श्रीराम श्रीराम श्रीराम !
रामसेतू : सागरी पूल. सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी! वानर सेना आली रे लंकेसाठी निघाली रे.
श्रीरामांनी मुहूर्त पाहिला शिवलिंगाची स्थापना केली. रामेश्वर हे स्थान पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाली! नल-नील दोघे भाऊ पूल बांधती चातुर्याने. शिळा-वृक्ष गोळा करती सागरात टाकती युक्तीने! पण ते दगड बुडाले सर्व जण चिंतेत पडाले. हनुमानाने युक्ती सांगितली श्रीराम नाव कोरू लागले! शिळा सगळ्या तरंगू लागल्या रामाचा सेतू वाढू लागला. लंकेकडे वाट निघाली सारी वानरसेना आनंदली! आजही सेतू दिसतो इतिहास-विज्ञान सांगतो.
प्रवाळ-वाळूची निसर्ग निर्मिती सागरात पूल दिसतो ! तामिळनाडूच्या रामेश्वरमला जोडी श्रीलंकेच्या मन्नारला ४८ किलोमीटर अंतराला सिता मातेच्या मुक्तीला. रामसेतू उभारतांना हनुमानाची वानर सेना गर्जे बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी पवनपुत्र हनुमानकी जय सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

