Child Growth and Development

Maharana Pratap

महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – महाराणा प्रताप: स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा. महाराणा प्रतापसिंह सिसोदिया! मेवाडचा पराक्रमी राजा! शिवाजी महाराजांच्या शंभर वर्षे आधी महाराणा प्रताप होऊन गेले. महाराणा प्रताप यांनी अकबराशी संघर्ष केला. शिवाजी महाराजांनी अकबराचा नातू औरंगजेब याच्याशी संघर्ष केला. राणा प्रतापाने स्वाभिमानाची ज्योत पेटवली, आणि शिवाजी महाराजांनी त्या ज्योतीला स्वराज्याचं रूप दिलं. महाराणा प्रताप याच राज्य अरावलीच्या डोंगररांगांमध्ये हिरवाईनी, किल्ल्यांनी, आणि शूर लोकांनी भरलेलं होतं. दिल्लीचा बादशहा अकबर सगळं भारतभर आपलं साम्राज्य पसरवत होता. अकबर म्हणाला, “राणा, माझा मांडलिक हो, माझ्या दरबारात येऊन कुर्नीसात कर.” पण स्वाभिमानी राणा प्रतापने ठाम उत्तर दिलं –“मी माझ्या मातृभूमीचा राजा आहे. मी कोणाचा गुलाम होऊ शकत नाही!” अकबर मोठी फौज घेऊन आला. हल्दीघाटीचं युद्ध झालं! राणा प्रतापाच्या घोड्याचं नाव होतं चेतक. पांढरा शुभ्र, उमदा. राणा प्रतापाच्या तलवारी सारखा लखलखीत. शत्रूही घाबरायचे! पण लढाई असमान होती. राणाला जंगलात माघार घ्यावी लागली. तो हारला नाही! जंगलात, पर्वतावर, झोपडीत राहून त्याने पुन्हा सेना तयार केली. आपल्या प्रजेला वाचवलं. आपल्या मातीचा अभिमान जपला. तो सोन्याच्या थाळीत जेवला नाही. त्यानी बांबूच्या वाटीतून मुलांसोबत भाकरी खाल्ली. तो स्वाभिमानाचा राजा होता! जिंकणं म्हणजे नेहमी सिंहासन मिळवणं नाही. जिंकणं म्हणजे मनातला स्वाभिमान न गमावणं! राणा प्रताप यांनी भारताला “स्वराज्य” आणि “संघर्ष” शिकवला. “राणा का प्रताप अमर है, स्वाभिमान की ज्योति प्रखर है।” महाराणा ना होते, महाराणा ना होते, ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. महाराणा प्रताप की जय.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा Read Post »

संत तुकाराम म्हणजे भक्ती

संत तुकाराम म्हणजे भक्ती. भारतीय इतिहासाच्या गोष्टी. देहूचे संत तुकाराम म्हणजे भक्ती. संत तुकाराम म्हणजे अभंग. तुकारामाची पालखी. पालखी मार्ग. भक्तीचा मार्ग. पंढरपूरची वारी. चालत चालत. अभंग गात. जे का रंजले गांजलेत्यांसी म्हणे जो आपुलेतोची साधू ओळखावादेव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवातोची मुंगी साखरेचा रवा.लहान वयातच देवावर प्रेम करायला सुरुवात करा. ऐरावत रत्न थोरत्यासी अंकुशाचा मारजया अंगी मोठेपणतया यातना कठीण मोले घातले रडायानाही आसू नाही मायाऐसा भक्तीवेड कायरंग बेगडीचा न्यारा पांढऱ्या शुभ्र कापसाच्या फुलावर कुठलाच मळकट रंग नसतो. भक्तीचं वेड असलेल्या माणसाचं मन साफ आणि सुंदर असतं. पांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंग बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलकरावा विठ्ठल, जिवभावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल संत तुकाराम महाराज की जयपंढरीनाथ महाराज की जयएकनाथ महाराज की जयनामदेव महाराज की जयज्ञानेश्वर महाराज की जय जय महाराष्ट्रजय हिंदभारतमाता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

संत तुकाराम म्हणजे भक्ती Read Post »

Sant Eknath

पैठणचे संत एकनाथ महाराज

पैठणचे संत एकनाथ महाराज – 10 भारतीय इतिहासाच्या गोष्टी महाराष्ट्राची संतपरंपरा खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, त्यानंतर सोळाव्या शतकातील तेजस्वी संत. एकनाथ महाराज. आणि मग आले तुकाराम महाराज. त्या काळात लोकांच्या मनात जातपात, भेदभाव आणि अन्याय खोलवर रुतलेले होते. पैठणचे संत एकनाथ महाराज विठोबाचे मोठे भक्त होते. त्यांची शिकवण होती – सगळ्यांना आपले मानावे. एकदा काय झाले?गोदावरी नदीच्या घाटावर संत एकनाथ स्नानाला गेले होते. वाटेत एक खोडकर माणूस उभा राहिला. त्याने घरातले घाण पाणी एकनाथांच्या अंगावर फेकले. संत काही न रागवता पुन्हा स्नानाला गेले. तो पुन्हा पुन्हा तसेच करीत राहिला. अनेक वेळा हे घडले. शेवटी संत एकनाथ हसून म्हणाले –“बरे झाले! माझ्या मुळे तुझ्या घरातले सगळे घाण पाणी संपले. बघ, माझा तुला उपयोगच झाला.” हे ऐकताच तो दुष्ट खजील झाला. येऊन एकनाथांच्या पायांशी पडला. संतांच्या क्षमाभावाने आणि सहनशीलतेने त्याचे मन उजळले. संत एकनाथ म्हणतात –“एका जनार्दनी नाम घेऊनी । सुखेचि सुखे भोगावे ॥” ते पुढे एकनाथी भागवत लिहितात. लोक म्हणतात –“एकनाथी भागवत वाचलं की, मन शांत होतं, आनंदी होतं, आणि भांडणं कमी होतात.” आपण गातो ती दत्ताची आरती“त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा” ही सुद्धा संत एकनाथांनीच लिहिली आहे. श्री संत एकनाथ महाराज की जय!जय महाराष्ट्र!भारत माता की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पैठणचे संत एकनाथ महाराज Read Post »

गोष्ट संत नामदेव महाराजांची

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. 9 संत नामदेव महाराज यांची गोष्ट. भारतीय इतिहासात महाराष्ट्राची संतपरंपरा खूप महत्त्वाची आहे. संत नामदेव महाराज यांची गोष्ट त्यातले एक तेजस्वी पान आहे.संत नामदेव यांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग निवडला.पंढरपूरच्या वारीने हे महत्त्व आजही टिकून आहे. – संत नामदेवानी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. भक्ती लोकांपर्यंत नेली. विठ्ठल भक्तीचे घर बांधले. तर तुकाराम महाराजांनी त्या भक्तीच्या परंपरेचा कळस चढवला. अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला तेज दिलं. 2.“सत्य सोडून देऊ नये.” नामदेव म्हणतात, खोटं बोलणं म्हणजे देवापासून दूर जाणं. शाळेत, घरी, मित्रांत – सत्याला धरून राहा. नेहमी खरे बोला. 3.“सर्वत्र विठोबा आहे.” प्रत्येक माणसात देव आहे. सर्वांशी नीट वागावे. फक्त देवळात जाऊन प्रार्थना नाही, तर रोजच्या वागण्यात दयाळूपणा, मदत, चांगुलपणा — हाच खरा देव. नामदेव सांगतात, गरजेपुरतं घेतलं की समाधान मिळतं. जास्तीचा लोभ शेवटी त्रास देतो. “दोन पेढे छान, पण दोन किलो खाल्ले तर?” दोन जिलब्या छान पण दोन किलो खाल्ल्या तर. गरजे पुरतं घेतलं की समाधान मिळतं. “श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.श्री संत नामदेव महाराज की जय.श्री संत एकनाथ महाराज की जय.”जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गोष्ट संत नामदेव महाराजांची Read Post »

Sant-Dnyaneshwar

पसायदानाचा आजच्या काळातील अर्थ

मूळ पद्य सोप्या मराठीत अर्थ आतां विश्वात्मकें देवें ।येणें वाग्यज्ञें तोषावें ।तोषोनि मज द्यावें ।पसायदान हें ॥ १ ॥ आता साऱ्या जगाच्या देवाने,माझ्या कवितेने प्रसन्न व्हावे,प्रसन्न होऊनि मज द्यावे,आनंदाचे कृपादान हे. जे खळांची व्यंकटी सांडो ।तयां सत्कर्मीं रती वाढो ।भूतां परस्परें जडो।मैत्र जीवांचें ॥ २ ॥ वाईट सवयी दूर जाव्या,चांगुलपणाला बळ यावं,प्रेम-मैत्रीने जग उजळावं,सगळे जीव मित्र व्हावेत. दुरिताचें तिमिर जावो ।विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।जो जें वांच्छील तो तें लाहो ।प्राणिजात ॥ ३ ॥ वाईटाचा अंधार जावो,चांगल्याचा प्रकाश येवो,जे ज्याला हवे ते मिळो,सर्व सजीवांना. वर्षत सकळमंगळीं ।ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।अनवरत भूमंडळीं ।भेटतु या भूतां ॥ ४ ॥ सगळीकडे शुभ घडो,चांगल्या मनाचे लोक वाढो,जगात वाईट कमी राहो,सर्वांना भेटो प्रेमळ माणसं. चलां कल्पतरूंचे आरव ।चेतना चिंतामणीचें गाव ।बोलते जे अर्णव ।पीयूषाचे ॥ ५ ॥ चला जादूच्या बागेत जाऊ,प्रेरणेच्या गावी जाऊ,जेथे गातो गोड समुद्र,अमृताची गाणी. चंद्रमे जे अलांछन ।मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन ।सोयरे होतु ॥ ६ ॥ चंद्रासारखे डाग नसलेले,सूर्यासारखा ताप नसलेले,अशा चांगल्या मनाचे सोबती,सर्वांना नेहमी मिळोत. किंबहुना सर्वसुखीं ।पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।भजिजो आदिपुरुखीं ।अखंडित ॥ ७ ॥ सगळीकडे आनंद राहो,सुखाचा वर्षाव होवो,महात्म्यांचे गुण गाओ,नेहमी आठवण ठेवू दे. आणि ग्रंथोपजीविये ।विशेषीं लोकीं इयें ।दृष्टादृष्ट विजयें ।होआवें जी ॥ ८ ॥ पुस्तकांच्या साथीत मला वाढू दे,अभ्यासात माझे नाव उजळू दे,दृश्य, अदृश्य अडचणींवर,नेहमी मला विजय मिळू दे. येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो ।हा होईल दानपसावो ।येणें वरें ज्ञानदेवो ।सुखिया झाला ॥ ९ ॥ जगाच्या पालनकर्ता देवा,हेच माझं गोड मागणं देवा,इच्छा पूर्ण झाल्याने देवा,माऊली आनंदी झाला. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पसायदानाचा आजच्या काळातील अर्थ Read Post »

Pandharpur vari

वारी निघाली पंढरपूरला, भक्तीच्या सुंदर वाटेला

भारतीय इतिहासाच्या गोष्टी- 7 वारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल!ज्ञानोबा माऊली, तुकाराम!पंढरीनाथ महाराज की जय! वारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला,पावले पडती ठेक्यालाहाती ताल, टाळ-मृदंगाला.वारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला, चंद्रकोरी वळण भीमेला,म्हणती चंद्रभागा नदीला,वारी येते आषाढीला,सारा आनंद लागे, चालायलावारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला, तुका म्हणे वारी, म्हणजे शाळा,भक्ती, सेवा, समानता पाळा.नाही कोणी मोठा, नाही लहान,एक समान सारे, वारकरी महानवारी निघाली, पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर, वाटेला, गळ्यात माळ, मुखात नाम,हाती दिंडी, ओठी ओवी गान.नाही दर्प, नाही अहंकार,विठोबा सोबत, ध्यान वाटे वर.वारी निघाली, पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर, वाटेला, तीन पिढ्या चालती, एकत्रआजोबा पिता, आणि पुत्रवारीत उत्साह, संचारे सर्वत्रउरे आनंदाची, गोडी पवित्रवारी निघाली, पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर, वाटेला, विठोबा चाले रूपात, माणसाच्या,असेल का हो तो, सोबतच्या.मी ही नमतो, तो ही नमतो,हसतो तो विठ्ठलच, तो हसतो!वारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला, वारी म्हणजे, मनाचे मंदिर,वारी माणुसकीचे, अंत रंग.वारीत चालणं म्हणजे, भारत जपणं,वारीत विठोबा म्हणजे, आपण सर्व ज ण!वारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला, नामदेव म्हणती, स्वा नुभ व, जन्माला यावं चालत, पंढरपूरला जा वं!वारी निघाली पंढरपूरला,भक्तीच्या सुंदर वाटेला, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल!ज्ञानोबा माऊली, तुकाराम!पंढरीनाथ महाराज की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

वारी निघाली पंढरपूरला, भक्तीच्या सुंदर वाटेला Read Post »

Joyful boy celebrating a soccer win outdoors in Portugal.

प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती

#45 प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती आहे मित्रांनो, तुम्ही दैदिप्यमान, यशवंत, कर्तृत्ववान, आहातच. ते तर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले आहेच. आता लक्ष घालावे, स्वतः सज्जन होण्यावर.जागरुक, विश्वासार्ह, कामाचा माणूस बनण्यावर. ॥ १ ॥ नवीन काहीही, निर्माण करायचे असेलतर नव निर्मात्याला, कष्ट, त्रास हे होणारचनिर्मितीला अचानक, अडकाठी आली तरमुकाट्याने ती, सहनही करावी लागणारजन्माच्या आधी, फुलपाखरू तयार होणारअंड्याच्या कठीण कवचाच्या, कोंडवड्यातचअशा कठीण परिस्थितीत, परीक्षेच्या काळीजाणीवपूर्वक, विनयाने वागा, अशा वेळी ॥ २ ॥ ज्याच्या जे मनात,तसे प्रत्यक्षात घडणारनैराश्यग्रस्त मनात,आनंद कसा येणारउत्साही माणसाला,जग रंगीत दिसणारउदासीन माणसात,उत्साह कुठून येणार ॥ ३ ॥ आधी स्वतःची, स्वतःवर, जबाबदारी घ्यावीनंतर इतरांची, समाजाची, जगाची घ्यावीआपले यश कष्टाने, आपणच मिळवावेदुस-या कुणी, का, आयते पदरात टाकावेआत्मविश्वासाने भीड, हाती घेतल्या कामाला‘हे तर मी सहज करेन’, ध्येय असायला ॥ ४ ॥ ध्येयाच्या आड येतात, अनेक मोह मायावीवेळीच ‘नाही’ म्हणायची, धमक मात्र हवीज्ञानाच्या प्रकाशात, जो उजळून तळपतोअज्ञानाचा अंधार, तो मनात कुठे उरतोअशा स्वयंप्रकाशी व प्रेरित व्यक्तिमत्त्वालाकोण येणार नाही, आदराने सुस्वागताला ॥ ५ ॥ तरुणाईच्या उर्मी, उर्जेत, जोशाच्या काळात,सर्वांना अपार कष्टच, करावे लागतातनुसती रिकामी, दिवास्वप्नंच जे बघणार,अशांचा कधी, कुणाचा, झाला आहे बेडा पारज्याचा स्वतःवर अटळ असा विश्वास आहे,त्यालाच ठरवेल ते करता येणार आहे ॥ ६ ॥ शिकायचेच आहे, त्याला अडचण नसतेइच्छा व प्रयत्नांना हमखास यश मिळतेकष्टाने, नेमलेला अभ्यास, संपूर्ण करावाएकचित्ताने समर्पित होऊन तो करावाहाती काम आणि डोकी ज्ञान, अभाग्या मिळेनामाणूस का म्हणावे, त्याला जनावर म्हणाना ॥ ७ ॥ जगात संस्कारी, आदर्श माणसे असतातत्यांच्या संपर्कात राहून, जपा आपले हितगुणी लोकांकडे शिका, त्यांना आनंद होईलत्यांचे आचार विचार, सर्वांचे भले करेलतन, मन, धन, सर्वस्व, कामात झोकून द्याआपल्या कर्तृत्वाचा फायदा, सर्वांना होऊ द्या ॥ ८ ॥ लहानपणी, कौशल्य व ज्ञान, कसे असेलवडिलांच्या जबाबदा–या, कशा पेलवतीलशिस्तबद्ध, अभ्यास करा, काम करा, कष्टानेवेळीच, गुरु येई, मार्ग दाखवाया नेटानेमनापासून, निष्ठेने,धरा शिक्षणाची, आसकधी येणार नाही, अपयश ते, आसपास ॥ ९ ॥ आवडते काम, जो मन लावून करणारआयुष्यभर यशस्वी, सुखी व धन्य होणारजितकं सखोल ज्ञान, आणि प्राविण्य, मिळालंस्थळ, काळ, वेळ, भानच सगळं हरपलंतहान भूक हरपून, विसरा राग लोभामन तरंगायला लागेल आनंदाचे डोहा ॥ १० ॥ पंचेंद्रिये, जगाची ओळख, मेंदूला देतातचूक काय, बरोबर काय, माहिती देतातज्ञानाची, जिज्ञासा, निर्माणच, करावी लागतेआजची, गरज बघून, मिळवावी लागतेधैर्याचे पुढचे पाऊल, यशो शिखरी पोचेचणे खावे लोखंडाचे, तेंव्हा ब्रम्हपदी नाचे ॥ ११ ॥ चौकसपणाने, कणाकणाने, ज्ञान वेचावेमौल्यवान आयुष्य, ज्ञानाविना, वाया, न जावेमनाला, हळूहळू, योग्य वळण, लागणारउजळणीने, दडलेला अर्थ, उमजणारसज्जनांच्या, संगतीतच, खरी, समज येतेलोखंडाचेही, परिसाच्या स्पर्शाने, सोने होते ॥ १२ ॥ पुस्तकी ज्ञानाने, जगाची ओळख, होत नाहीकेल्याने, जे होत आहे, ज्ञानाने ते, होत नाहीगाईड वाचून, शिकण्याचा मार्ग, खरा नाही‘दहा दिसात, फाडफाड इंग्लिश,’ खरे नाहीशिकायचे असेल, तर, पाठ्य पुस्तक हवेशिक्षकाचे, बोट धरूनच, चालायला हवे ॥ १३ ॥ पळा, पळा, कोण पुढे पळे, तो धापा टाकेलयश मिळाल्यावर, त्याला, ‘ग’ ची, बाधा होईलस्वतःला कधी, ‘सर्वशक्तिमान’, समजू नयेसामाजिक जाणीवेने, व्यवहार करणारेहिंमत वाढवाया, साथीला, असलेले बरे ॥ १४ ॥ माहितीच्या शस्त्राने, लुबाडणूक बरी नाहीज्ञानाचा दुरूपयोग, शिक्षणाचे ध्येय नाहीखरे शिक्षण, हे, योग्य वागायला, शिकवतेचांगले शिक्षण, हे, स्वनियंत्रण शिकवतेमिळाल्या, शिक्षणाचा, सर्वांना, उपयोग व्हावाअसा उपक्रम, हाती घ्यावा, पूर्णत्वास न्यावा ॥ १५ ॥ आपल्या आवाक्या, बाहेरही, गोष्टी घडणारबना आपण, आपल्या जीवनाचा, शिल्पकारस्वतःची यशोगाथा, स्वतःच हवी, लिहायलादुस-यावर विसंबला, कार्यभाग बुडाला ॥ १६ ॥ धरतीवर, जमिनीखाली, आणि आकाशातज्ञानाची भांडारे, भरली आहेत, काठोकाठत्याची रहस्ये, गुरूशिवाय, कुणा समजेनापण आजकाल, गुरूला, कुणीच, विचारेनाशिक्षक प्रसन्न झाला, तरच ज्ञान मिळेलतो शिकण्याचे, अनेक, छान मार्ग, शिकवेल ॥ १७ ॥ जग चालवणारा, लाखोंचा पोशिंदा, तो कोणसृष्टी, सचेतन करणारा, आहे तरी, कोणमनाच्या आतली, प्रेरणा, ती कुणाला, दिसेनास्फूर्ती देणारी भावना, ओळखायला येईनाप्रेरणा, ही, चांगल्या कामामागची, शक्ती आहेतिची, जोपासना करणेही, गरजेचे आहेजग काय म्हणेल, याची, उगा चिंता, सोडावीमनातले ऐकून, आनंदाची, वाट धरावी ॥ १८ ॥ यशस्वी विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती Read Post »

Stages of Child growth illustration

बालपणाचे विज्ञान 1

#31 1) बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा. २). जुलाब, डीहायड्रेशन, पाणी १) अंगावर पाजा २) गोवर लस द्या. ३) संडासचा वापर करा. ४) अन्न व पाणी स्वच्छ ठेवा. ५) हात धुवून अन्नाला स्पर्श करा. ६) माशांचा नायनाट करा. 3) फक्त स्तनपान काही आयांना मदतीचा हात लागतो. अंगावरचे दूध नैसर्गिकपणे सुटते. दुध वाढवण॒यासाठी नैसर्गिक मार्ग वापरा.अंगावरचे दुध वाढवणा-या गोष्टी १) वारंवार चोखणे२) वारंवार रिकामे करणे३) चांगला आहार४) कमी काळजी. १.पान्हा फुटतो.२.वजन वाढते ३.बाळ छान झोपते.४.सात आठ वेळा संडास होते.५.दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा लघवी होते. 4) बाटली पुतनामावशी आहे. 5) वरचे दूध नको. 6) मुलांना अन्न लागते. १)  दोन वर्ष अंगावर पाजा.२) सहाव्या महिन्याला कांजी द्या.३) कांजित प्रथिने घाला.४) कांजित फळे किंवा भाजी घाला.५) दिवसातून चार वेळा कांजी द्या.६) आजारी बाळाला अन्न द्या. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 1 Read Post »

A-doctor-in-a-white-coat-is-performing-a-medical-checkup-on-a-sleeping-child-lying-on-a-medical-examination-table.-

Prolonged Expiratory Time in Children – A Sign of Bronchospasm?

#27 Observing a child’s breathing pattern can reveal crucial signs of respiratory issues. One such important indicator is prolonged expiratory time. If a child’s expiration lasts significantly longer than inspiration, leading to an Inspiratory-Expiratory (I:E) ratio of 1:3 or more, it may suggest bronchospasm. Why Does This Happen? In normal breathing, expiration is usually longer than inspiration, maintaining an I:E ratio of around 1:2. However, in conditions like asthma, bronchiolitis, or any airway obstruction, the airways become narrowed, increasing resistance and making it harder for air to exit the lungs. This results in: ✅ Prolonged expiratory phase✅ Wheezing, especially during expiration✅ Increased respiratory effort✅ Air trapping and hyperinflation of the lungs When Should Parents and Doctors Be Concerned? If a child exhibits signs of difficulty in breathing, wheezing, or if their expiration appears significantly prolonged, it is crucial to evaluate for conditions like asthma or bronchiolitis. Early detection and management can prevent complications and ensure better respiratory health. Breathing patterns tell us a lot—if we listen carefully, we can diagnose early and act swiftly! – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Prolonged Expiratory Time in Children – A Sign of Bronchospasm? Read Post »

Tuberculosis in children

या बाळाला टी.बी. तर नसेल ना ? शंका कधी घ्यावी ?

#24 लहान मुलांमध्ये टी.बी. (क्षयरोग) ओळखणे कठीण असते. बाळ खूप आजारी होईपर्यंत लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते. जुनाट संसर्ग आणि मुलाच्या वाढीतील अडथळा यावरून टी.बी.चा संशय घ्यावा लागतो. प्रतिकारशक्ती कशी आहे, यावर बऱ्याच लक्षणांचे स्वरूप अवलंबून असते. लहान मुलांमध्ये टी.बी. कशी होते? टी.बी.चे जंतू मोठ्या माणसांमधून लहान मुलांमध्ये संक्रमित होतात. परंतु, सगळीच मुले आजारी पडत नाहीत. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, ती मुलं टी.बी.च्या जंतूंशी लढू शकतात आणि निरोगी राहतात. प्रतिकारशक्ती कमी असल्यास टी.बी. जंतू हळूहळू शरीरात पसरतात, फुफ्फुस आणि लिम्फ नोड्समध्ये संक्रमण वाढते, आणि मग मुलं आजारी पडतात. पालकांना शंका कधी घ्यावी? लहान मुलांमधील टी.बी.चे निदान मुख्यतः संशयावर आधारित असते. संशय घेण्यास मदत करणाऱ्या 10 मार्गांपैकी पहिले चार लक्षणे वारंवार दिसतात, तर उर्वरित सहा क्वचितच दिसतात. वारंवार आढळणारी चार लक्षणे क्वचित आढळणारी सहा लक्षणे टी.बी. ओळखण्यासाठी काय करावे? वरील लक्षणांवरून संशय येत असेल तर त्वरित बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या. टी.बी.चे निदान आणि उपचार लवकर सुरू केल्यास मुलाला गंभीर परिणामांपासून वाचवता येते. निष्कर्ष लहान मुलांमधील टी.बी.चे निदान करण्यासाठी वेळीच संशय घेणे आणि योग्य उपचार सुरू करणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घ्या, कारण योग्य माहितीमुळे बाळाचे आरोग्य चांगले राखता येते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

या बाळाला टी.बी. तर नसेल ना ? शंका कधी घ्यावी ? Read Post »

Helping Children Cope with Stress – Practical Support Strategies

#17 Childhood may seem like a simple time, but even young children face pressures that can lead to stress. The good news is that with understanding and the right strategies, caregivers can help children manage these feelings. From quality time to open communication, there are numerous ways to support children in developing resilience and coping skills. Here are some practical approaches that can make a big difference. Quality Time: Your Presence Matters More Than You Know Children find comfort in the presence of trusted adults. Taking time to connect with them individually not only strengthens the bond but also provides a safe space for them to share their feelings. It can be as simple as playing a game together, reading a book, or going for a walk. This time reassures them that they are loved and supported. Listening without judgment and being responsive to their concerns helps children feel heard. If they seem reluctant to talk, gentle encouragement often helps. Sometimes, children communicate their stress through behavior rather than words, so it’s crucial to be attentive to any changes in their habits or mood. Encouraging Open Conversations About Emotions Children need to know that it’s okay to talk about their worries. Encourage open conversations by letting them know it’s natural to feel scared, sad, or frustrated. This openness creates an environment where they feel safe expressing themselves without fear of being judged or misunderstood. Talking about feelings can make emotions more manageable. It also teaches children a lifelong skill: the ability to name, understand, and cope with their emotions. Simple reassurance can go a long way in helping them navigate these feelings. Providing Routine and Stability Children feel more secure with a consistent daily routine. Knowing what to expect each day gives them a sense of control, which can reduce feelings of anxiety. When changes are necessary, explaining them in a way they can understand can ease their adjustment. Alongside routine, limiting exposure to distressing media is essential. News stories about disasters, accidents, or violence can be very troubling for children. Monitor what they watch and explain things in a way that helps them feel safe. Answer their questions calmly and avoid exposing them to more detail than necessary. Seeking Professional Support When Needed If your child’s stress seems to persist, or if they are struggling in school or at home, it’s helpful to consult a counselor, teacher, or mental health professional. Persistent stress can impact a child’s well-being and development, so don’t hesitate to seek help if needed. The well-being of children should be a priority. Taking these small steps to address their stress and show them that their concerns matter creates a positive impact on their mental and emotional health. Every child deserves the reassurance that they are not alone and that help is available whenever they need it. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Helping Children Cope with Stress – Practical Support Strategies Read Post »

Childhood Stress

Recognizing Stress in Children – From Newborns to School Age

#16 When we think of childhood, we imagine a carefree time full of happiness and play. As adults, it’s easy to overlook that children experience their own kinds of stress—even babies have their own challenges. Just like adults, children’s stress responses are unique to their age and environment. Recognizing these signs and understanding the root of their worries helps us support them as they navigate these emotions. Stress in Newborns and Babies: An Early Start to Anxiety Yes, it’s true—even babies experience stress. Though they can’t express it in words, they feel anxiety due to various factors, like separation from their mother, overstimulation, hunger, or discomfort. Newborns are deeply sensitive to their surroundings and can even sense tension or stress from their caregivers. Since they cannot communicate through language, crying becomes their way of expressing these feelings. Creating a predictable and soothing environment with consistent routines, gentle touch, and calm surroundings can work wonders for a baby’s sense of safety. It may surprise you, but babies have a keen awareness of the world around them. They respond to the security and calm provided by those closest to them. Everyday Stressors for Toddlers and Preschoolers As children grow, their concerns shift along with their age. Toddlers and preschoolers often feel stress around separation from their parents or primary caregivers, particularly in new settings or at the beginning of school. Additionally, exposure to loud sounds, chaotic environments, or constant change can leave them feeling overstimulated or uneasy. It’s important for caregivers to recognize that what may seem insignificant to an adult can be overwhelming for a young child. Acknowledge their feelings, provide calm reassurance, and help them ease into new situations at their own pace. Small steps like talking them through the day’s plan or letting them know you’ll be there soon can help make a difference. Older Children: Stress in the School Years For older children, especially school-aged kids, stress takes on a new form. Academic pressures, the desire to fit in with peers, or a busy schedule of extracurricular activities can contribute to their stress. If a child’s schedule becomes too packed, they may start to show signs of burnout. Some children might complain of feeling “too busy” or may begin resisting certain activities. At home, they may show more signs of frustration, defiance, or become more withdrawn. It’s also worth noting that kids pick up on adult stress. They notice conversations about work, financial struggles, or family conflicts. Even news stories they see on TV about accidents or disasters can make them worry about safety. Providing a calm, stable atmosphere and a reliable routine at home can offer significant support. Recognizing and acknowledging a child’s stress is the first step toward helping them cope. A little attention and reassurance go a long way in helping children manage these complex feelings. In my next post, we’ll talk about ways to help children cope with stress in a healthy and effective way. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Recognizing Stress in Children – From Newborns to School Age Read Post »

Scroll to Top