श्रीराम श्रीराम श्रीराम !
रामाने, सीतेला स्वीकारले. पण एक, अट टाकली. सीतेने परत, जनतेसमोर , अग्निपरीक्षा द्यावी. आपली पवित्रता, सिद्ध करावी. लंकेत तिने आधीच अग्निपरीक्षा दिली होती. पण अयोध्येच्या काही मूठभर लोकांचा त्यावर विश्वास नव्हता. ते म्हणत. वर्षभर रावणाच्या ताब्यात असलेली सीता शुद्ध कशी. या प्रश्नाचे उत्तर रामा जवळ नव्हते.
राजाला उत्तर देणं आवश्यक होतं. राज्यात आणि आजू बाजूला दुष्ट राक्षसी प्रवृत्ती घातपाती कारवाया दंगली करत होत्या. राजावर प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी होती. पत्नीला न्याय देण्यासाठी राज्य सोडता येणार नव्हते. त्यानी निर्णय घेतला. राष्ट्र प्रथम.
रामाला दुःख झालं. पण कर्तव्याला प्राधान्य देत त्याने अग्निदिव्याची अट घातली.
सीता त्यातून सुखरूप निष्कलंक बाहेर पडेल याची त्याला खात्री होती.
पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सीतेने पृथ्वीमातेला विनंती केली. ‘मी निःकलंक असेन तर मला आपल्या कुशीत घे’ त्या क्षणी पृथ्वी दुभंगली तेजस्वी प्रकाश पसरला आणि भूमातेने सीतेला आपल्या कुशीत घेतलं.
लव-कुश आईला वाचवायला धावत गेले, पण तोपर्यंत सीता अदृश्य झाली होती. राम, दुःखाने कोसळला.
जमिनीला पडलेल्या भेगा मिटल्या होत्या. सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती. सीतेचा अध्याय संपला होता. आता आदर्श पत्नी आदर्श पतिव्रता आदर्श राणी आदर्श माता सीतामाता पृथ्वीवर कधीही कोणालाही दिसणार नव्हती. हे कटू सत्य स्वीकारून सर्वांना पुढचं आयुष्य जगावं लागलं.
जगायला आधार एकच उरला होता.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)