श्रीराम श्रीराम श्रीराम !
राम लक्ष्मण सीतेच्या शोधात जंगलातून जात होते. त्यांना एका लहानशा झोपडीमधे शबरी नावाची आदिवासी स्त्री भेटली. ती फुलांच्या माळा बनवत असे. शबरी खूप साधी होती, पण मनाने खूप मोठी होती. ती रामभक्त होती. एक ना एक दिवस आपल्याला रामाचे दर्शन होईल अशी तिला आशा होती. हातात फुले आणि मुखात राम.
अचानक श्रीराम आणि लक्ष्मण आलेले पाहून शबरी खूष झाली. तिनी श्रीरामांसाठी जंगलातून बोरं आणली. एकेक बोर चाखून गोड बोरं रामासाठी ठेवली. ती साधी आणि शुद्ध मनाची होती. तिनी आपली श्रद्धा आणि प्रेम दिलं. श्रीरामांनी ती उष्टी बोरं मोठ्या आनंदानी खाल्ली. आणि शबरीचा निरोप घेऊन सीतेला शोधायला निघाले.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

