श्रीराम श्रीराम श्रीराम !
सर्व संकटांवर मात करत हनुमान लंकेत पोचला. सगळीकडे राक्षसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कडक पहारा होता. काळे कुळकुळीत राक्षस हातात तळपत्या तलवारी घेऊन रस्त्यांवरून फिरत होते. दिवसाढवळ्या रावणाच्या राज्यात जाणे धोक्याचे होते. हनुमानानी रात्र होण्याची वाट पाहीली. आपले अजस्त्र शरीर सूक्ष्म करून अतिशय लहान करून एका डासाचे रूप घेतले. पण ही घटना नेमकी पहाऱ्यावर असलेल्या लंका नावाच्या राक्षसीणिनी पाहिली. तिला शंका आली. तिनी अडवलं.
हनुमानानी आपलं खरं रूप प्रकट केलं. आणि आपली एक कठोर वज्रमूठ तिच्या हनुवटीवर जोरात मारली. ती गप्प खालीच बसली. ज्या दिवशी, एका माकडा कडून तुझा पराभव होईल त्या दिवशी लंका नगरीचे वाईट दिवस सुरू होतील. हे भविष्य तिला माहित होते. तो दिवस आज आला आहे हे तिला समजले.
रावणानी सीतेला पळवून आणलेय पण कुठे ठेवलेय हे माहित नाही असं तिनी सांगितलं. डासाच्या रूपातला हनुमान, रावणाच्या महालात पोचला. पण त्याला सीता कुठेच दिसली नाही. तो सगळीकडे शोधतच राहिला.
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

