श्रीराम, श्रीराम, श्रीराम!
जंगलातल्या आश्रमाकडे जातांना, विश्वामित्र ऋषी, राम लक्ष्मणांना, राक्षस कसा त्रास देत आहेत हे वर्णन करून सांगत होते. अचानक ढगातून, गडगडाट व्हावा, असा आवाज आला. साऱ्या सृष्टीला, हादरवून सोडणारे, विकट हास्य करीत, एक अक्राळ विक्राळ, अजस्त्र राक्षसिण, त्यांचा रस्ता अडवून, उभी होती. ती विश्वामित्रांना म्हणाली. तुम्ही तुमच्या रक्षणासाठी, या कच्च्या-बच्चांना, आणलेत. मी तर यांना, केळ्यासारखं, खाऊन टाकीन. झडप घालून, अजस्त्र हाताने, ती रामाला, एक झापड मारणार, तोच विश्वामित्र म्हणाले.
रामा, काळजी घे, हीच आहे ती, त्राटिका. तिचा हात, रामापर्यंत पोचायच्या आधीच, रामाच्या बाणानी, त्राटिकेचा, वेध घेतला. आणि ती क्षणार्धात खाली पडली.
रामाने शौर्याने व कौशल्याने त्राटिकेला मारले. विश्वामित्र खुश झाले आणि म्हणाले. तुम्हा दोघांची निवड करण्यात माझी अजिबात चूक झाली नाही. माझी निवड अगदी योग्य होती.
आश्रमात पोचल्यावर रामाने सांगितले गुरुवर्य आता आपण आपला यज्ञ निर्वेधपणे चालू ठेवू शकता. आम्ही दोघे भाऊ यज्ञाचे रक्षण करू.
त्राटिकेच्या मृत्यूची बातमी ऐकून, तिचे दोघे राक्षस भाऊ, सुबाहू, आणि मारीच, रागाने वेडेपिसे झाले. इतर राक्षसांना घेऊन, ते तडक यज्ञाच्या जागी पोचले.
यज्ञ सुरू झाला होता. ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा.
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

