रामायणाच्या गोष्टी

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 6 – राक्षसांपासून रक्षणासाठी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात राम-लक्ष्मण

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! अयोध्येत सुख, समाधान, शांतता होती. बुद्धिवान, चारित्र्यवान, आणि कौशल्यवान राजपुत्र असताना, कुणाला कशाची भीती. पण हा, सुखाचा काळ, असाच राहणार नव्हता. लवकरच राज्यावर एक संकट येणार होते. एक दिवस, विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या दरबारात अचानकपणे हजर झाले. राजानी त्यांचे यथायोग्य स्वागत केले. दशरथ राजाने विश्वामित्र ऋषींना विचारले की “महाराज, आपल्या पवित्र पायाची धूळ आमच्या राजदरबारात कशासाठी आली बरे”. विश्वामित्र ऋषी म्हणाले हे राजाधिराज राक्षसांनी आमचे आयुष्य असे करून टाकले आहे. आमचा ज्ञानयज्ञ, निर्णायक टप्प्यावर आला की ही दुष्ट माणसे मोडतोड करतात, आरडा ओरडा करतात, गोंधळ घालतात, राडा करतात. राक्षस आमचा यज्ञ अपवित्र करतात. ही भुतावळ यज्ञाचा पवित्र अग्नी अशुद्ध करते. एक राजा म्हणून आम्हाला व आमच्या ज्ञानयज्ञाला संरक्षण देणे हे तुझे कर्तव्य आहे”. राजाने सांगितले, गुरुवर्य, आपण काळजी करू नका. मी सैनिक पाठवतो. आमचे सैनिक दुष्ट शक्तींचा बंदोबस्त करतील. त्यांना नष्ट करतील. विश्वामित्र म्हणाले “राक्षस खूप शक्तिशाली आणि धूर्त आहेत. सैनिकांचाच हकनाक बळी जाईल”. राजा म्हणाला, “मग आता करायचे काय. मी स्वतः येऊ का, आपल्या रक्षणासाठी?” विश्वामित्र म्हणाले, “नाही राजा, आपण स्वतः येण्याची काही गरज नाही. आपले शूर वीर पुत्र राम लक्ष्मण या दोघांना फक्त, माझ्याबरोबर पाठवा. राजा म्हणाला माझी मुलं अजून कोवळ्या वयाची आहेत. अननुभवी आहेत. राक्षसां सारख्या दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्या साठी, तयारीचे नाहीत”. राजाचे, हे शब्द ऐकून, विश्वामित्र ऋषी, रागाने ताडकन उठले, आणि म्हणाले, राजा, नाही म्हणायचे असेल, तर स्पष्ट नाही म्हण. लंगड्या सबबी सांगू नकोस. ते ताडताड, बाहेरच्या दाराकडे निघाले. आणि म्हणाले राजा रघुवंशातील राजाच्या दरबारातून ऋषींना नाराज होऊन मोकळ्या हातांनी जावे लागते हे आता आम्हाला समजले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 6 – राक्षसांपासून रक्षणासाठी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात राम-लक्ष्मण Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 5 – अयोध्येत श्रीराम परतले

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! राजपुत्रांचा रथ अयोध्येच्या जवळ येऊ लागला तसतसा नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. गावाच्या वेशीवर राजपुत्रांना डोळे भरून पाहण्यासाठी तुडुंब गर्दी जमली. ढोल, नगारे, ताशे, बिगुल, शंख, तुतार्यांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला. राजपुत्रांच्या स्वागतासाठी आयोध्येतील नागरिकांनी शहर सुशोभित केले होते. नव्या नवरी सारखे. नटवले होते. राजपुत्रांचे तेज पाहून अयोध्यावासी थक्क झाले होते. लोकांनी राजपुत्रांचा जयघोष केला. गावातल्या स्त्रियांनी त्यांना आशीर्वाद दिले. काहींनी ओवाळले तर पुरुषांनी स्वागताच्या घोषणा दिल्या. राजवाड्यात तर राजा दशरथ, राण्या, सगळे मंत्री आणि शहरातले प्रतिष्ठित नागरिक आतुरतेने राजपुत्रांची वाट पाहत होते. आल्या आल्या श्रीरामाने राजा दशरथाचे पाया पडून आशीर्वाद घेतले. राजाने त्यांना प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. राजा दशरथाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. नंतर चारीही राजपुत्र आयांच्या पाया पडले. सगळेजण, माय लेकरांच्या भावनिक पुनर्भेटीचे साक्षीदार होत होते. राण्यांनी राजपुत्रांचे औक्षण केले. त्यांना ओवाळले. दुसऱ्या दिवशी राजा दशरथांनी मुलांना राज दरबारात बोलवून घेतले. आश्रमातल्या शिक्षणाचे त्यांचे अनुभव सांगायला सांगितले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 5 – अयोध्येत श्रीराम परतले Read Post »

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 4 – श्रीरामाचे शिक्षण

श्रीराम, श्रीराम, श्रीराम! एके दिवशी, राजा दशरथाला, त्याची चारी मुले, बागेमध्ये, धनुष्यबाण खेळताना दिसली. त्याच्या लक्षात आले, की मुलांना, आता शालेय शिक्षण, द्यायला पाहिजे. मुलांना आता, वेगवेगळ्या कला, व शास्त्रे, शिकायला पाहिजे. त्यांनी लगेच, आपले मंत्री सुमंत, यांना बोलवून, राजपुत्रांना, वशिष्ठ ऋषींच्या, आश्रमात, शिक्षणासाठी पाठवण्याची, व्यवस्था करण्याचे, आदेश दिले. श्रीरामाने, विनम्रपणे, आपले वडील सांगतील, तसे आम्ही ऐकू, असे उत्तर दिले. चारी राजपुत्रांच्या, आयांची, संमती घेतली गेली. मुलांपासून, वेगळे राहण्याच्या, नुसत्या कल्पनेनेच, आयांना, धक्का बसला होता. शरीरातून, हृदय, बाहेर काढून ठेवण्याइतके, वेदनादायक, होते ते. पण मुलांना, शिक्षणासाठी, पाठवण्या वाचून, काही पर्यायच नव्हता. मुलांच्या, उज्वल भवितव्यासाठी, आणि, राजघराण्याची परंपरा, म्हणून ते, आवश्यकच होते. एक कर्तव्य म्हणून, आपल्या मुलांना, वेगळे करण्याचे दुःख, त्यांना सहन करणे, भाग होते. दुसऱ्या दिवशी, चारी राजपुत्रांना, राजा दशरथ, आणि त्याच्या राण्यांनी, जड अंत:करणाने, निरोप दिला. राजपुत्रांनी, त्यांची राजेशाही, तलम वस्त्रे, अलंकार, आभूषणे, काढून ठेवली. आश्रमात, शिक्षणासाठी जाताना, त्यांच्या अंगावर, अत्यंत साधे कपडे होते. आता ते, इतर विद्यार्थ्यांसारखे, फक्त विद्यार्थी होते. राजपुत्र नव्हते. आश्रमात, गुरु वशिष्ठांनी, आश्रमाचे नियम, त्यांना समजून सांगितले. आणि मग त्यांना प्रवेश दिला. काही वर्षातच, पवित्र ग्रंथ, आणि शहाणपणा, देणाऱ्या शिक्षणाचा, त्यांचा अभ्यास, पूर्ण झाला. वागावे कसे, जगावे कसे, हे तत्त्वज्ञान, त्यांना शिकवण्यात आले. ते राजधर्म शिकले. राज्य कसे चालवावे, हे शिकले. गुण, सद्गुण, कसे वाढवावे. आणि अवगुण, दुर्गुण कसे टाळावे, हे शिकले. सुसंस्कार, भारतीय संस्कृती, म्हणजे काय, हे शिकले. राजकारण, समाजकारण , व्यवस्थापन शिकले. चारी राजपुत्रांना, शेवटच्या परीक्षेत, अतिशय चांगले, गुण मिळाले. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 4 – श्रीरामाचे शिक्षण Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 3 – श्रीराम जन्म आणि त्याच्या बाललीला.

अखेर, बाळांच्या जन्माची, वेळ आली. राजा दशरथासह, संपूर्ण अयोध्या नगरी, आनंदात होती. भारतीय पंचांगानुसार, चैत्र नवमीला, दुपारी बारा वाजता, कौशल्या मातेच्या पोटी, श्रीरामांचा जन्म झाला. कैकेयीला एक, आणि सुमित्रा राणीला, जुळी मुलं झाली. म्हणजे, दोन मुलं झाली. चार चार राजपुत्रांच्या, आगमनाने, सगळे, आनंदाने बेभान झाले. ही, आनंदाची बातमी, घेऊन येणाऱ्या सेविकेला, राजा दशरथानी, गळ्यातला, मौल्यवान मोत्यांचा हार, बक्षीस म्हणून दिला. शहरात हत्तीवरून, साखर वाटली गेली. मिठाई वाटली गेली. प्रजेला, विविध वस्तू, भेट रूपाने, देण्यात आल्या. राजवाड्यात, आणि संपूर्ण गावात, नाच गाणी, रंगांची, अत्तरांची, फुलांची, दिव्यांची, उधळण झाली. उत्सव, साजरा करण्यात आला. तेव्हापासून, आजपर्यंत, संपूर्ण भारत देश, हजारो वर्षे, राम जन्माचा उत्सव, साजरा करत आहे. वशिष्ठ ऋषी, आणि श्रिंगी ऋषी, यांच्या सल्ल्यानुसार, चारही बाळांचे, बारसे करण्यात आले. त्यांची, नावे ठेवण्यात आली राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न. जवळजवळ, एक महिना, हा समारंभ, चालला. राजगुरूंनी यज्ञ केला. जन्मवेळेच्या, ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा, वैज्ञानिक अभ्यास करून, चारही बाळांची, कुंडली मांडली. आणि शास्त्राचा अर्थ लावून मुलांची नावे ठरवली. कौशल्येचा मोठा मुलगा प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहे. म्हणून त्याचे नाव राम असे ठेवले. कैकयीचा दुसरा मुलगा, सर्वांचे भरण पोषण करेल, म्हणून त्याचे नाव भरत असे ठेवले. सुमित्रेच्या मोठ्या मुलामधेउदात्त गुण आणि शौर्य आहे म्हणून त्याचे नाव लक्ष्मण असे ठेवले. लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रूचा कर्दनकाळ ठरेल म्हणून त्याचे नाव शत्रुघ्न असे ठेवावे. चारही राजपुत्रांचे पालन पोषण राजेशाही थाटात प्रेमाने होऊ लागले. त्यांची प्रगती पाहून सगळ्यांना आनंद होत असे. ही कथा अजून थांबलेली नाही! राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या बालपणातील अद्वितीय गोष्टी ऐकण्यासाठी आणि अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 3 – श्रीराम जन्म आणि त्याच्या बाललीला. Read Post »

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाची गोष्ट – भाग २

निराश राजा दशरथाचे दुःख मुलांनो,रामायणाच्या पहिल्या गोष्टीत आपण रामायणाची ओळख केली. आज मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे. श्रीराम, श्रीराम, श्रीराम! गोष्टीचं नाव आहे “निराश राजा दशरथाचे दुःख”. एकेकाळी, आपल्या भारतात, अयोध्या नावाचे एक भव्य शहर होते. आज आपण जे अयोध्या म्हणून ओळखतो, त्याचे नामकरण कधी फैजाबाद होते. परंतु, अयोध्येच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे, आज ती पुन्हा अयोध्या म्हणून ओळखली जाते. येथे राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्यांचा कर्तृत्व व जीवन संघर्ष साकारत होता. राजा दशरथ, जो रघुवंशी वंशातला होता, त्याला शौर्य, विद्वत्ता आणि धार्मिकतेने ओळखले जात होते. त्याच्या राज्यात सुख-समृद्धी होती, परंतु तो अत्यंत दुःखी आणि निराश होता. कारण त्याला, तिन्ही राण्यांसोबत असूनही, पुत्रांचा आशीर्वाद प्राप्त झाला नव्हता. दशरथ राजाच्या दुःखाची कथा, आणि त्याला या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न, हे आपल्याला आज ऐकायचं आहे. पुत्रकामेष्ठी यज्ञ आणि त्याद्वारे त्याला प्राप्त झालेली आशीर्वादांची खीर, हे सर्व कसे घडले, हे जाणून घेण्यासाठी कृपया युट्यूबवर जाऊन हा व्हिडीओ पहा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्ट – भाग २ Read Post »

Dr. Anil mokashi telling stories to children

रामायणाची गोष्टी – भाग १

रामायणाची ओळख मुलांनो, आजपासून दररोज मी तुम्हाला रामायणाची एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट फक्त पाच मिनिटांची असेल, आणि तुम्हाला ती माझ्या मागोमाग म्हणायची आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीराम भारतामध्ये होऊन गेले. राम हा तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता. राजा दशरथ यांचा मुलगा होता. पण तो सर्वोत्तम माणूस होता. पुरुषोत्तम होता. म्हणजे उत्तम पुरुष होता. लहानपणी तो तुमच्यासारखाच लहान मुलगा दिसायचा. पण त्याच्या अंगात खूप चांगले गुण होते. तो सुसंस्कारी होता. विश्वामित्र ऋषींसोबत जंगलात जाऊन त्यांनी राक्षसांचा नायनाट केला. विश्वमित्र ऋषीं सोबत नेपाळमधील जनकपुरी या गावी जाताना त्यांनी अहिल्येचा उद्धार केला. एका शापामुळे अहिल्येचा दगड झाला होता. रामानी त्या दगडाला हात लावल्या लावल्या अहिल्या प्रकट झाली . रामानी स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडून सीतेशी लग्न केले. रामाचे लहान भाऊ लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचे सुद्धा सीतेच्या लहान बहिणींशी लग्न झाले. अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला. रामाला 14 वर्षे वनवास सहन करावा लागला. सोनेरी हरणाचा पाठलाग करता करता दुष्ट व राक्षस रावणाने सीतेचे अपहरण केले. सीतेला पळवून नेले. सीतेला सोडवून आणण्यासाठी राम श्रीलंकेत गेला. या मोहिमेमध्ये जटायूचा मृत्यू झाला. त्यांनी सुग्रीवाशी हात मिळवणी केली. आणि वालीला मारले. समुद्र ओलांडला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला मारले. हनुमानाच्या मदतीने श्रीलंकेला आग लावली आणि सीतेची कैदेतून सुटका करून आयोध्येत परत आणले. अशा अनेक गोष्टी आणि घटनांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. तेथे तुम्हाला रामायणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांसोबत इतर महत्त्वाच्या गोष्टी ऐकायला मिळतील. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्टी – भाग १ Read Post »

Scroll to Top