रामायणाची ओळख
मुलांनो, आजपासून दररोज मी तुम्हाला रामायणाची एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट फक्त पाच मिनिटांची असेल, आणि तुम्हाला ती माझ्या मागोमाग म्हणायची आहे.
हजारो वर्षांपूर्वी श्रीराम भारतामध्ये होऊन गेले. राम हा तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता. राजा दशरथ यांचा मुलगा होता. पण तो सर्वोत्तम माणूस होता. पुरुषोत्तम होता. म्हणजे उत्तम पुरुष होता. लहानपणी तो तुमच्यासारखाच लहान मुलगा दिसायचा. पण त्याच्या अंगात खूप चांगले गुण होते. तो सुसंस्कारी होता. विश्वामित्र ऋषींसोबत जंगलात जाऊन त्यांनी राक्षसांचा नायनाट केला. विश्वमित्र ऋषीं सोबत नेपाळमधील जनकपुरी या गावी जाताना त्यांनी अहिल्येचा उद्धार केला. एका शापामुळे अहिल्येचा दगड झाला होता. रामानी त्या दगडाला हात लावल्या लावल्या अहिल्या प्रकट झाली . रामानी स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडून सीतेशी लग्न केले. रामाचे लहान भाऊ लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचे सुद्धा सीतेच्या लहान बहिणींशी लग्न झाले.
अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला. रामाला 14 वर्षे वनवास सहन करावा लागला. सोनेरी हरणाचा पाठलाग करता करता दुष्ट व राक्षस रावणाने सीतेचे अपहरण केले. सीतेला पळवून नेले. सीतेला सोडवून आणण्यासाठी राम श्रीलंकेत गेला. या मोहिमेमध्ये जटायूचा मृत्यू झाला. त्यांनी सुग्रीवाशी हात मिळवणी केली. आणि वालीला मारले. समुद्र ओलांडला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला मारले. हनुमानाच्या मदतीने श्रीलंकेला आग लावली आणि सीतेची कैदेतून सुटका करून आयोध्येत परत आणले.
अशा अनेक गोष्टी आणि घटनांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. तेथे तुम्हाला रामायणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांसोबत इतर महत्त्वाच्या गोष्टी ऐकायला मिळतील.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

