श्रीराम श्रीराम श्रीराम !
मेघनादानी लक्ष्मणाला शक्तीबाण मारला. लक्ष्मण बेशुद्ध पडला. शुद्धीवर न आल्यास मरेल लक्ष्मण. म्हणाले वैद्य सुषेण. हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतावर. संजीवनी बूटी रामबाण उपाय या संकटावर. हनुमान वेगाने निघाला. हिमालयाच्या दिशेने झेपावला. अशा विस्तीर्ण रानी वनी. नेमकी ती कोणती संजीवनी. ओळखता येईना मारुतीला. वेळ नको दवडायला. लक्ष्मणाचा जीव लागलाय टांगणीला. उचलला अख्ख्या द्रोणागिरीला. हनुमान लंकेत परत आला. वैद्यांनी संजीवनी दिली लक्ष्मणाला. पुनर्जन्मच मिळाला लक्ष्मणाला.
हनुमानाचा पराक्रम, भक्ती, तत्परता, अडचणींवर मात, करण्याची जिद्द आणि संकटसमयी धैर्य. यामुळे लक्ष्मणाचा जीव वाचला. दिसू लागला विजय. वानर सैन्य गर्जले – पवनपुत्र, हनुमान की जय.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

