#30
- वरण, भात, भाजी, भाकरी इळातून चार बार हेच आहारशास्त्राचे सार.
- वाढीची इंजेक्शने व टॉनिकच्या बाटल्या दिल्याने डॉक॒टरचे वजन वाढते ,मुलांचे नाही.
- मिश्र आहार दर्जेदार असतो.
- उपासमार झालेल्या मुलांची भूक मरते.
- आजारातून उठण्यासाठी आणि वाढ़ीसाठी जास्त प्रथिनांचा पुरवठा आवश्यक आहे.
(शेंगदाणे, फुटाणे, उसळ, डाळी, अंडी, मटन, मासे) - पुरेसे उष्मांक देणा-या आहारात पुरेशी प्रथिने असतातच.
- लोणी खाल्याने श्रीकृष्ण होतो दुध पिल्याने पेंद्या
- पिष्ठमय पदार्थ व स्निग्ध पदार्थ उष्मांक देतात. वजन वाढवतात.
- प्रथिने म्हणजे शरीराच्या इमारतीच्या विटा आहेत.
- फळे व भाज्या जीवनसत्वे व खनिजे देतात. म्हणून त्यांना प्रतिकारशक्ती वर्धक आहार म्हणतात.
- पालेभाजीमधे लोहतत्व असते, रक्त लाल होते, परीक्षेत जास्त मार्क मिळतात. ज्यांना मार्क पाहिजे त्यांनी
भाज्या खाव्या, ज्यांना मार्क नको त्यांनी खाऊ नये. - डावानी वाढून घेतात व हाताने खातात ते मॅक्रोन्युट॒रिअंट. चमच्याने वाढून घेतात आणि चिमटीने
खातात ते मायक्रोन्युट॒रिअंट. - शेतकरी रोपांना विकत घेऊन मायक्रोन्युट॒रिअंट देतात. रोपे तरारतात.पण मुलांना कुणी
मायक्रोन्युट॒रिअंट देत नाहीत.मुले खुरटतात.(चटण्या, तेलबिया) - फसफस-या पेयात अन्नघटक काहीच नसतात.
- लहान मुलांचे पोटही लहान असते. त्यांना पाच वेळा खाऊ घाला.
- थोडे थोडे जास्त वेळा खाऊ घाला.
- सर्व आजारांचा आळ अन्नावर घेऊ नका. आहार आजार बरे करतो.
- आंबट चिंबट, तेलकट तुपकट बंद. हा शेजारणीचा सल्ला आहे. डॉक्टरांचा नाही.
- बिनखिशाचा शर्ट नको, बिन खाऊचा खिसा नको.
- शालेय विद्यार्थ्यांना डबा आणि न्याहरी आवशक आहे.
- घरातले अन्न मुलांच्या हाती लागेल असे ठेवा.
- खाण्याची जबरदस्ती केल्याने नवे प्रश्न निर्माण होतात.
- जेवण या विषयावर आईचे व मुलाचे भांडण नको प्रेम हवे
- मुलाला पाहिजे ते, मुलाला पाहिजे तेंव्हा, मुलाला पाहिजे तितके मिळावे. आईला पाहिजे ते, आईला
पाहिजे तितके, आईला पाहिजे तेंव्हा नको. - तो खात नाही म्हणून मी देत नाही असं म्हणून कसं चालेल ?
- मुलांनी दिवसभर कोंबडीच्या पिलासारखे दाणे टिपत राहावे
- मुलाच्या तोंडाचे कुलूप आईच्या हाताच्या किल्लीने उघडत नाही, स्वतःच्या हाताच्या किल्लीने उघडते.
- व्यवस्थित जेवणे हा सवयीचा प्रश्न आहे, भुकेचा नाही.
- सवय लावली तरच मुल खाते.
- सवय लावली तर नऊ महिन्याचे बाळ स्वतःच्या हाताने बटाटावडा खाते. सवय नाही लावली तर ५
वर्षाचे मूल आईच्या हाताने दूधभात खाते . - घरातले अन्न वारंवार द्या हळूहळू त्याला आवडायला लागेल.
- वजन कमी करायचे असेल तर निम्मेच खा.
- पदू वांगे खात नाही. गोष्ट. त्याने कधी खाल्लेच नाही.
- मन लावून, मनापासून जेवावे.
- फळे, दूध, उसळ, पोळी, भाजी, वरण, भात, पूर्ण कुटुंबाने खावे, एकत्र, गप्पा मारत.
- स्वयंपाकाला, करणाऱ्याला, ‘वा, मस्त’ म्हणावे, आभार, कौतुकाचे बोल, आदराने बोलावे.
- जेवतांना कटकटी, नि भांडणतंटे नको, प्रेमाची भाकरी गोड, कटुतेचे पेढे नको.
- योग्य ते, योग्य तसे, योग्य तेवढेच जेवला, तर शरीरच काय, स्वभावही होई चांगला
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

