रामायणाच्या गोष्टी 12 – लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि वनवासाची तयारी.

रामाच्या वनवासाची बातमी ऐकून लक्ष्मणाला खूप राग आला. त्यानी रामाला सांगितले आपण अन्यायाविरुद्ध लढायला हवे. आपण तुझा राज्याभिषेक करू. कोण आडवे आले तर मी युद्ध करीन.

पण रामानी ठामपणे सांगितले. लक्ष्मणा, शांत हो. परिस्थिती नाजूक आहे. हा रघुवंशाच्या सन्मानाचा व अभिमानाचा, प्रश्न आहे. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणार. राज मुकुटा पेक्षा मला कर्तव्य मोठे वाटते.

लक्ष्मण म्हणाला असं असेल तर मी ही तुझ्याबरोबर वनवासात येणार. कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ सोडणार नाही. रामाने ते मान्य केले. सितेनीही वनवासात रामाला सोबत करण्याचा हट्ट धरला. आणि तो रामाला मान्य करावा लागला.

सगळे दुःखात होते. राजा दशरथ दुःखाने चक्कर येऊन पडला होता. त्यांनी रामाला विनंती केली की मला सोडून जाऊ नको रे. राणी कैकयीने मला दुष्ट पणे फसवले आहे.

रामाने विनम्रपणे सांगितले की आयोध्या राजसत्ता राजेशाही जीवन याचा मला अजिबात मोह नाही. आता यापुढे वनवास आणि आदिवासी जीवन हेच माझ्या मालकीचं आहे

दुष्ट कपटी मंथराने कैकेयीच्या मदतीने आधीच त्यागाचं प्रतीक असलेली भगवी वस्त्रे कैकयीच्या मदतीने आणून ठेवली होती. राम लक्ष्मण आणि सीता भगवी वस्त्रे घालून आपल्या कुटुंबाला आणि राजमहालाला सोडून जंगलात वनवासात जाण्यासाठी रथाच्या दिशेने निघाले.

प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय

Scroll to Top