श्रीराम श्रीराम श्रीराम !
श्रीराम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावर पर्णकुटीत राहत होते. श्रीराम वनवासात आहेत हे ऐकून. भरताला राग आला. वाईट वाटले. भरताचा आक्रोश ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता.
भरत म्हणाला. “मला राजा होण्याची इच्छा नाही. मी आत्ताच वनात जाऊन माझ्या लाडक्या श्रीरामाला परत घेऊन येतो. सर्व ऋषींनी भरताचे कौतुक केले. ते म्हणाले “भरता तुझी कीर्ती जगभर पसरेल. श्रीरामाबरोबरच लोक तुझेही गुणगान करतील. तुझं भावावरील प्रेम भारतीय संस्कृतीचा मानबिंदू ठरेल. भरताने सर्व आचार्यांना नम्र भावाने वंदन केले. संपूर्ण कुटुंब मंत्रिमंडळ अयोध्या वासी आणि प्रचंड सैन्यासह चित्रकुटाच्या दिशेने निघाला.
वाटेत अनेक अडथळे आले. पण तो थांबला नाही. चित्रकूट पर्वतावर श्रीरामांच्या पर्णकुटीत पोचला. धावत रामाच्या पाया पडला. रामाची भेट झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
तो म्हणाला “ श्रीरामा, अयोध्या तुझी वाट पाहतेय. तू परत ये राज्य सांभाळ.”
रामाने भरताला प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. मिठी मारली. आणि सांगितले वडिलांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हे माझं कर्तव्य आहे. मी परत येऊ शकत नाही. अयोध्येचा राज्यकारभार बघणे. हा तुझा राजधर्म आहे. मी माझे कर्तव्य पाळतो. तू तुझा राजधर्म पाळ.
भरताने चंदनाच्या लाकडी पादुका म्हणजे चपला श्रीरामांसमोर ठेवल्या. आपल्या पायाचा स्पर्श या पादुकांना करा. त्यांचा मी राज्याभिषेक करीन. व आपला प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार सांभाळेन. असे भरताने श्रीरामांना सांगितले.
भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या. आणि तो अयोध्येला परत गेला. त्याने आयुष्यभर साधेपणा ठेवला.
आपले आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे भरत आणि राम यांचं आदर्श भावंडांचं नातं 14 हजार वर्षानंतर सुद्धा आजही भारतीय संस्कृतीमधे रुजलेलं आहे.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

