रामायणाच्या गोष्टी 23 – हनुमानाची वानरसेना जमली.

मारुती/हनुमान हा, वानरराज सुग्रीव याचा, सेनापती होता. त्यानी एक हाक देताच दाही दिशातून, वानर सैन्य धावत आले. त्यानी आपली वानरसेना जमवली. ते वानर सैन्य पाहता पाहता समुद्रासारखे पसरले. नर आणि वानर एकसाथ झाले. सीतेला शोधायची मोहीमच त्यांनी काढली.

सुग्रीवानी सांगितले राजाची आज्ञा म्हणून, हे काम, करू नका. हे रामकार्य आहे, अशा भावनेने करा. सीता ही, सापडलीच पाहिजे. सीता सापडल्या शिवाय कोणीही परत येऊ नका. दक्षिण दिशेकडे निघालेल्या हनुमानाला श्रीरामांनी आपल्या बोटातील अंगठी, काढून दिली. सीता भेटल्यावर ही अंगठी तिला दाखव. म्हणजे तुझी ओळख तिला पटेल असे सांगितले. हनुमानाचे सैन्य सीतेला शोधत शोधत जिथे जमीन संपते. आणि समुद्र सुरू होतो. तिथपर्यंत आले.

समोर अथांग समुद्र पसरला होता. आणि त्यापुढे रावणाची लंका होती. सीतेला शोधण्यात अजून एक गंभीर संकट पुढे उभे होते. हा समुद्र पार करून आपले सैन्य पलीकडे कसे न्यायचे हा प्रश्नच होता.

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Scroll to Top