श्रीराम, श्रीराम, श्रीराम!
राजपुत्रांचा रथ अयोध्येच्या जवळ येऊ लागला तसतसा नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. गावाच्या वेशीवर राजपुत्रांना डोळे भरून पाहण्यासाठी तुडुंब गर्दी जमली. ढोल, नगारे, ताशे, बिगुल, शंख, तुतार्यांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला. राजपुत्रांच्या स्वागतासाठी आयोध्येतील नागरिकांनी शहर सुशोभित केले होते. नव्या नवरी सारखे. नटवले होते.
राजपुत्रांचे तेज पाहून अयोध्यावासी थक्क झाले होते. लोकांनी राजपुत्रांचा जयघोष केला. गावातल्या स्त्रियांनी त्यांना आशीर्वाद दिले. काहींनी ओवाळले तर पुरुषांनी स्वागताच्या घोषणा दिल्या.
राजवाड्यात तर राजा दशरथ, राण्या, सगळे मंत्री आणि शहरातले प्रतिष्ठित नागरिक आतुरतेने राजपुत्रांची वाट पाहत होते. आल्या आल्या श्रीरामाने राजा दशरथाचे पाया पडून आशीर्वाद घेतले. राजाने त्यांना प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. राजा दशरथाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते.
नंतर चारीही राजपुत्र आयांच्या पाया पडले. सगळेजण, माय लेकरांच्या भावनिक पुनर्भेटीचे साक्षीदार होत होते. राण्यांनी राजपुत्रांचे औक्षण केले. त्यांना ओवाळले.
दुसऱ्या दिवशी राजा दशरथांनी मुलांना राज दरबारात बोलवून घेतले. आश्रमातल्या शिक्षणाचे त्यांचे अनुभव सांगायला सांगितले.
ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

