Marathi

Care of the disabled abstract concept vector illustration. Disability care, downs syndrome, senior on wheelchair, help for old people, professional home nursing services abstract metaphor.

माझ्या स्वप्नातले अपंग शिक्षण

मित्रांनो, आपण सगळे मिळून एक विशेष शाळा चालवत आहोत. आपल्याकडे अपंग विद्यार्थी आहेत, तज्ञ शिक्षक आहेत, भक्कम इमारती आणि शैक्षणिक साधने आहेत. हे सर्व मिळून आपली शाळा आदर्श ठरते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातसुद्धा आपल्या शाळेचा उल्लेख सन्मानाने होतो. तरीही, माझ्या मनात एक वेगळेच स्वप्न आहे – एक अशी शाळा, जिथे केवळ शरीर नाही तर त्याला आत्माही आहे. आजची आपली शाळा जशी आहे, तिला शरीर आहे; पण मला जसा आत्मा अपेक्षित आहे, तो अजून येणे बाकी आहे. तो आत्मा कुठे आहे? तो आहे उपचारात्मक, अनुभवात्मक आणि भावनिक शिक्षण या गोष्टींमध्ये. माझ्या स्वप्नातील शाळेत काय असावे? माझ्या दृष्टीने एक संपूर्ण, आत्म्याने भरलेली अपंग शाळा ही खालील गोष्टींनी समृद्ध असावी: या सगळ्या बाबी शाळेच्या वेळापत्रकाचा भाग असाव्यात. दररोज १५–१५ मिनिटांचा वेळ या उपक्रमांसाठी राखून ठेवला गेला, तर ही शाळा माझ्या स्वप्नातली शाळा ठरेल. योगोपचार योग म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून शरीराच्या हळुवार हालचालींचा अभ्यास.प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या गरजेनुसार योगासनांचा सराव शाळेत रोज १५ मिनिटे सहज करता येतो. “पुस्तक वाचून किंवा कॅसेट ऐकून योग शिकता येत नाही; त्यासाठी तज्ञ शिक्षक हवा.” योगामुळे: संगीत उपचार संगीत हे सर्वांनाच आवडते – विशेष मुलांनाही!त्यात सूर, लय, ताल, भावभावना, गायन, वादन, भेंड्या, आणि खेळ असतो. संगीत शिक्षणातून: नृत्य व नाट्य उपचार नृत्य हे केवळ एक कला नाही, तर ते उपचारही आहे.संगीताच्या तालावर नृत्य करताना: पाळीव प्राणी – पेट थेरपी पाळीव प्राणी म्हणजे मुलांचा विश्वासू मित्र.त्यांच्यासोबत खेळताना: बागकाम बागकाम म्हणजे सर्जनशील, शारीरिक आणि संवेदनात्मक अनुभवाचं एक माध्यम. त्यातून: बिया पेरणे, रोपे वाढवणे, झाडांना पाणी देणे, स्वच्छता राखणे, फळे-फुले तोडणे, आणि त्यावरून कलात्मक वस्तू बनवणे – हे सर्व बागकामाचे भाग असावेत. प्लेथेरपी, आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट खेळ आणि कला हे केवळ मनोरंजन नाही, तर मुलांच्या संपूर्ण विकासासाठी महत्त्वाचे घटक आहेत. व्यवसायपूर्व शिक्षण (Pre-Vocational Training) कामासाठी मानसिक व शारीरिक तयारी शाळेतच सुरु व्हावी. यात शिकवायचे: व्यवसाय शिक्षण (Vocational Training) १६–१८ वयानंतर, विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीच्या किंवा क्षमतेच्या व्यवसायात प्रशिक्षित करणे. सरकारी धोरणानुसार: या गोष्टी आपण सुरु करणार आहोत. निष्कर्ष माझ्या स्वप्नातली अपंग शाळा म्हणजे अशी शाळा – जिथे शिक्षणासोबत मुलांना जगण्याचे, स्वतःला व्यक्त करण्याचे, आणि आत्मनिर्भर होण्याचे बळ मिळते. आपण सर्व मिळून ही शाळा आत्म्यासह उभी करूया.हीच माझी भावना. हेच माझं स्वप्न. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

माझ्या स्वप्नातले अपंग शिक्षण Read Post »

Good Senior Couple

गोष्ट आम्हा दोघांची

जगावेगळ्या माणसाची आणि जगावेगळ्या लेखकाची ओळखसुद्धा जगाववेगळीच असायला हवी. नाही का? मी स्वतःबद्दल प्रथमपुरुषी प्रथमवचनी ओळख लिहायची असे ठरवले. म्हणून ही “लेखकाची ओळख : माझी गोष्ट, आमची गोष्ट”. अशी काही स्वलिखित पुस्तकात, स्वतःची गोष्ट लिहिण्याची प्रथा नाही. पण माझ्यासारखे आयुष्य जगण्याची तरी कुठे प्रथा आहे? मी जरा वेगळा, वेगळा, वेगळाच, (चौकट राजा) आहे, हे मला अगदी लवकरच, लहानपणीच समजलं होतं. मी माझं वेगळेपण ओळखल्यामुळे व जपल्यामुळेच माझी कारकीर्द घडली. यालाच इंग्लिश मध्ये ‘करिअर’ म्हणतात. करिअर म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय नाही. करिअर म्हणजे कारकीर्द. तुम्ही आयुष॒यात जे काही करता, ती कारकीर्द. कुणाचीही कारकीर्द १/३ स्वतः व्यक्तीवर, १/३ कुटुंबावर, आणि १/३ समाजावर, मित्र, शाळा, कॉलेज, सहकारी किंवा परिस्थितीवर अवलंबून असते. वयानुरूप आणि अनुभवानुरूप स्वतःचा विकास होत जातो. क्षमता वाढत जातात. आणि तुम्ही जास्त चांगलं काम करू लागता. बुद्धिमत्ता (आय क्यू) वाढत नाही. पण कामगिरी चांगली होत जाते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती काळानुसार आणि वेळेनुसार बदलती राहत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कारकीर्दीला अनेक वळणे मिळत असतात. नव्या संधी व नव्या दिशा निर्माण होतात. हे काळा बरोबर स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला पालटण्याचे गणित मला फार चांगले जमले. मी 100 % बारामतीकर. आमची डॉक्टरकीची तिसरी पिढी. आता आमची चौथी पिढी सुद्धा डॉक्टर झालेली आहे. 75 वर्षाची वैद्यकीय व्यवसायाची परंपरा. माझे शिक्षण बारामतीत. लेखन, वाचन भाषण, नाटक, अभ्यास यात कायम पुढे. एमबीबीएस नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल मधे, डीसीएच सायन हॉस्पिटल मधे, एमडी, एफसीपीएस वाडिया चिल्ड्रन मधे. फेलो इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स मुंबईमध्ये आणि पीएचडी पेडिॲट्रिक्स बालविकास व वाढ क्षेत्रात पुणे विद्यापीठात, बीजे मेडिकल, ससूनमधे. हे माझं शिक्षण. भरपूर ओपीडी. भरपूर इन डोअर. मस्त व्यवसाय. माझी पत्नी डॉक्टर माधुरी, सोलापूरची एमबीबीएस. डिलिव्हरी सिझर, बिझी. आणि माझ्यासारखा जगावेगळा माणूस आयुष्यभर सांभाळला. मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनियर. आमच्या बाल कल्याण केंद्र मतिमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. माझी सून अंकिता आमच्याच की मूकबधिर शाळेमध्ये शिक्षिका. माझा नातू समिहन (१०), व नात कनक (२) हे दोन घटक आमचा वर्तमानकाळ व्यापून, भविष्यकाळातील कारकीर्द घडवत आहेत. अॅपटीट्युड टेस्ट, कल चाचण्या, आय क्यू टेस्ट म्हणजे कंपास पेटीतील सहा इंची पट्टीने १० एकर जमीन मोजण्यासारखं आहे. मला स्वतःला नाटकाची आवड. मी स्वतःला नाटकवाला मानतो. डॉक्टर झालो नसतो तर ॲक्टरच झालो असतो. अगणित नाटकात कामे केली. कॉलेज, विद्यापीठ, राज्य नाट्य महोत्सव, नाट्य साधना. विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे. आम्ही नाटक घेऊन इंग्लंड अमेरिका कॅनडा प्रवास केला. गणेशोत्सवात, खेडोपाडी, साखर कारखान्यांवर, इरिगेशन कॉलनी मधे अनेक प्रयोग. मस्त मित्र परिवार. फुल एन्जॉय. पण एके दिवशी उपरती झाली. मला अमाप आनंद मिळायचा. पण कुटुंबाचा आणि समाजाचा त्यात काहीच फायदा होत नव्हता. जगाची लाईफस्टाईल वेगळी आणि नाटकवाल्यांची लाईफस्टाईल वेगळी. मॅच होईना. माझ्या आयुष्याच्या ध्येय धोरणात नाटक काही बसेना. माझं प्रथम कर्तव्य समोर येणाऱ्या आईच्या बाळाला सेवा देण्याचं आहे. त्यामुळे ठरवून जड अंतःकरणाने संपूर्ण नाट्यसंन्यास घेतला. नंतर सुरू झालं भाषणांचं युग. दुसरी तिसरीत असतांनाच आमचे दिक्षित गुरुजी नगरपरिषदेच्या सर्व शाळातून “बघा कसा घडाघडा सकाळ वाचतोय ते” असे सांगत फिरवून आणायचे. मग भाषणे, कथाकथन, नाट्यवाचन, वादविवाद स्पर्धा. माझी ओरेटरी जी बहरली ती आजयागायत पुरते आहे. मेडिकल असोसिएशन, महिला मंडळे, गणेशोत्सव, शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, राज्यभर, देशभर, हजारो भाषणे. पंधरा-वीस वर्षे चालले ते प्रकरण. मजा आली. धमाल एन्जॉय केलं. पण समाजाचं त्यानी काय भलं होतंय, मोजमाप करता येईना. माझ्या मलाच नोंदीही करता येईनात. माझा बायोडाटा मात्र अधिकाधिक इम्प्रेसिव होत गेला. पण बायोडाटा मोठा करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नव्हतेच. आणि एके दिवशी वेळेचा फार अपव्यय होतो या कारणास्तव मी भाषणे बंद केली. लेखनाचं क्षेत्र मात्र फार लाभी ठरलं. जर्नल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, विशेष पुरवण्या शेकडो लेख छापून आले. येताहेत. अनेक लेख, विज्ञान कथा, पुस्तके. अनेक प्रकाशन संस्थांनी ती छापली. माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाची नुसती यादी द्यायची तरी दोन पाने लागतील. म्हणून मी त्या यादीला आणि मला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांना संपूर्ण फाटा देतो.व्यवसाय सुरु करण्यापूर्वी डॉ.किरण शहा या माझ्या मित्राने “तुला किती उत्पन्न अपेक्षित आहे” असा प्रश्न विचारला. पहिल्याच महिन्यात अपेक्षेच्या पाचपट उत्पन्न झाले. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी व्यवसाय कधी करावाच लागला नाही . व्यवसाय करत गेलो पैसे मिळत गेले . काका काकू (फॅमिली ॲडॉप्शन मुळे आई-वडील) डॉक्टर असल्याने व्यवसायाच्या पहिल्या दिवशीच हॉस्पिटल , कार , बंगला हजर होते . आई वडिलांनी सांगितले नाव कमव पैसे आपोआप मिळतील. मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी (1978) तज्ञ सल्लागार ही संकल्पनाच समाजात नव्हती. इंजेक्शन नाही औषध नाही, मग पैसे कशाचे द्यायचे? असा प्रश्न असायचा. बिन इंजेक्शनचा व्यवसाय करायला फार मोठे धैर्य लागले. अगदी ‘एकला चालो रे’ किंवा महात्मा गांधींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ सारखे. आणि तो घेतला वसा मी आजवर (74) सोडला नाही. बारामतीच्या शंभर किलोमीटर परिसरात, पुणे सातारा नगर सोलापूर या चार जिल्ह्यांच्या मधल्या टापूत पंधरा वर्षे मी एकटाच बालरोग तज्ञ होतो. फुल मोनोपली. वैद्यकीय सत्ता. प्रवासाच्या सोयी नव्हत्या. अंधश्रद्धा, बाहेरचं, देवाचं, अशा अनेक अडचणी होत्या. समाज प्रबोधन हे वैद्यकीय सेवेपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. खेडोपाडी लोकांच्या सोयीसाठी विजिट करावी लागे. जी पी डॉक्टरांना देखील बालरोग तज्ञाची गरज समजून सांगावी लागे. तुम्ही सेप्ट्रान देता, आम्हीही सेप्ट्रान देतो. मग तुमची गरज काय? असा प्रश्न होता. पंधरा-वीस वर्षे ‘आठवडी बाजार करणारा’ देशातील मी एकमेव बालरोगतज्ञ असावा. खेडोपाडच्या आठवडी बाजारात, एखाद्या दवाखान्यात जाऊन, पेशंट बघायचे. ज्या गावात नवीन बालरोग तज्ञ येईल, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ‘गावाची गरज भागली’ असे जाहीर करून विजिट बंद करायची. ही मोडस ऑपरंडी. त्यातही समाजसेवेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोनच जास्त होता. नामांकित, मानांकित होता येतं. हज्जारो ट्युबेकटोमी ऑपरेशनला असिस्ट करणारा बालरोगतज्ञ म्हणून माझा जागतिक विक्रम असेल. आधीची वीस वर्षं आईबरोबर, नंतरची वीस वर्षं बायकोबरोबर ! कौटुंबिक जबाबदारी. एकदा कौटुंबिक चर्चेत पुण्याचे डॉक्टर डी. बी. शिरोळे इतके ग्रेट का आहेत. त्यांच्यात असं काय स्पेशल आहे की सगळं जग त्यांचा आदर करतं, असा विषय निघाला. माझं असेसमेंट होतं, त्यांनी समाजाला गरज असताना, शेकडो बालरोगतज्ञ निर्माण करून, समाजाला दिले. ते नुसते व्यावसायिक होऊन पैसे गोळा करत बसले नाहीत. ते शिक्षक झाले. यातच त्यांच्या ग्रेटपणाचे रहस्य आहे. यावर माझ्या भावाचे उत्तर होतं “तुला कोणी सांगितलं तू शिक्षक होऊ नकोस म्हणून. तू शिक्षक हो.” आता बारामतीत राहून वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात शिक्षक होण्याचा मार्गच नव्हता. पण “जर्नल ऑफ रुरल पेडिॲट्रिक्स” काढून मी तो मार्ग शोधला. माझं जर्नल अमर्याद यशस्वी झालं. खेडोपाडी, राज्यभर, भारतभर, जगभर मला ओळख मिळाली. माझे विद्यार्थी निर्माण झाले बालआरोग्यक्षेत्रात बारामतीत मी अनेक गोष्टी पहिल्यांदा सुरू केल्या. लहान मुलांचा ईसीजी, इईजी, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी एनआयसीयु, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यातच नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारे रिस्पिरेटर मशीन मी बारामतीत संशोधन करून बनवले. त्याचे ऑफिशियल सरकारी पेटंट मिळाले. देशभर हजार एक मशीन विकली. पण धंदा व्यवसाय करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नसल्याने

गोष्ट आम्हा दोघांची Read Post »

heat stroke child almost fainting under sun

बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय

मार्च महिना आला की तापानी फणफणलेली मुलं दवाखान्यात यायला सुरुवात होते. या तापाचं कारण लक्षात आलं नाही तर आग रामेश्वरी बंब सागेश्वरी अशी स्थिती निर्माण होते. ही उन्हाळयाची आग बाळांना फार त्रास देते. उष्माघात हा एक वर्षाखालील मुलांचा विशेषतः नवजात बालकांचा खास आजार आहे. कच्चे तपमान नियंत्रण :-शरिराच्या तपमानाचे नियंत्रन करणारे एक केंद्र मेंदुमध्ये असते हवेचं तपमान वाढलं की घाम येवून शरिर थंड होतं. लहान बाळांच तपमान नियत्रंण केंद्र अपरिपक्व असल्याने व्यवस्थित काम करत नाही. पत्रा तापतो, भांडी तापतात तशी मुलंही तापतात. बाल उष्माघाताची कारणे व उपाय :- उष्ण न खेळणारी हवा :पत्र्याचे छप्पर, कमी उंचीच्या छताची खोली, खेळती हवा नसलेली कोंदट खोली असेल तर उष्माघाताची शक्यता खूप जास्त असते. बालउष्माघात व्हायलाउन्हातच जायला हवे असे नाही. 15 दिवसाच्या बाळाला सुध्दा बालउष्माघात होऊ शकतो. त्यासाठी खोली थंड हवी. नसेल तर करायला हवी. कुलर लावणे पंखा लावणे, दारं खिडक्यांवर ओल्या चादरी टॉवेल टाकणे इ. उपाय करता येतात. खेडयातील आयांनी दुपारच्या वेळी बाळाला घेऊन दाट सावली असलेल्या झाडाखाली बसावे. लिंबाची सावली छान गारवा देते. बाळाला ताप आला असता दारं खिडक्या बंद, पंखे बंद करुन बाळाला जास्त त्रास होतो. अंगावरचे कपडे : मोठया माणसांना उकडायला लागलं तर ते हलके, पातळ, सुती कपडे घालतात. पण तापलेल्या बाळाला टोपी, स्वेटर, ब्लॅकेटमधे दडपून ठेवतात. हे उपाय ताप वाढवणारे आहेत. वारं लागू नये “बाधेल” अशा गैरसमजुतीपायी बाळाचे नुकसान होते. बाळाला कमीतकमी, हलके, सुती कपडे घालावे तापलेल्या बाळाला उघडे ठेवणे सर्वात उत्तम. शरिरातील पाण्याचे प्रमाण :वाढलेले तपमान कमी करण्यासाठी देवाने फक्त एकच यंत्रणा आपल्या शरिरात बसवली आहे. तपमान वाढले कि घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरिरातील उष्णता वापरुन शरिर थंड होते. बाहेरुन कोरडया माठातले पाणी गार होत नाही. त्याचप्रमाणे घाम न आलेल्या बाळाचे तपमान वाढतच जाते. अशा बाळाला दिवसातून तीन चार वेळा गार पाण्याने पुसून घ्यायला हवे. उन्हाळयामुळे, उलटी जुलाबामुळे किंवा आजारपणात अन्नपाणी, अंगावरचे दूध न घेतल्यामुळे शुष्कता स्थिती निर्माण होते. शरिरात पाणी कमी असेल तर ताप येवून सुध्दा शरिर घामावाट पाणी बाहेर सोडू शकत नाही. पॅरासिटॅमॉल क्रोसीन हे औषध घाम आणण्याचे काम करते. शुष्कता स्थिती असेल तर पॅरासिटॅमॉलचा गुण येत नाही. तेव्हा शुष्कता स्थितीचे निदान करुन पाणी पाजले तरच ताप उतरतो अन्यथा नाही. बालउष्माघाताने अनेक मत्यू होतात. खुप रडणा-या व बेफाम तापलेल्या बाळाला योग्य निदान न झाल्याने अॅटिबायोटिक व झोपेच्या औषधांचा मारा केला जातो. पण मूळ कारण दूर न झाल्याने मुल तापतच राहते व रडतच राहते. त्यासाठी लहान बाळांच्या कुटुंबानी व फॅमिली डॉक्टरांनी बालउष्माघाताची शक्यता मनात ठेवली पाहिजे. तो होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, झाल्यास वेळेवर निदान करुन उपचार केले पाहिजे, नाहीतर ही सुंदर नाजूक फुलं रणरणत्या उन्हाळयात नाहक कोमेजून जातील. बालउष्माघाताची लक्षणे व उपाय : कडक उन्हाळा, बंद खोली, भरपुर कपडे, शुष्कता स्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे बालउष्माघाताची सर्व तयारी पुर्ण झाली असे समजावे. या परिस्थितीत योग्य ते बदल केले नाही तर आजाराच्या गांभीर्याप्रमाणे बालउष्माघाताच्या तीन पाय-या ओळखता येतात. पायरी तापमान (फॅ.) हृदयाचे ठोके डोळे तोंड व जीभ लघवी इतर लक्षणे उपाय पायरी 1 99 ते 101 150 खाली थोडे खोल सुकलेली कमी खूप रडणे, आतडी, चेहरा लाल मीठ-साखर पाणी, जलसंजीवनी, ओल्या फडक्याने पुसणे पायरी 2 101 ते 104 150 ते 200 खूप खोल थोडा ओलावा 8 तास नाही रडणे, दम लागणे अॅडमीट, सलाईन पायरी 3 104 वर 200 वर खोल व मऊ पूर्ण कोरडे 12 तास नाही दम लागणे, झटका येणे, बेशुद्ध होणे अॅडमीट, थंड करणे, थंड खोली, थंड पाण्याने उपचार, तातडीचा औषधोपचार – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास) #

बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय Read Post »

Two young boys energetically competing in a soccer match on a grassy field.

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले

ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा. त्यांनी उन्हात खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये. त्यांनी सावलीत खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी टोपी न घालता बाहेर हुंदडायला जावे. म्हणजे मस्त डोकं तापतं. फणफणून ताप येतो. हॉस्पिटल मधे इंजेक्शन सलाईन मिळतात. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी टोपी घालून बाहेर जावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी चपला न घालता तापलेल्या फरशीवर पाय ठेवावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी चपला घालून घराबाहेर पडावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी अज्जीबात पाणी पिऊ नये. आणि खुशाल रणरणीत उन्हात भर दुपारी सायकल दामटावी. पाणी कमी पिले तरच उन्हाळा बाधतो. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी भरपूर पाणी प्यावे. चोवीस तासात सहापेक्षा जास्त वेळा सू व्हायला हवी. अगदी आकडा मोजा. भरपूर पाणी पिणाऱ्याला उन्हाळा बाधत नाही. तर बच्चमजी, तुम्हीच ठरवा, उन्हाळ्यात काय करायचे. काय नाही करायचे. शाळेतल्या मोठ्या मुलांना एवढं तरी आपलं आपल्यालाच समजायला हवे. ते सांगायला आई कशाला लागते! एवढे बोलून “उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले” या विषयावरचं माझं भाषण मी समाप्त करतो. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले Read Post »

doctor and girl doing health check up

बालपणाचे विज्ञान 2

7) लसीकरण 8) औषधे 9) ताप 10) नवजात बाळ 11) प्रथा आणि अंधश्रद्धा 12) डॉक्टर आनंदी बालपण = यशस्वी मोठेपण – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 2 Read Post »

child-adoption

मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना

होईल हो. आत्ता तर जेमतेम दोन अडीच वर्ष होताहेत लग्नाला. इथून होते सुरुवात एका दुष्टचकाची. मागून लग्न झालेल्या भावंडांना पहिले मूल झाले की पहिल्यांदा मनात पाल चुकचुकते. आपल्याला कधीच मूल होणार नाही काय ? डॉक्टरी उपाय सुरु होतात. येणारीप्रत्येक मासिक पाळी नैराश्याचे झटके देअून जाते. उध्वस्त जीवनाचा अर्थ समजता. चिडचिडहोते. भांडणे वाढतात. निष्कारण एकमेकांना दुखावले जाते. समंजस कुटुंबातल्या समंजस जोडप्यांना ‘दोष कुणाचा’ यात रस नसला तरी “गिल्टी फीलिंग” काढून टाकावे लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु होते. मिळेल तो सल्ला ऐकण्याची प्रवृत्ती वाढते. न जाणो या मार्गानेयश आले तर ! आशा मरत नाही. मन हार मानायला तयार होत नाही. पण हळूहळू मूल कधीच होणार नाही हे मनाला समजायला लागतं. अनेक वर्ष ज्या डॉक्टरांवर देवासारखी श्रध्दा ठेवली असते, जो डॉक्टर सुप्रसिध्द, यशस्वी, तज्ञ, बुध्दिमान वाटला असतो तोच डॉक्टर अचानक वेळ खाअू, पैसेखाअू, कच्चा वाटू लागतो. कशाला फुकट चकरा मारायच्या असे वाटू लागते. आपण उगीच या डॉक्टरच्या नादी लागलो असे वाटले म्हणजे समजावे प्रयत्नांचा अंत आला आहे. पाच, दहा, पंधरा वर्षांनी मूल झालेली माणसे दिसायला लागली म्हणजे समजावे, आता पुरे ! वाईट दोघांनाही वाटत असतं. कुचंबणा तर होतेच. पण वाईट वाटतं हे स्पष्टपणे बोलायला मन नकार देतं. मूल नाही म्हणून आमचं काही बिघडत नाही. आम्ही आनंदी आहोत. असं चारचौघात आवर्जून सांगण्यात माणूस धन्यता मानतो. समाजात न मिसळण्याची प्रवृत्ती वाढते. मनातून कुढत असतांनाच चेहरा मात्र आनंदी, सुखी माणसाचा चढवला जातो. आमच्या आयुष्यात काही त्रुटी नाही, भावंडांची मुले आपलीच आहेत की, असं आवर्जून इतरांना सांगितले जाते. पण या वाक्यांतला फोलपणा लवकरच लक्षात येवू लागतो. चेह-यावर वय दिसू लागते. अकाली प्रौढत्वाच्या खुणा ओळखायला येतात. या परिस्थितीत काही नशिबवान जोडप्यांना दत्तकाची माहिती मिळते. समोरासमोर कुणी सांगितलं तर पटकंन पटत नाही. पण ही दत्तकाची सुचना योग्यवेळी जोडप्यांच्या मनात रुजायला लागते. पहिली प्रतिक्रिया विचार बाजूला सारायची असते. नाही. आपल्या ‘टॅडिशनल फॅमिली” मधे इतका मॉडर्न विचार चालायचा नाही असे वाटते. पण ते खोटे असते. कारण आजकाल कोणच्याच ‘फॅमिली’ तितक्या ‘टॅडिशनल’ नसतात. आणि दत्तक हा सुध्दा इतका काही ‘मॉडर्न’ विचार राहिलेला नाही. कुणाचे तरी प्रोत्साहन, वाचन, किंवा उदाहरण पाहून दत्तकाची कल्पना जोडप्यापैंकी कुणाच्यातरी एकाच्या मनात रुजायला लागते. दोघांनीही चर्चा केली तर ती लवकर रुजते. दोघांच्याही मनात प्रश्न असतो. दुस-याला काय वाटेल. माझे विचार तुझ्यावर लादले तर जाणार नाही ना, असे निष्कारणच म्हटले जाते. दोघांनी एकदा हा विचार मान्य केला की एकदम आयुष्य बदलते. अचानक डोक्यात लख्ख उजेड पडतो. जीवनातला आनंदाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. मग प्रश्न येतो ‘जग काय म्हणेल याचा नातेवाईक, कुटुंबिय समाज यांच मत विचारत बसणे हा मूर्खपणा असतो. कुटुंबियांना विश्वासात घ्यावेच लागते. पण निर्णय स्वतःचा स्वतःच घ्यायचा असतो. मूल दत्तक घेण्याचा निर्णय कुटुंबियांना सांगितला तर सगळयांनाच तो आवडतो. मत विचारलं तर मात्र फाटे फुटू शकतात. कोणी म्हणतं नात्यातलं घेवू, नात्यातलं मूल हे नातेवाइकाचंच राहतं. “जन्मभरं मूल कसं हवं”? संपूर्णपणे आपलं. त्याला आपल्याशिवाय दुसरे आईवडिल नको. तरच ते कुटुंब बनतं. नाहीतर ‘यांच मूल त्यांनी संभाळलं हे बीरुद जन्मभर राहतं. आणि अशी मुलं असतात. त्या मुलाला आई वडिल नसतात आणि अशा मुलांना आई वडिल मिळवून देण्याचं कार्य करणा-या समाजसेवी संस्था असतात. संस्थेकडे जाणे ही सुध्दा एक महत्वाची पायरी असते. संस्थांकडे कुमारीमातांची, आईला सामाजिक कारणांनी सांभाळ करणं अशक्य असलेली मुले येतात ही मुले कायदेशीररित्या त्यांच्या जन्मदात्या आयांनी संस्थेकडे सुपूर्द केलेली असतात. संस्था त्या मुलांचे पालनपोषण करत असते. संस्थेकडे जावून मूल कायदेशीरित्या दत्तक घेणं श्रेयस्कर असतं. संस्थेचे नियम, कागदपत्रांची पूर्तता व लागणारा वेळ परवडला, पण खाजगीरित्या डॉक्टरांकडून आणून संभाळलेलं मूल परवडत नाही. त्यात धोका असतो. जन्मदात्याचा नाव पत्ता व मूल नेलेल्याचा नाव पत्ता कुणालाही मिळू शकतो. पुढेमागे कायदेशीर कटकटी निर्माण होवू शकतात. तेकुठल्याही परिस्थितीत टाळायलाच हवे. संस्थांकडून दत्तक मिळण्याची पध्दत पूर्ण देशात एकच अशी कायद्याने मान्यता दिलेली पध्दत असते. ती मुलांच्या व आईवडिलांच्या दोघांच्याही दृष्टीने फायद्याची असते. संस्थेमधे पहिली भेट होते ती समाजसेविकेची किंवा सोशलवर्करची. या उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी व सह्दयी असतात. त्यांना संपूर्ण सहकार्य देणा-या जोडप्यांची दत्तकमूल घेण्याची प्रक्रिया सुरळीत व आनंददायी ठरते. त्या इंटरव्हयू घेतात, घरी भेट देतात, तुमचं घर त्यातली माणसं दिलेल्या मुलाला योग्य राहतील कि नाही हे बघतात. काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मग तुमचा अर्ज दाखल होतो. यात 2-4 महिने जाउ शकतात. मूल निवडण्याआधी किंवा दाखवण्याआधी सोशलवर्कर तुमच्याशी चर्चा करतात तुमची तयारी करुन घेतात. मुलगा की मुलगी हा प्रश्न प्रत्येकाला सोडवावा लागतो. तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या रंग रुपाशी मिळते जुळते शोधून 1 किंवा 2 मुले दाखवली जातात. बहुतेक “होणा-या आयांना” दाखवलेले पहिलेच मूल आवडते. “प्रथमदर्शनी प्रेम” म्हणतात तसलीच ही भवनात्मक भानगड असते. मूल घरी यायला साधारणपणे 3 ते 9 महिने एखाद्या वेळेस वर्षसुध्दा लागू शकते. तशी गर्भारपणातसुध्दा बाळ यायला नउ महिने वाट पहावीच लागते की. फार उताविळपणा करुन चालत नाही! मूल आल्यावरची परिस्थिती म्या पामराने काय वर्णावी! अहो आनंदसोहळाच तो! सर्व मळभ निघून जाते. सुखाचा पेला काठोकाठ भरल्याची जाणीव होते. हा निर्णय घ्यायला इतकी वर्ष वाया घालवली याची प्रकर्षाने जाणीव होते. ‘बेटर लेट वॅन नेव्हर’ म्हणून स्वतःची समजूत घालणंच आपल्या हातात असतं. शेवट गोड ते सगळं गोड म्हणतात तसं. पण इथं तर एका नव्या आयुष्याची, एका नव्या कुटुंबाची सुरुवात असते. नवा संसार म्हणजे नव्या अडचणी विवंचना आल्याच की. त्याशिवाय त्याला संसार कसं म्हणणार. मधून मधून याचे जन्मदाते कोण असतील. कोणत्या जातीचे असतील असले उत्तर नसलेले प्रश्न मनात उद्भवतात. एखादी बाई ‘दत्त’ म्हणून समोर येवून उभी राहिली आणि “हे माझं मूल आहे” अस म्हणू लागल्याची दिवास्वन्प्नसुध्दा पडू शकतात. पण ते सगळे मनाचे खेळ असतात. ‘कूठून आलं आणि कुठे गेलं’ हे गुपित असतं. ते कुणालाही माहित नसतं. म्हणूनच संस्थेमार्फत कायदेशीर दत्तक यशस्वी ठरतं. आपण आपल्या मुलावर व भविष्यावर नजर ठेवावी. भूतकाळाच्या जोखडीतून मुक्त व्हावं हेच बरं. मूल आल्यावर सगळयांना बिनधास्तपणे आम्ही मूल दत्तक घेतलयं म्हणून सांगावं. अजिबात लाजू नये. ते एक आयुष्यातल यश आहे. ते तसंच समाजाला सांगितलं तर समाजाला आपलं कौतुक करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तुम्ही जर खोटं बोलला किंवा लपवाछपवी केली तर उघडे पडतं. लोक निश्तिच टिंगल करतात. दत्तकाचं तसं संपूर्ण प्रकरणच “आहे ते आनंदाने मान्य करणे व कौटुंबिक जीवन सुखी करणे.” यावर अवलंबून असतं. हे तत्व ज्याला समजलं त्याचा दत्तक यशस्वी झाला. मुलाची वाढ व प्रगति ही जास्त करुन त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर आणिवातावरणावर अवलंबून असते. अनुवांशिकता व त्याच्या जन्मदात्या मातापित्यांच्या आर्थिक – सामाजिक परिस्थितीचा त्यावर काहीच परिणाम नसतो हे समजून घ्यायला हवे. कोणत्याही मुलाला विकासासाठी प्रेम, शिस्त व सुरक्षितता या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधावा लागतो. तसाच व तितकाच तो दत्तक मुलासाठीही साधावा लागतो. मुलाच्या वागणुकीचा बुध्दिमत्तेचा व यशाचा संबंध त्याच्या जन्मदात्यांशी न लावता पालनकर्त्या आई-वडिलांशी लावला तर यश निश्चित मिळते. तू दत्तक आहे असं एका दिवशी

मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना Read Post »

बालकल्याण केंद्राच्या मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास

आत्मविश्वासाचा उत्सव: मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास

स्टेजवर नृत्यात रमलेल्या त्या मुली पाहून एक क्षणभर थांबलो. पहिल्या-दुसऱ्या वर्षाच्या कॉलेजमधल्या मुली वाटाव्यात, इतकं आत्मविश्वासानं नाचत होत्या. चेहऱ्यावर तेज, ड्रेस छान, नृत्यात कमालीची ग्रेस! पण या मुली कोण होत्या? त्या आमच्या बालकल्याण केंद्रातील सहावी-सातवीच्या मूकबधिर मुली होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात आलं—या एका नृत्यामुळे त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा कशी बदलली आहे! कदाचित, त्यांच्या मनात किंवा त्यांच्या आई-वडिलांच्या कल्पनेतही कधी आलं नसेल की त्या एवढ्या स्मार्ट, मॉडर्न आणि आत्मविश्वासानं भरलेल्या दिसू शकतात. पण आज त्या स्टेजवर होत्या, संपूर्ण आत्मविश्वासाने नृत्य सादर करत होत्या. ही आहे खरी ‘नर्चरिंग’ची जादू! हे सहजसाध्य नव्हतं. त्यांच्या कर्तृत्ववान, दूरदर्शी शिक्षकांनीच ही कल्पना सुचवली, त्यांना स्टेजवर आणलं. त्यांना ऐकू येत नाही, तरीही त्यांनी संगीत समजून घेतलं, ताल धरला, नृत्यातून भाव व्यक्त केले. हे काही साधं काम नाही! हे नुसतं नृत्य नव्हतं; हा आत्मविश्वासाचा उत्सव होता, हा स्वत्वाचा शोध होता! आज या मुली स्वतःला कधीच ‘डॅमेजड पीस’ किंवा ‘डिसेबल्ड’ मानणार नाहीत. त्यांची स्वतःविषयीची ओळख बदलली आहे. हाच खरा विजय आहे! यश म्हणजे अजून काय असतं? हे शक्य केलं शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी! या मुलींच्या आयुष्यात हा बदल घडवून आणणाऱ्या शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी या मुलींमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि आत्मसन्मान रुजवला. माझ्या टीमने, माझ्या स्टाफने आणि शिक्षकांनी माझी स्वप्नं प्रत्यक्षात आणली आहेत. याचसाठी केला होता अट्टाहास! मूल केवळ शिकावं एवढ्यावरच माझा विश्वास नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलावं, त्यांना स्वतःची ताकद उमगावी, ते आत्मनिर्भर बनावेत—यासाठीच हा प्रयत्न! आणि आज, या स्टेजवरच्या मुली पाहिल्यावर वाटतं—होय, हे स्वप्न पूर्ण होतंय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आत्मविश्वासाचा उत्सव: मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास Read Post »

Tuberculosis in children

या बाळाला टी.बी. तर नसेल ना ? शंका कधी घ्यावी ?

#24 लहान मुलांमध्ये टी.बी. (क्षयरोग) ओळखणे कठीण असते. बाळ खूप आजारी होईपर्यंत लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते. जुनाट संसर्ग आणि मुलाच्या वाढीतील अडथळा यावरून टी.बी.चा संशय घ्यावा लागतो. प्रतिकारशक्ती कशी आहे, यावर बऱ्याच लक्षणांचे स्वरूप अवलंबून असते. लहान मुलांमध्ये टी.बी. कशी होते? टी.बी.चे जंतू मोठ्या माणसांमधून लहान मुलांमध्ये संक्रमित होतात. परंतु, सगळीच मुले आजारी पडत नाहीत. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, ती मुलं टी.बी.च्या जंतूंशी लढू शकतात आणि निरोगी राहतात. प्रतिकारशक्ती कमी असल्यास टी.बी. जंतू हळूहळू शरीरात पसरतात, फुफ्फुस आणि लिम्फ नोड्समध्ये संक्रमण वाढते, आणि मग मुलं आजारी पडतात. पालकांना शंका कधी घ्यावी? लहान मुलांमधील टी.बी.चे निदान मुख्यतः संशयावर आधारित असते. संशय घेण्यास मदत करणाऱ्या 10 मार्गांपैकी पहिले चार लक्षणे वारंवार दिसतात, तर उर्वरित सहा क्वचितच दिसतात. वारंवार आढळणारी चार लक्षणे क्वचित आढळणारी सहा लक्षणे टी.बी. ओळखण्यासाठी काय करावे? वरील लक्षणांवरून संशय येत असेल तर त्वरित बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या. टी.बी.चे निदान आणि उपचार लवकर सुरू केल्यास मुलाला गंभीर परिणामांपासून वाचवता येते. निष्कर्ष लहान मुलांमधील टी.बी.चे निदान करण्यासाठी वेळीच संशय घेणे आणि योग्य उपचार सुरू करणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घ्या, कारण योग्य माहितीमुळे बाळाचे आरोग्य चांगले राखता येते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

या बाळाला टी.बी. तर नसेल ना ? शंका कधी घ्यावी ? Read Post »

Physician examine and playing with child

बाळ छान आहे, आजारी आहे, की सिरियस आहे? ओळखायला शिका

पालक म्हणून आपण मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी करणे स्वाभाविक आहे. बाळ “छान” आहे की “आजारी” आहे हे ओळखणे प्रत्येक पालकाला जमलेच पाहिजे. पण हे कसे ओळखावे? बाळाचा आरोग्य टप्पा समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण लहान मुलांमधील आजार वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातात. योग्य माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेणे हाच पालकत्वाचा गाभा आहे. बाळ “छान” आहे की “आजारी” आहे? जर बाळ छान असेल तर उगाचच काळजी करायची गरज नाही. परंतु, बाळ आजारी दिसत असेल तर ते ‘वेळेत’ डॉक्टरांपर्यंत पोहोचले पाहिजे. गंभीर आजारी बाळाला क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये थांबवणे चुकीचे आहे. म्हणूनच, बाळ कोणत्या टप्प्यावर आहे हे समजणे महत्त्वाचे ठरते. बाळाच्या आरोग्याचे टप्पे बाळाच्या आरोग्य स्थितीचे मुख्यतः सहा टप्पे असतात: पालकांना काय करावे? बाळाचे आरोग्य ओळखण्यासाठी मेंदूच्या क्रियाकलापांकडे लक्ष द्या. बाळाचे वागणे, खाणे, खेळणे आणि रडण्याच्या पद्धतीत बदल दिसला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळ थोडे गळून गेलेले दिसले तरी डॉक्टरांकडे जाणे चांगले. कारण, लहान मुलांची तब्येत झपाट्याने बिघडू शकते. निष्कर्ष बाळ छान आहे की आजारी आहे हे ओळखण्यासाठी थोडी माहिती आणि सराव लागतो. आपल्या जवळच्या बालरोगतज्ञाचा सल्ला वेळोवेळी घ्या. लहान मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टर फक्त औषधांसाठी नसून योग्य मार्गदर्शनासाठीही महत्त्वाचे आहेत. पालकांनी ही माहिती लक्षात घेतली तर बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे शक्य होईल. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बाळ छान आहे, आजारी आहे, की सिरियस आहे? ओळखायला शिका Read Post »

A doctor consulting with parents while holding a smiling baby.

21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान माहित असायलाच हवे

#22 आता जुन्या काळचे पालकत्व कसे चालेल? काळ बदलला, जग बदलले. शामच्या आईचे जग आता कुणालाही निर्माण करता येणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक रचना बदलल्याने, एकट्या पडलेल्या तरुण आई-वडिलांना आता आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही. बालपणाच्या प्रत्येक वयात आणि टप्प्यावर योग्य माहितीच्या आधारे त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. आता यापुढे मुलांना वाढवण्यासाठी फक्त “प्रेम, काळजी आणि पालकांचे सामान्य ज्ञान” पुरेसे ठरणार नाही. मुलांचे संगोपन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. परंतु सुशिक्षित पालकांमध्येही अजून वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्याचे दिसून येते. त्यांना माहित नाही हेच त्यांना माहित नसते. मुलांच्या संगोपनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा? मुलांचे आरोग्य, आजार, आहार, वाढ, विकास, वागणूक, शिक्षण, मानसशास्त्र आणि अशा बालपणातील सर्व बाबींची खरी वैज्ञानिक माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. समस्या निर्माण होऊच नयेत म्हणून काय करायचे, आणि काही समस्या निर्माण झाल्यास त्यांचा सामना कसा करायचा, हे पालकांना माहित असले पाहिजे. आजच्या पालकांची सर्वात मोठी समस्या माहितगार व्यक्तीशी संपर्काचा संपूर्ण अभाव हीच आजच्या पालकांची सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या जवळचा बालरोगतज्ज्ञ हीच सर्वोत्तम माहितगार व्यक्ती आहे. लोकांना असे वाटते की डॉक्टर फक्त आजारासाठी किंवा लसीसाठीच आहेत. “बाळ आजारीच पडत नाही,” किंवा “लस सरकारी आहे, ती मोफत मिळते,” मग डॉक्टरची गरजच काय? परंतु बाळासाठी डॉक्टर केवळ आजारासाठी नाहीत; बालपणातील सर्व समस्यांवर योग्य माहितीसाठीही डॉक्टरच हवेत. शेजारीण किंवा आजीपेक्षा डॉक्टरला जास्त समजते. बाळ नॉर्मल आहे का? नॉर्मल रेंजमध्ये आहे का? काहीतरी चुकतंय का? किंवा बाळ बिघडलेले आहे का? काळजी करण्यासारखे आहे का? हे पालकांनाच ओळखता आले पाहिजे, आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. मुलांच्या विकासाच्या टप्प्यांची ओळख लहान मूल ही मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नसते. जसे फुलपाखराच्या अंडे, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा विकासाच्या अवस्था असतात, तशाच मानवी विकासाच्या गर्भावस्था, नवजात, शैशव, शालेय, किशोरावस्था, पौगंडावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा टप्प्याही असतात. प्रत्येक टप्प्यात: वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे संस्कृती आणि कौटुंबिक परंपरांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. योग्य माहिती मिळवून त्याआधारे निर्णय घेणे, याचा अर्थ होतो. निष्कर्ष म्हणूनच 21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान समजणे आणि योग्य माहिती घेणे अनिवार्य आहे. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, विकासासाठी आणि भविष्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनासह पुढे जाणे ही काळाची गरज आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान माहित असायलाच हवे Read Post »

Dr. Anil Mokashi

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

#21 “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.”बापरे, बापरे! केवढा प्रचंड अर्थ ठासून भरलाय श्री समर्थ रामदास स्वामींच्या या एका वाक्यात! “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे. अभ्यासे प्रकट व्हावे. नाही तरी झाकोनी असावे. नेमकचि बोलावे. तत्काळची प्रतिवचन द्यावे.” जसजसा या वाक्याचा अर्थ समजायला लागतो, तसतसे मेंदूतल्या ज्ञानाचे एकेक दालन उघडायला लागते. हे फक्त शाळेतल्या भिंतीवर लिहायचं ‘सुभाषित’ नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे, त्रिकालाबाधित सत्य आहे. लेखन आणि वाचनाचे आयुष्यातील अनुभव माझा मुलगा (३५) एक दिवस मला (७५) म्हणाला, “बाबा, अक्षर सुंदर दिसावं म्हणून तू एवढं महागडं, शंभर रुपयाचं, जाड टोकाचं रिफील का वापरतोस? परवडत नाही आता आपल्याला. आपली आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. हॉस्पिटल बंद केलंय आपण. आणि तरीही तू रोज इतकी पानंच्या पानं लिहीत असतोस. ते वाचतंय तरी कोण?”उत्तरादाखल माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणि जिभेला ब्रेक लावला. दोस्त खात्यात हसण्यावारी नेलं. अस्थायी होतं राव ते! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! असंच एकदा तीस वर्षांपूर्वी, माझ्या बायको बाबतही झालं. मी चाळीशीतला सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, आणि ती पस्तिशीतली सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होती. त्याकाळची घटना. रात्री जेवल्यानंतर झोपताना, “अपंग क्षेत्रातील समस्या व उपाय” या माझ्या क्रांतिकारक, नव्या लेखाचा पहिला परिच्छेद पूर्ण वाचून दाखवण्याआधीच बायकोने, “बघू हो ते नंतर, झोपा आता गुपचूप. मला सकाळी सहाला सिझर आहे. आणि तुम्हालाही बाळासाठी यायचं आहे,” असं म्हणून मला पृथ्वीवर आणलं. माझ्या जिभेवर “दिसामाजी काहीतरी…” आलं, पण मी मनाला आणी जिभेला ब्रेक लावला. अस्थायी होतं राव ते वाक्य! जाऊ दे. आपलं दुःख आपल्या जवळ. दुसऱ्याला काय सांगायचं! त्या दिवशी मात्र मला “नॉर्मल” होण्याची गरज आहे, याचा साक्षात्कार झाला. सोशल मीडियाच्या युगात लेखनाची क्रांती बाकी देशाचं मला माहित नाही, पण “दिसामाजी काहीतरी” लिहिणाऱ्या जमातीला, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आल्यापासून “अच्छे दिन आये है”. सुगीचे दिवस आले आहेत. आपले आपण अखंडीत लिहीत राहावे. सगळ्या ग्रुपवर सगळ्या लोकांना पोस्ट करत राहावे. कोणी वाचो न वाचो, आपल्याला काय त्याचे देणे घेणे? किती लोकांनी सोशल मीडियावर मला ब्लॉक केले असेल, मी कधी बघायच्या भानगडीतच पडलो नाही. आपल्याला काय त्याचे. लेखन-वाचन: आयुष्याची गुरुकिल्ली लेखन आणि वाचन या जीवनावश्यक कला आहेत. मी तिसरीत असतानाच आमच्या गुरुजींनी “बघा हा मुलगा, कसा घडाघडा ‘संपूर्ण सकाळ’ वाचून दाखवतो ते. शिका काही याच्याकडून,” असं म्हणून, मला नगरपालिकेच्या सर्व शाळांमधून फिरवून आणलं. तेंव्हापासून लागलेला ‘वाचनाच्या किड्याचा झूनॉटिक डिसीज’, क्रॉनिक होऊन आजवर टिकून आहे. तसंच लेखनाच्या बाबतीतही झालं. म.ए.सो. शाळेच्या बाईंनी, माझा “तुकोबाची पालखी” हा निबंध, संपूर्ण शाळेला वाचून काय दाखवला, त्यानंतर मी “दिसामाजी जन्मभर” लिहीतच राहिलो. व्यक्तिमत्त्व विकास हो, अती व्यक्तिमत्त्व विकास! मेडिकलला गेल्यावर तर इतर सगळ्याच ९९% बुद्धिमान मुलांवर मात करून, साधं पास व्हायचं असेल तरी, तेच तेच प्रकरण, अनेकदा वाचण्याशिवाय पर्यायच नव्हता. सगळे सहपाठी जेमतेम कसेबसे एकदा, मेटाकुटीला येऊन ‘नेल्सन टेक्स्टबुक ऑफ पेडिअॅट्रीक्स’ वाचायचे. मी तीन वर्षांत १३ वेळा ‘ए टू झेड’ वाचलं. प्रयत्नांती परमेश्वर! शास्त्रशुद्ध लेखन-वाचन कौशल्य वाचन-लेखन कौशल्ये पद्धतशीरपणे शिकवता येतात. ती निष्ठेने जोपासावी लागतात. वाचनाने आयुष्याची क्षितिजं रुंदावतात, तर लेखन मनाची सुस्पष्टता वाढवतं. एकूण काय तर वाचन लेखन मनन चिंतन अभ्यासात,सत्कारणी लावतो जो वेळ या दिनक्रमात. भाषणे चर्चा वादविवाद परिसंवादात,जो नाही पोकळ चमकोगिरी करीत. विषय आपला समजून घेतो आणि देतो,आनंदाने कष्टाने जो ज्ञानाच्या खोलात जातो. असा समर्पित ज्ञानाची लालसा असणारा,विद्यार्थी दाही दिशांत नावाजला जाणारा. लेखन वाचनाचा खजिना आहे हिताचा,वर्तमान काळाचा व ताकदवान मनाचा. प्रयत्न करावा अर्थ समजून घेण्याचा,जिव्हाळ्याचा चांगला विश्वासू माणूस होण्याचा. वागावे कसे जगावे कसे आपल्या या समाजात,आणावे वारंवार वाचनात व ऐकण्यात. ग्रंथ हेच गुरु आणि शिक्षक सदा साथीला,कळेल कशासाठी आलो आपण जन्माला. लेखन आणि वाचनाचा आनंद घ्या, कारण या सवयींमुळे आपण अधिक प्रगल्भ, अधिक सजग, आणि अधिक सृजनशील होतो. “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे,” हे वाक्य फक्त वाचायचं नाही, तर आयुष्यात जगायचं आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे Read Post »

Scroll to Top