Uncategorized

Bhakt pundalik and pandurang

भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. 6 “भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा” भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा एकच नाही.पुंडलिक हा एक देवाचा भक्त होता — देव नव्हता! तो आपल्या आई-वडीलांनाच देव मानायचा. आई-वडिलांची सेवा हे आपलं कर्तव्य मानायचा. कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्य म्हणजे आपली जबाबदारी मनापासून पार पाडणं! हिंदीत यालाच दायित्व, आणि इंग्रजीत ड्यूटी म्हणतात. पुंडलिकाच्या भक्तीवर आणि श्रद्धेवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटायला आले! पण तेव्हाही पुंडलिक आईचे पाय दाबत होता. त्याने देवाला थांबायला सांगितलं.आणि एक विट श्रीकृष्णाच्या पायाखाली ठेवली. श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले म्हणून त्यांचे नाव विठोबा पडले.विठोबा म्हणजेच श्रीकृष्णाचे, विष्णूचे रूप. पंढरपूरच्या मंदिरात विटेवर उभे असलेले विठोबा —वाट पाहणारे देव आहेत.कुणाची वाट?– भक्ताची!– वारी करणाऱ्यांची!!– आपल्या सगळ्यांची!!! शेजारी उभी असलेली देवी म्हणजे रुक्मिणी. पंढरपूरची वारी, विठोबाची मूर्ती, पुंडलिकाचं कर्तव्य, आणि भक्तीचं बळ — हे सगळं आहे, आपलं, महाराष्ट्राचं वैभव! जय महाराष्ट्र!जय हिंद!भारत माता की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा Read Post »

sinhagad-fort-pune

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची )

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर – गोष्ट भारतीय इतिहासाच्या मालिकेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आधी चार-पाचशे वर्षे महाराष्ट्रात सुलतानांची जुलमी राजवट होती. ते माणसांना माणसांसारखे वागवत नव्हते. जनावरांसारखे वागवत होते. सुलतानांनी नेमलेले वतनदार जनतेला छळत होते. त्याकाळची ही गोष्ट आहे. सिंहगडाची. खूप उंच डोंगर. त्यावर गड. सिंहासारखा. म्हणून त्याचं नाव – सिंहगड! पूर्वी याचं नाव कोंढाणा होतं! कोंढाणा म्हणजे शूरवीरांचा डोंगर. कोंढाणा डोंगर दिवसात झोपलेला असायचा – शांत, निवांत, गडावरच्या पक्ष्यांसारखा. पण शत्रू जवळ आला की, तो जागा व्हायचा – सिंहासारखा गुरगुरणारा, वाऱ्यासारखा झेपावणारा! कोंढाण्याच्या पायथ्याला शूर लोक राहत होते – धाडसी, रक्षण करणारे! कोणी शेतकरी, कोणी लढवय्ये, कोणी गड राखणारे. एका रात्री, गावात बातमी आली “शत्रू येत आहेत! किल्ला घ्यायला!” पण लोक घाबरले नाहीत. एक धाडसी तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं भिला. भिला म्हणाला: “आपण गडावर राहतो. तो आपला आहे.गड राखणं हे आपलं काम आहे. कोण कोण येणार माझ्याबरोबर. सगळे धावत आले – मुलं, मोठे, बायका, आजी-आजोबा सर्वांनी मिळून कोंढाण्याच्या मुख्य दरवाजाला लोखंडाची जाड मोठ्ठी साखळी बांधली. शत्रू आले, पण त्यांना आत येता आलं नाही. सामान्य लोकांच्या धाडसामुळे गड टिकला. शत्रू हरला. कोंढाणा हसला. म्हणाला: “माझे लोक जागे आहेत. मी झोपणार नाही!” हे डोंगर, हे किल्ले, हे आपलं इतिहासाचं धन आहे! म्हणा सगळ्यांनी: कोंढाणा उंच होता!कोंढाणा शूर होता!कोंढाणा आपला होता!कोंढाणा झुकला नाही!कोंढाणा हरला नाही!आपणही शूर वीर बनूआपल्या देशाचा गड राखू! छत्रपती शिवाजी महाराज की जय.भारतमाता की जय.जय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची ) Read Post »

Good Senior Couple

गोष्ट आम्हा दोघांची

जगावेगळ्या माणसाची आणि जगावेगळ्या लेखकाची ओळखसुद्धा जगाववेगळीच असायला हवी. नाही का? मी स्वतःबद्दल प्रथमपुरुषी प्रथमवचनी ओळख लिहायची असे ठरवले. म्हणून ही “लेखकाची ओळख : माझी गोष्ट, आमची गोष्ट”. अशी काही स्वलिखित पुस्तकात, स्वतःची गोष्ट लिहिण्याची प्रथा नाही. पण माझ्यासारखे आयुष्य जगण्याची तरी कुठे प्रथा आहे? मी जरा वेगळा, वेगळा, वेगळाच, (चौकट राजा) आहे, हे मला अगदी लवकरच, लहानपणीच समजलं होतं. मी माझं वेगळेपण ओळखल्यामुळे व जपल्यामुळेच माझी कारकीर्द घडली. यालाच इंग्लिश मध्ये ‘करिअर’ म्हणतात. करिअर म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय नाही. करिअर म्हणजे कारकीर्द. तुम्ही आयुष॒यात जे काही करता, ती कारकीर्द. कुणाचीही कारकीर्द १/३ स्वतः व्यक्तीवर, १/३ कुटुंबावर, आणि १/३ समाजावर, मित्र, शाळा, कॉलेज, सहकारी किंवा परिस्थितीवर अवलंबून असते. वयानुरूप आणि अनुभवानुरूप स्वतःचा विकास होत जातो. क्षमता वाढत जातात. आणि तुम्ही जास्त चांगलं काम करू लागता. बुद्धिमत्ता (आय क्यू) वाढत नाही. पण कामगिरी चांगली होत जाते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती काळानुसार आणि वेळेनुसार बदलती राहत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कारकीर्दीला अनेक वळणे मिळत असतात. नव्या संधी व नव्या दिशा निर्माण होतात. हे काळा बरोबर स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला पालटण्याचे गणित मला फार चांगले जमले. मी 100 % बारामतीकर. आमची डॉक्टरकीची तिसरी पिढी. आता आमची चौथी पिढी सुद्धा डॉक्टर झालेली आहे. 75 वर्षाची वैद्यकीय व्यवसायाची परंपरा. माझे शिक्षण बारामतीत. लेखन, वाचन भाषण, नाटक, अभ्यास यात कायम पुढे. एमबीबीएस नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल मधे, डीसीएच सायन हॉस्पिटल मधे, एमडी, एफसीपीएस वाडिया चिल्ड्रन मधे. फेलो इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स मुंबईमध्ये आणि पीएचडी पेडिॲट्रिक्स बालविकास व वाढ क्षेत्रात पुणे विद्यापीठात, बीजे मेडिकल, ससूनमधे. हे माझं शिक्षण. भरपूर ओपीडी. भरपूर इन डोअर. मस्त व्यवसाय. माझी पत्नी डॉक्टर माधुरी, सोलापूरची एमबीबीएस. डिलिव्हरी सिझर, बिझी. आणि माझ्यासारखा जगावेगळा माणूस आयुष्यभर सांभाळला. मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनियर. आमच्या बाल कल्याण केंद्र मतिमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. माझी सून अंकिता आमच्याच की मूकबधिर शाळेमध्ये शिक्षिका. माझा नातू समिहन (१०), व नात कनक (२) हे दोन घटक आमचा वर्तमानकाळ व्यापून, भविष्यकाळातील कारकीर्द घडवत आहेत. अॅपटीट्युड टेस्ट, कल चाचण्या, आय क्यू टेस्ट म्हणजे कंपास पेटीतील सहा इंची पट्टीने १० एकर जमीन मोजण्यासारखं आहे. मला स्वतःला नाटकाची आवड. मी स्वतःला नाटकवाला मानतो. डॉक्टर झालो नसतो तर ॲक्टरच झालो असतो. अगणित नाटकात कामे केली. कॉलेज, विद्यापीठ, राज्य नाट्य महोत्सव, नाट्य साधना. विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे. आम्ही नाटक घेऊन इंग्लंड अमेरिका कॅनडा प्रवास केला. गणेशोत्सवात, खेडोपाडी, साखर कारखान्यांवर, इरिगेशन कॉलनी मधे अनेक प्रयोग. मस्त मित्र परिवार. फुल एन्जॉय. पण एके दिवशी उपरती झाली. मला अमाप आनंद मिळायचा. पण कुटुंबाचा आणि समाजाचा त्यात काहीच फायदा होत नव्हता. जगाची लाईफस्टाईल वेगळी आणि नाटकवाल्यांची लाईफस्टाईल वेगळी. मॅच होईना. माझ्या आयुष्याच्या ध्येय धोरणात नाटक काही बसेना. माझं प्रथम कर्तव्य समोर येणाऱ्या आईच्या बाळाला सेवा देण्याचं आहे. त्यामुळे ठरवून जड अंतःकरणाने संपूर्ण नाट्यसंन्यास घेतला. नंतर सुरू झालं भाषणांचं युग. दुसरी तिसरीत असतांनाच आमचे दिक्षित गुरुजी नगरपरिषदेच्या सर्व शाळातून “बघा कसा घडाघडा सकाळ वाचतोय ते” असे सांगत फिरवून आणायचे. मग भाषणे, कथाकथन, नाट्यवाचन, वादविवाद स्पर्धा. माझी ओरेटरी जी बहरली ती आजयागायत पुरते आहे. मेडिकल असोसिएशन, महिला मंडळे, गणेशोत्सव, शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, राज्यभर, देशभर, हजारो भाषणे. पंधरा-वीस वर्षे चालले ते प्रकरण. मजा आली. धमाल एन्जॉय केलं. पण समाजाचं त्यानी काय भलं होतंय, मोजमाप करता येईना. माझ्या मलाच नोंदीही करता येईनात. माझा बायोडाटा मात्र अधिकाधिक इम्प्रेसिव होत गेला. पण बायोडाटा मोठा करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नव्हतेच. आणि एके दिवशी वेळेचा फार अपव्यय होतो या कारणास्तव मी भाषणे बंद केली. लेखनाचं क्षेत्र मात्र फार लाभी ठरलं. जर्नल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, विशेष पुरवण्या शेकडो लेख छापून आले. येताहेत. अनेक लेख, विज्ञान कथा, पुस्तके. अनेक प्रकाशन संस्थांनी ती छापली. माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाची नुसती यादी द्यायची तरी दोन पाने लागतील. म्हणून मी त्या यादीला आणि मला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांना संपूर्ण फाटा देतो.व्यवसाय सुरु करण्यापूर्वी डॉ.किरण शहा या माझ्या मित्राने “तुला किती उत्पन्न अपेक्षित आहे” असा प्रश्न विचारला. पहिल्याच महिन्यात अपेक्षेच्या पाचपट उत्पन्न झाले. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी व्यवसाय कधी करावाच लागला नाही . व्यवसाय करत गेलो पैसे मिळत गेले . काका काकू (फॅमिली ॲडॉप्शन मुळे आई-वडील) डॉक्टर असल्याने व्यवसायाच्या पहिल्या दिवशीच हॉस्पिटल , कार , बंगला हजर होते . आई वडिलांनी सांगितले नाव कमव पैसे आपोआप मिळतील. मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी (1978) तज्ञ सल्लागार ही संकल्पनाच समाजात नव्हती. इंजेक्शन नाही औषध नाही, मग पैसे कशाचे द्यायचे? असा प्रश्न असायचा. बिन इंजेक्शनचा व्यवसाय करायला फार मोठे धैर्य लागले. अगदी ‘एकला चालो रे’ किंवा महात्मा गांधींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ सारखे. आणि तो घेतला वसा मी आजवर (74) सोडला नाही. बारामतीच्या शंभर किलोमीटर परिसरात, पुणे सातारा नगर सोलापूर या चार जिल्ह्यांच्या मधल्या टापूत पंधरा वर्षे मी एकटाच बालरोग तज्ञ होतो. फुल मोनोपली. वैद्यकीय सत्ता. प्रवासाच्या सोयी नव्हत्या. अंधश्रद्धा, बाहेरचं, देवाचं, अशा अनेक अडचणी होत्या. समाज प्रबोधन हे वैद्यकीय सेवेपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. खेडोपाडी लोकांच्या सोयीसाठी विजिट करावी लागे. जी पी डॉक्टरांना देखील बालरोग तज्ञाची गरज समजून सांगावी लागे. तुम्ही सेप्ट्रान देता, आम्हीही सेप्ट्रान देतो. मग तुमची गरज काय? असा प्रश्न होता. पंधरा-वीस वर्षे ‘आठवडी बाजार करणारा’ देशातील मी एकमेव बालरोगतज्ञ असावा. खेडोपाडच्या आठवडी बाजारात, एखाद्या दवाखान्यात जाऊन, पेशंट बघायचे. ज्या गावात नवीन बालरोग तज्ञ येईल, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ‘गावाची गरज भागली’ असे जाहीर करून विजिट बंद करायची. ही मोडस ऑपरंडी. त्यातही समाजसेवेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोनच जास्त होता. नामांकित, मानांकित होता येतं. हज्जारो ट्युबेकटोमी ऑपरेशनला असिस्ट करणारा बालरोगतज्ञ म्हणून माझा जागतिक विक्रम असेल. आधीची वीस वर्षं आईबरोबर, नंतरची वीस वर्षं बायकोबरोबर ! कौटुंबिक जबाबदारी. एकदा कौटुंबिक चर्चेत पुण्याचे डॉक्टर डी. बी. शिरोळे इतके ग्रेट का आहेत. त्यांच्यात असं काय स्पेशल आहे की सगळं जग त्यांचा आदर करतं, असा विषय निघाला. माझं असेसमेंट होतं, त्यांनी समाजाला गरज असताना, शेकडो बालरोगतज्ञ निर्माण करून, समाजाला दिले. ते नुसते व्यावसायिक होऊन पैसे गोळा करत बसले नाहीत. ते शिक्षक झाले. यातच त्यांच्या ग्रेटपणाचे रहस्य आहे. यावर माझ्या भावाचे उत्तर होतं “तुला कोणी सांगितलं तू शिक्षक होऊ नकोस म्हणून. तू शिक्षक हो.” आता बारामतीत राहून वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात शिक्षक होण्याचा मार्गच नव्हता. पण “जर्नल ऑफ रुरल पेडिॲट्रिक्स” काढून मी तो मार्ग शोधला. माझं जर्नल अमर्याद यशस्वी झालं. खेडोपाडी, राज्यभर, भारतभर, जगभर मला ओळख मिळाली. माझे विद्यार्थी निर्माण झाले बालआरोग्यक्षेत्रात बारामतीत मी अनेक गोष्टी पहिल्यांदा सुरू केल्या. लहान मुलांचा ईसीजी, इईजी, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी एनआयसीयु, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यातच नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारे रिस्पिरेटर मशीन मी बारामतीत संशोधन करून बनवले. त्याचे ऑफिशियल सरकारी पेटंट मिळाले. देशभर हजार एक मशीन विकली. पण धंदा व्यवसाय करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नसल्याने

गोष्ट आम्हा दोघांची Read Post »

Scroll to Top