7) लसीकरण
- आजार परवडला कि लस ? खरतर लस परवडते.
- टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा.
- आधुनिक लसींचे विज्ञान समजून घ्या.
- आधुनिक लसी हे फँड नाही .
- आधुनिक लसी म्हणजे डॉक्टरांचा व कंपन्यांचा पैसे उकळण्याचा धंदा नाही. ती विज्ञानाची फळे आहेत.
- पटवून घ्या. मोटरसायकल, मोबाईल, टी.व्ही, कॉम्प्यूटर जसे स्वीकारले तसे आधुनिक लसी स्वीकारा.
- रोगप्रतिबंधक इलाज आणि पँथी यांचा संबंध लावू नका.
- बारीक सारीक आजारात औषध कोणत्याही पँथीचे घ्या.
- पण लसीकरण मात्र आधुनिक करा.
- आजारी बाळालाही लसी द्या.
- कुपोषित बाळालाही लसी द्या.
- लसीकरण ही तातडीची बाब आहे.
- वेळापत्रकाप्रमाणे लसी पूर्ण करा.
- एकत्रित लसी दिल्याने सुयांची संख्या कमी हॉते, दवाखान्यात कमी वेळा जावे लागते.
- मेंदुज्वर लसीचा तापातल्या झटक्याशी काही संबंध नाही.
- मेंदुज्वर व न्युमोकोक्ल लसिंमुळे कान फुटणे, न्युमोनिया, मेनिन्जायटीस हे आजार टाळता येतात.
- पोलिओ इंजेक्शन तोंडाने डोस दिले असले तरी देऊन घ्यावे. जास्त गुणकारी असते.
- न दुख्नणाऱ्या लसी परवडत असेल त्यांनी जरूर द्याव्या.
- न दुख्नणाऱ्या व दुख्नणाऱ्या लसींचा गुण सारखाच असतो.
- सरकार पूर्ण देशाला फुकट द्यायला परवडेल एवढ्याच लसी देते.
- सगळ्या लसी देत नाही. सरकारला देशहित बघायचे असते. आपल्याला आपल्या बाळाचे हित
- बघायचे असते. माहितगाराच्या सल्ल्याने लसिकरणाचा निर्णय घ्या. सरकारी कर्मचारी
- माहितगार नसतात. सर्व नर्सेस, डॉक्टर माहितगार नसतात. सर्व आज्या, शेजारिणी माहितगार
- नसतात. सरकार देत नसेल त्या लसी खाजगीतून घ्या. मूल तुमचे खाजगी आहे. सरकारी नाही.
8) औषधे
- आवश्यक असेल तेव्हाच, तुम्हाला समजत असेल तरच औषधांचा वापर करा.
- प्रत्येक औषधांच्या वापरात थोडा तरी धोका असतोच.
- औषध हे दुधारी शस्त्र आहे.
- औषधांचे प्रयोग उंदरावर करा स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर नको.
- बंदुकीच्या गोळ्यांसारखीच औषधे अंदाधुंद वापरणे धोकादायक असते.
- बरेच आजार आपणहून बरे होतात.
- निसर्गच त्यांना बरे करतो. औषधे क्वचितच लागतात.
- योग्य आहार घेणा-या व्यकतीला जीवनसत्वे घ्यावी लागत नाहीत.
- इंजेक्शने जास्त गुणकारी नसतात,
- बहुतेक औषधे तोंडाद्वारे घेऊनसुद्धा तेवढाच गुण येतो.
- तोंडाद्वारे घेतलेल्या औषधापेक्षा इंजेक्शनद्वारे घेतलेली औषधे जास्त धोकादायक असतात.
- अँटीबायोटिक औषधे गरज असली तरच डॉक॒टरांच्या सल्ल्याने वापरा.
- सर्दी, गोवर, गालगुंड, जुलाब, इ. व्हायरल आजारात अँटीबायोटिक निरूपयोगी असतात.
- योग्य प्रमाणाइतकेच योग्य तितके दिवस औषध घेणे महत्वाचे असते.
- औषधाचे प्रमाण बाळाच्या वजनावर अवलंबून असते.
- आईच्या मनातला औषधांचा चमचा आणि डॉक्टरच्या मनातला चमचा वेगळा असून चालत नाही.
- एक चमचा म्हणजे ५ मी.ली.
- एक मी.ली. म्हणजे २० थेंब.
- औषध देण्यापूर्वी बाटली हलवून घ्या.
- अँटीबायोटिक औषधे कमीत कमी ३ दिवस द्या.
- अनेक औषधे एकदम घेणे धोकादायक असते.
- एका प्रोकेन पेनिसिलीन इंजेक्शनने कोणताच आजार बरा होत नाही.
- अंगावरच्या दुधाच्या बाळाला सहसा औषधे लागत नाहीत.
- औषधांची बाटली किती दिवसात संपवायची हे समजून घ्या.
- पावडर असलेल्या बाटलीत पाणी टाकून औषध बनवून द्या.
- पाण्यात विरघळणारी लहान मुलांची गोळी कशी द्यावी हे शिकुन घ्या.
- हट्टी मुलाला औषध पाजण्याची कला शिकुन घ्या .
9) ताप
- ताप हा मुलांचा शत्रू नाही, मित्र आहे.
- तो आजारांशी लढाई खेळतो.
- उन्हाळ्यात पत्रा तापतो, भांडी तापतात तशी मुले तापतात.
- त्यांना स्वतःचे शरीर थंड ठेवता येत नाही.
- आईला ते थंड करून द्यावे लागते.
- तापाचा सर्वात चांगला इलाज : ओल्या फडक्याने पुसून घेणे.
- ओला शर्ट पिळून अंगात घालणे.
- बाहेरून कोरड्या माठातले पाणी गार होत नाही.
- बाहेरून ओल्या माठातले पाणी गार होते.
- फक्त क्रोसिन एवढेच औषध तापाला पुरेसे आहे.
- बहुतेक तापलेल्या बाळांना इंजेक्शनची गरज नसते.
- तापलेल्या बाळाच्या खोलीत हवा खेळती ठेवा.
- तापलेल्या मुलांचा ताप मोजून लिहून ठेवा.
- ताप उतरावयाचा असेल तर बाळाच्या अंगावरचे कपडे काढा.
- तापलेल्या बाळाला भरपूर पाणी पाजा.
- तापाची औषधे शरीर थंड करत नाहीत. घाम आणतात. डायफोरेटीक
- शरीराला पाणी कमी पडलं तर तापाच्या औषधांचा गुण येत नाही.
- औषधाचा डोस कमी पडला तर तापाच्या औषधांचा गुण येत नाही
- लिंबू सरबत पाजा. जलसंजीवनी पाजा.
- खूप तापलेले बाळ खूप सिरिअस असतेच असे नाही.
10) नवजात बाळ
- जन्मल्यानंतर चार मिनिटात बाळाने श्वास घेतला नाही तर ते मतिमंद होते .
- जे बाळ छान रडते,अंगावर ओढते, तळहात तळपाय गुलाबी असतात, दोन्ही हात पाय जवळ ओढलेले असतात ते बाळ निरोगी असते.
- जे बाळ रडत नाही, अंगावर ओढत नाही, तळहात तळपाय निळे किंवा पांढरे असतात, दोन्ही हातपाय ढिले पडलेले असतात ते बाळ आजारी मानावे.
- वेळेला फार महत्व आहे.
- काही तासांच्या आजाराने नवजात बाळ मृत्युमुखी पडू शकते….
- उष्ण प्रदेशातदेखील नवजात गार पडू शकतात.
- कोरडी नाळ सेप्टिक होत नाही.
- ‘सेप्टिक बेंबी’ जीवघेणी ठरू शकते.
- आजारी आईने बाळाला अवश्य पाजणे चालू ठेवावे.
11) प्रथा आणि अंधश्रद्धा
- घरगुती उपचार करताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- घरगुती उपचार निर्धोक असावेत.
- सिरीअस आजाराला आधुनिक उपचारच बरे.
- जुन्या प्रथांचा आदर करा. त्यातच सुधारणा करा.
- चांगल्या प्रथांना उत्तेजन द्या.
- वाईट प्रथा मोडून काढा.
- नवजात बाळाला संडास व्हावी म्हणून १ चमचा मध व कोमट पाणी दोन वेळा पाजा.
- घसा धरल्यावर ‘हळददुध’ गुणकारी असते.
- तुलस, मध व आलं-लिंबू आधुनिक औषधांपेक्षा सर्दी खोक्ल्याला जास्त निर्धोक असतात.
- गोवर आलेल्या बाळाला प्रथेप्रमाणे तूप, मध व शेगंदाणे खाऊ घाला.
- बाहेरून आल्यावर पाय धुणे व जेवणाआधी हात धुणे या जुन्या प्रथा चांगल्या होत्या.
- उष्टावण सहाव्या महिन्याला करा.
- बाळाच्या अंगाला तेल लावा (तेल मुरेल, वजन वाढेल, इंफेक्शनचे प्रमाण कमी होईल)
- पण जोरजोराने रगडून चोळू नका(हाड मोडेल).
- शेक – शेगडी धोकादायक.
- नवजात बाळाच्या स्तनाची गाठ पिळू नका.
- शरीराच्या सर्व भोकातून तेल सोडायला बाळ म्हणजे काय मशीन आहे.
- डोळ्यात काजळ घातल्याने कुणाचे डोळे हेमामालीनिसारखे झालेत.
- चिक उपयुक्त असतो फेकू नका.
- म्हणजे पचायची भानगडच नको ! ! !
- पोटात गॅस नावाचे भूत असते. (खरे भूत नसतेच)
- ते घाबरणा-या आईच्या मानगुटीवर बसते.
- इंजेक्शनांवर अंधश्रध्दा म्हणजे सर्वात धोकादायक अंधश्रध्दा.
- ग्राईप वौटर मधील दारू ढोसून जाहिरातीतल्या बाईच्या तीन पिढ्या टेर झोपल्या.
- मेरी मां मुझे देती थी, दादी मां मेरी मांको देती थी. क्यों देती थी?
- क्योंकी उसमे दारू थी. सब पिके सोते थे.
- ‘मुडदूस काढणे’ हा प्रकार अडाणी व अशिक्षित लोक करतात. त्यावर विश्वास ठेऊ नका.
- दातांनी तापतयं, हागतयं, वकतयं, किरकिर करतयं,
- दाताची पट्टी बांधा, डिकामली लावा, इंजेक्शने, बाटल्या व साबुदाण्याच्या गोळ्या द्या,
- या दातांविरुद्ध बडबड करून माझ्या दाताच्या कण्या झाल्या
- पण जगाचा काही दातावरचा विश्वास जात नाही.
- दाताचं म्हटलं तर पटतं.पण ते खोटं असत‘.
- निष्पाप बाळाला देव कशाला आजारी करेल ? तो त्याला बरे करेल.
- जखमांना ‘पाणी लागू न देण्याच्या प्रथेने’ त्यात सेप्टिक होते.
- उलट जखमा साबण पाण्याने स्वछ धुवाव्या.
- जिभेने डोळ्यातील कचरा काढणे चूक आहे.
- गरम तेल कानात घातल्याने बहिरेपणा येण्याची शक्यता असते.
- फळे खाल्ल्याने आजार होत नाहीत, फळे खाल्ल्याने आजार बरे होतात.
- मानेचा अवटाळा काढणे म्हणजे बाळाला त्रास देणे होय.
- जुने ते नेहमीच सोने असते असे नाही.
12) डॉक्टर
- शेजारणीपेक्षा आणि आजीपेक्षा डॉक्टरांना जास्त समजते.
- जवळपासच्या डॉक्टरांशी प्रेमाचे संबंध हवे.
- दरवेळी वजन करणारा डॉक्टर चांगला डॉक्टर असतो.
- लहान मुलांचा वजनकाटा असलेला डॉक्टर निवडावा.
- एक भाजी करायला चार स्वयंपाकी लावले तर चारी स्वयंपाक्यांना पगार मिळतो. भाजी आपली बिघडते. विनाकारण डॉक्टर बदलू नका.
- डॉक्टरच्या सुईपेक्षा डॉक्टरवर जास्त विश्वास ठेवा.
- लोक मागतात म्हणून डॉक्टर इंजेक्शन देतात. डॉक्टर देतात म्हणून लोक इंजेक्शन मागतात.
आनंदी बालपण = यशस्वी मोठेपण
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

