रामायणाच्या गोष्टी 6 – राक्षसांपासून रक्षणासाठी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात राम-लक्ष्मण

अयोध्येत सुख, समाधान, शांतता होती. बुद्धिवान, चारित्र्यवान, आणि कौशल्यवान राजपुत्र असताना, कुणाला कशाची भीती. पण हा, सुखाचा काळ, असाच राहणार नव्हता. लवकरच राज्यावर एक संकट येणार होते.

एक दिवस, विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या दरबारात अचानकपणे हजर झाले. राजानी त्यांचे यथायोग्य स्वागत केले. दशरथ राजाने विश्वामित्र ऋषींना विचारले की “महाराज, आपल्या पवित्र पायाची धूळ आमच्या राजदरबारात कशासाठी आली बरे”.

विश्वामित्र ऋषी म्हणाले हे राजाधिराज राक्षसांनी आमचे आयुष्य असे करून टाकले आहे. आमचा ज्ञानयज्ञ, निर्णायक टप्प्यावर आला की ही दुष्ट माणसे मोडतोड करतात, आरडा ओरडा करतात, गोंधळ घालतात, राडा करतात. राक्षस आमचा यज्ञ अपवित्र करतात. ही भुतावळ यज्ञाचा पवित्र अग्नी अशुद्ध करते. एक राजा म्हणून आम्हाला व आमच्या ज्ञानयज्ञाला संरक्षण देणे हे तुझे कर्तव्य आहे”.

राजाने सांगितले, गुरुवर्य, आपण काळजी करू नका. मी सैनिक पाठवतो. आमचे सैनिक दुष्ट शक्तींचा बंदोबस्त करतील. त्यांना नष्ट करतील.

विश्वामित्र म्हणाले “राक्षस खूप शक्तिशाली आणि धूर्त आहेत. सैनिकांचाच हकनाक बळी जाईल”.

राजा म्हणाला, “मग आता करायचे काय. मी स्वतः येऊ का, आपल्या रक्षणासाठी?”

विश्वामित्र म्हणाले, “नाही राजा, आपण स्वतः येण्याची काही गरज नाही. आपले शूर वीर पुत्र राम लक्ष्मण या दोघांना फक्त, माझ्याबरोबर पाठवा.

राजा म्हणाला माझी मुलं अजून कोवळ्या वयाची आहेत. अननुभवी आहेत. राक्षसां सारख्या दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्या साठी, तयारीचे नाहीत”.

राजाचे, हे शब्द ऐकून, विश्वामित्र ऋषी, रागाने ताडकन उठले, आणि म्हणाले, राजा, नाही म्हणायचे असेल, तर स्पष्ट नाही म्हण. लंगड्या सबबी सांगू नकोस.

ते ताडताड, बाहेरच्या दाराकडे निघाले. आणि म्हणाले राजा रघुवंशातील राजाच्या दरबारातून ऋषींना नाराज होऊन मोकळ्या हातांनी जावे लागते हे आता आम्हाला समजले.

ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा.

प्रभू श्री रामचंद्र की जय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top