अखेर, बाळांच्या जन्माची, वेळ आली. राजा दशरथासह, संपूर्ण अयोध्या नगरी, आनंदात होती. भारतीय पंचांगानुसार, चैत्र नवमीला, दुपारी बारा वाजता, कौशल्या मातेच्या पोटी, श्रीरामांचा जन्म झाला. कैकेयीला एक, आणि सुमित्रा राणीला, जुळी मुलं झाली. म्हणजे, दोन मुलं झाली. चार चार राजपुत्रांच्या, आगमनाने, सगळे, आनंदाने बेभान झाले.
ही, आनंदाची बातमी, घेऊन येणाऱ्या सेविकेला, राजा दशरथानी, गळ्यातला, मौल्यवान मोत्यांचा हार, बक्षीस म्हणून दिला. शहरात हत्तीवरून, साखर वाटली गेली. मिठाई वाटली गेली. प्रजेला, विविध वस्तू, भेट रूपाने, देण्यात आल्या. राजवाड्यात, आणि संपूर्ण गावात, नाच गाणी, रंगांची, अत्तरांची, फुलांची, दिव्यांची, उधळण झाली. उत्सव, साजरा करण्यात आला. तेव्हापासून, आजपर्यंत, संपूर्ण भारत देश, हजारो वर्षे, राम जन्माचा उत्सव, साजरा करत आहे.
वशिष्ठ ऋषी, आणि श्रिंगी ऋषी, यांच्या सल्ल्यानुसार, चारही बाळांचे, बारसे करण्यात आले. त्यांची, नावे ठेवण्यात आली राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न. जवळजवळ, एक महिना, हा समारंभ, चालला.
राजगुरूंनी यज्ञ केला. जन्मवेळेच्या, ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा, वैज्ञानिक अभ्यास करून, चारही बाळांची, कुंडली मांडली. आणि शास्त्राचा अर्थ लावून मुलांची नावे ठरवली.
कौशल्येचा मोठा मुलगा प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहे. म्हणून त्याचे नाव राम असे ठेवले.
कैकयीचा दुसरा मुलगा, सर्वांचे भरण पोषण करेल, म्हणून त्याचे नाव भरत असे ठेवले.
सुमित्रेच्या मोठ्या मुलामधे
उदात्त गुण आणि शौर्य आहे म्हणून त्याचे नाव लक्ष्मण असे ठेवले.
लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रूचा कर्दनकाळ ठरेल म्हणून त्याचे नाव शत्रुघ्न असे ठेवावे.
चारही राजपुत्रांचे पालन पोषण राजेशाही थाटात प्रेमाने होऊ लागले. त्यांची प्रगती पाहून सगळ्यांना आनंद होत असे.
ही कथा अजून थांबलेली नाही! राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या बालपणातील अद्वितीय गोष्टी ऐकण्यासाठी आणि अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी, कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा. आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

