रामायणाच्या गोष्टी 8 – अहिल्या शिळा राघवे मुक्त केली.

मिथिलेचा राजा जनक, याची मुलगी सीता, हिचे त्याने, स्वयंवर, करायचे ठरवले होते. स्वयंवराच्या अटी, पूर्ण करणाऱ्या, व सीतेला आवडणाऱ्या राजपुत्राशी, तिचे लग्न होणार होते. विश्वामित्र ऋषींना, त्यांचे निमंत्रण आले.

विश्वामित्र ऋषींनी, राजा दशरथाची, परवानगी घेतली. आणि राम लक्ष्मण, यांना घेऊन, स्वयंवरासाठी निघाले.

जंगलातून जात असताना, एका निर्मनुष्य ठिकाणी, राम लक्ष्मण यांना, एक झोपडी दिसली. त्या झोपडीमधे, एक दगडाची, मानवी मूर्ती होती. दोघांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी विश्वमित्र ऋषींना विचारले कुणाची आहे ही झोपडी, आणि ती दगडाची मूर्ती, कुणाची आहे.

त्यांनी सांगितले, ही झोपडी गौतम ऋषी, यांची आहे. आणि ती दगडाची मूर्ती, गौतम ऋषींची पत्नी, अहिल्या, हिची आहे. गौतम ऋषींच्या, एका शापामुळे, तिची, दगडाची मूर्ती, झाली आहे.

गौतम ऋषींची बायको, अहिल्या, ब्रह्मदेवाची मुलगी होती. ती अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्यावर भाळून, मायावी शक्तीनी, ऋषी गौतम यांचे, रूप घेऊन. झोपडीत प्रवेश केला. स्वतःच्याच रूपातील, दुसरी व्यक्ती बघून, गौतम ऋषींचा राग, अनावर झाला. त्यांनी अहिल्येला, शाप दिला. आणि त्या, शापाचा परिणाम म्हणून, अहिल्येचे, दगडी मूर्तीत, रूपांतर झाले. पण त्यात, आपल्या पत्नीची, काहीच चूक नव्हती, हे त्यांच्या, लक्षात आले. त्यांनी, उ:शापही, दिला. जेव्हा केव्हा, श्रीरामांच्या, पवित्र पायाचा स्पर्श, या दगडाला होईल, त्यावेळेला तू, परत, मानवी रूपात येशील. विश्वामित्र ऋषींनी, आज्ञा दिली, की रामाने, आपला पवित्र पाय लावून, शिळा, म्हणजे दगड झालेल्या, अहिल्येचा उद्धार करावा. तिला शापातून मुक्ती द्यावी.

रामाच्या, पवित्र पायाचा, स्पर्श होताच, त्या दगडातून, दिव्य स्वरूपात अहिल्या प्रकट झाली. तिनी अतिशय भक्ती भावाने, रामचंद्रांचे, पाय धरले. श्रीरामांच्या पायांवर, तिच्या अश्रूंचा, अभिषेक होत होता. ती आज, स्वतःला, धन्य समजत होती. भाग्यवान समजत होती. तिला प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन झाले होते. तिनी त्यांचे, आशीर्वाद मागितले.

ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा.

प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top