श्रीराम, श्रीराम, श्रीराम!
एके दिवशी, राजा दशरथाला, त्याची चारी मुले, बागेमध्ये, धनुष्यबाण खेळताना दिसली. त्याच्या लक्षात आले, की मुलांना, आता शालेय शिक्षण, द्यायला पाहिजे. मुलांना आता, वेगवेगळ्या कला, व शास्त्रे, शिकायला पाहिजे. त्यांनी लगेच, आपले मंत्री सुमंत, यांना बोलवून, राजपुत्रांना, वशिष्ठ ऋषींच्या, आश्रमात, शिक्षणासाठी पाठवण्याची, व्यवस्था करण्याचे, आदेश दिले. श्रीरामाने, विनम्रपणे, आपले वडील सांगतील, तसे आम्ही ऐकू, असे उत्तर दिले.
चारी राजपुत्रांच्या, आयांची, संमती घेतली गेली. मुलांपासून, वेगळे राहण्याच्या, नुसत्या कल्पनेनेच, आयांना, धक्का बसला होता. शरीरातून, हृदय, बाहेर काढून ठेवण्याइतके, वेदनादायक, होते ते. पण मुलांना, शिक्षणासाठी, पाठवण्या वाचून, काही पर्यायच नव्हता. मुलांच्या, उज्वल भवितव्यासाठी, आणि, राजघराण्याची परंपरा, म्हणून ते, आवश्यकच होते. एक कर्तव्य म्हणून, आपल्या मुलांना, वेगळे करण्याचे दुःख, त्यांना सहन करणे, भाग होते.
दुसऱ्या दिवशी, चारी राजपुत्रांना, राजा दशरथ, आणि त्याच्या राण्यांनी, जड अंत:करणाने, निरोप दिला. राजपुत्रांनी, त्यांची राजेशाही, तलम वस्त्रे, अलंकार, आभूषणे, काढून ठेवली. आश्रमात, शिक्षणासाठी जाताना, त्यांच्या अंगावर, अत्यंत साधे कपडे होते. आता ते, इतर विद्यार्थ्यांसारखे, फक्त विद्यार्थी होते. राजपुत्र नव्हते. आश्रमात, गुरु वशिष्ठांनी, आश्रमाचे नियम, त्यांना समजून सांगितले. आणि मग त्यांना प्रवेश दिला.
काही वर्षातच, पवित्र ग्रंथ, आणि शहाणपणा, देणाऱ्या शिक्षणाचा, त्यांचा अभ्यास, पूर्ण झाला. वागावे कसे, जगावे कसे, हे तत्त्वज्ञान, त्यांना शिकवण्यात आले. ते राजधर्म शिकले. राज्य कसे चालवावे, हे शिकले. गुण, सद्गुण, कसे वाढवावे. आणि अवगुण, दुर्गुण कसे टाळावे, हे शिकले. सुसंस्कार, भारतीय संस्कृती, म्हणजे काय, हे शिकले. राजकारण, समाजकारण , व्यवस्थापन शिकले. चारी राजपुत्रांना, शेवटच्या परीक्षेत, अतिशय चांगले, गुण मिळाले.
ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

