक्या कोवळ्या वयात.
समिहनला दहाव्या वर्षीच आता, सssगळे समजते. स्वतःचे मत बनवता येते.
व नेमक्या शब्दात, नेमक्या वेळी
व्यक्तही करता येते. कुणास ठाऊक कुठून येते ही क्षमता मुलांमधे !
मुलांची वैचारिक जडणघडण
“1/3 स्वतः, 1/3 कुटुंब, 1/3 समाज” या घटकांवर अवलंबून असते. असे विज्ञान सांगते.
सामिहनच्या बाबतीत तीनही घटक
समतोल प्रमाणात कार्यरत झाले असावेत.
डास सू करतो का?
डास सू करतो का?
कमोड सीटवर डास बसलेला पाहून माझ्या ४ वर्षांच्या नातीनं, कनकनं, विचारलं —
“आबा, डास सू करतो का?”
मी तिला उत्तर दिलं —
“हो. डासही सू करतो… पण आपल्यासारखी नाही.
त्याचा थेंब इतका लहान असतो
की आपल्या डोळ्यांना दिसतही नाही.”
सितारे
आमिर खान “सितारे” मे. मम्मी, मैं घर छोडके होटल रहने जा रहा हुं. क्योँ बेटा!
इतनी उम्मीद मत दिखाओ. I laughed like never before! Most appealing आयडियाची कल्पना.
तू जन्मतः सुंदर आहेस
“You are born beautiful, but your increased weight is covering up your real beauty.”
“तू जन्मतः सुंदर आहेस. पण तुझं वाढलेलं वजन तुझ्या खऱ्या सौंदर्याला झाकून टाकतं आहे.”
माशांचे काही खरे नाही
“सर्दी खोकल्याची (कॉमन कोल्ड) सर्व औषधे समुद्रात टाकली तर, मानवजातीचे कल्याण होईल,
पण माशांचे काही खरे नाही.”
एकेकाळचे सुप्रसिद्ध
परवा पुण्यामध्ये, बारामतीतल्या एकाने, पुण्यातल्या एकाला, माझी ओळख करून देताना,
हे आमचे बारामतीचे, एकेकाळचे सुप्रसिद्ध, बालरोग तज्ञ, डॉक्टर अनिल मोकाशी. अशी ओळख करून दिली.
मी मनात म्हटलं. अरे, मी तर स्वतःला वर्तमान काळातला, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ मानत होतो. मी भूतकाळात कधी गेलो, हे समजलेच नाही. असो.
बदली कामगार
आबा, हळू चालवा, पीड ब्रेकर दिसत नाही का? कनक (4). आम्ही रात्रीची चक्कर मारायला निघालो होतो. एका स्पीड ब्रेकरला गाडी जराशी उडाली. तिची बेस्ट फ्रेंड आज्जी, मागे तिच्या शेजारी बसून, पाणी पीत होती. कनकने बदली कामगार म्हणून उस्फुर्तपणे चोख काम बजावले होते.
कनकचा आबा. (76)
फुरक्या कशाला
रात्री ११ वाजता.
प्र. साडेतीन महिन्याचे बाळ आहे. सारखं फुरक्या मारतंय.
उ. त्याला रागवा. असं करत जाऊ नको म्हणावं. वा रे वा, इतक्या लहान, साडेतीन महिन्याच्या वयाला फुरक्या कशाला मारायच्या?