मोहनदास ते महात्मा गांधी
मोहनदास ते महात्मा गांधी – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २३ मोहनदास करमचंद गांधीलहानपणी अगदी साधा मुलगा होते.ते जरासे अबोलच होते.पण काहीही चुकीचं घडतांना दिसलंकी ते अस्वस्थ व्हायचे.त्यांना खोटं आवडत नसे.सत्य म्हणजे, खरं ते बोलणं.सत्य म्हणजे, बरोबर ते करणं.त्यांना एक प्रश्न पडायचा.‘सत्याच्या बाजूने’ कसं उभं राहायचं ?त्यासाठी त्यांनी वकिलीचं,कायद्याचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेच्या डब्यातून खाली उतरवण्यात आलं.ते गोरे नव्हते, काळे होते.हा अन्याय त्यांना मान्य नव्हता.त्यांनी विरोध केला.त्या दिवशी त्यांना स्वतःची ओळख पटली.हिंसाही नाही. आणि सहकार्यही नाही. भारतामध्ये परत आल्यावरगांधीजींनी भारतयात्रा केली.लोक कसे जगतात हे त्यांनी पाहिलं.पदयात्रेमधे ते एकटे चालायला लागले.“एकला चलो रे” हा त्यांचा मंत्र होता.हळूहळू त्यांच्यामागे लोक जोडले गेले.हजारो, लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले.त्यांनी चरख्यावर सूत कातले.स्वदेशीचा मंत्र दिला.दुष्ट इंग्रजाशी असहकार आंदोलन पुकारले. इंग्रजांनी मिठावर कर लादला होता.गांधीजींनी दांडीयात्रा काढली.मीठाचा सत्याग्रह केला.गांधीजींनी एक चिमूटभर मीठ काय उचललं, संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं.देश जागा झाला.गांधीजींनी निशस्त्र क्रांती केली. लोक त्यांना महात्मा गांधी म्हणू लागले.महात्मा म्हणजे महान आत्मा.गांधीजी धार्मिक होते.त्यांचा देवावर विश्वास होता.रामावर विश्वास होता.त्यांचे शेवटचे शब्द होते —“हे राम.” त्यांची शिकवण होती,“जग चांगलं करायचं असेलतर आधी स्वतः चांगले व्हा.” महात्मा गांधी की जयभारतमाता की जय.जय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)











