रामायणाच्या गोष्टी 9 – स्वयंवर झाले सीतेचे

दुसऱ्या दिवशी, सकाळी सकाळी, विश्वामित्र, श्रीराम आणि लक्ष्मण, यांना घेऊन, स्वयंवर मंडपाकडे, निघाले.
स्वयंवर मंडप माणसांनी फुलून गेला होता. पृथ्वीवरचे सर्व राजे तिथे हजर होते. काही राक्षसही राजाचे मायावी रूप घेऊन आले होते. त्यात लंकेचा राजा रावणही होता.

श्रीरामाचे मोहक रूप पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्याचे चालणे, बोलणे, असणे सारेच आकर्षक आणि मनाला भुरळ पाडणारे होते.

राम आणि लक्ष्मण यांच्यासाठी उच्चासने राखून ठेवली होती. पण, उच्चासनावर न बसता आपले गुरु विश्वामित्र ऋषी यांच्या पायाजवळ ते नम्रतेने बसले होते.

राजा जनकाने स्वयंवरमाला घेऊन उभ्या असलेल्या सीतेजवळ येऊन जाहीर केले यज्ञाच्या वेदीवर एक शिवधनुष्य ठेवलेले आहे. हे धनुष्य भगवान शंकराकडून आले आहे. या प्रचंड शिव धनुष्याला वाकवून जो कोणी वीर प्रत्यंचा चढवील म्हणजे दोरी अडकवेल त्याला माझी जानकी स्वयंवर माला अर्पण करेल.

एवढे मोठे धनुष्य बघून साऱ्या सभेत शांतता पसरली. बहुतेक राजांनी निराश होऊन मान खाली घातली. शेवटी एक राजपुत्र हिम्मत करून शिव धनुष्याजवळ गेला. पण ते प्रचंड धनुष्य त्याला जागचे हलवताही येईना. मान खाली घालून आपल्या जागेवर तो परत येऊन बसला. आणखी काही राजांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण कुणालाच ते जमले नाही.

सगळ्यांची फजिती पाहून लगेच राजा रावण असुरी हास्य करत उठला आणि म्हणाला………………….

ही कथा अजून थांबलेली नाही! अशा अनेक रामायणाच्या आणखी गोष्टी ऐकण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन हा व्हिडीओ पहा.

स्वयंवर झाले सीतेचे.
स्वयंवर झाले सीतेचे.

प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top