रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले.

अयोध्येतील नागरिक नदीच्या तीरावर गाढ झोपले असतांना राम-लक्ष्मण सीता रथात बसून निघाले. सकाळ झाल्यावर लोकांच्या लक्षात आलं. आपल्या नशिबाला दोष देत सगळेजण आपापल्या घरी परतले.

रथ गंगा नदीच्या तीरावर आला. श्रीराम लक्ष्मण सीता यांनी रथातून उतरून पवित्र गंगा नदीला नमन केले आणि गंगास्नान केले. आदिवासी राजा निषाद राज याला श्रीराम त्यांच्या राज्यात आला आहे हे कळले. राजा निषाद श्रीरामांचा निस्सीम भक्त होता. त्याने श्रीरामांना आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली. पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला. माझे वडील राजा दशरथ यांनी मला, 14 वर्षे तपस्वी जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे. आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन मला करायचे आहे. असे सांगितले.

श्रीरामांनी मंत्री सुमंत यांनासुद्धा परत जाऊन राजा दशरथ यांच्या मंत्र्याचे काम करावे. अशी विनंती केली. अत्यंत दुःखी अंतकरणाने मंत्री सुमंत परत गेले.

राम लक्ष्मण सीता एखाद्या यात्रीकरू सारखे घनदाट जंगलातून प्रयाग गावी पोचले. गंगास्नान केल्यानंतर ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. श्रीरामांना पाहून भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे स्वागत केले. भारद्वाज ऋषी म्हणाले श्रीरामा तुझ्या येण्याने माझी तपश्चर्या ध्यानधारणा उपास आणि तीर्थयात्रा यांचे सार्थक झाले. माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत. भारद्वाज ऋषींच्या सूचनेवरून सुंदर आणि नीरव शांतता असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी राम लक्ष्मण आणि सीता प्रवासाला निघाले.

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Scroll to Top