रामायणाच्या गोष्टी 22 – सरळ सुग्रीवाशी मैत्री आणि वाकड्या वालीचा वध

राम लक्ष्मण सीतेला जंगलात शोधत होते. त्यांना वानरराज सुग्रीव भेटला. वानर म्हणजे वनात रहाणारे नर. वानर. आपल्यासारखी माणसेच होती ती जंगलात जगण्यासाठी झाडांवरील फळे कंदमुळे खात. त्यांना माकडां सारखे झाडांच्या फांद्यांना झोके देत लांबच्या लांब अंतरे पार करावी लागत. म्हणून ते तशी वेशभूषा करत. तोल सांभाळण्यासाठी लांब जाड शेपटी लावत. तर असा हा वानरराज सुग्रीव. श्रीरामांना भेटला.

सुग्रीव दु:खी होता. कष्टी होता. त्याचा दुष्ट, गुंड, पुंड, भाऊ वाली यानी त्याला राज्यातून हाकलून स्वतः राजा बनला. राजा होण्यासाठी न्याय आणि धर्म पाळायला हवा होता. सुग्रीव जंगलात जिवाच्या भीतीने लपून बसला होता.

राम आणि सुग्रीवाने एकमेकांशी मैत्री केली. चांगल्या मित्रासोबत संकटांचा सामना करणं सोपं होतं. त्यांचं ठरलं. श्रीराम सुग्रीवाला वालीपासून वाचवणार आणि सुग्रीव सीतेला शोधायला रामाची मदत करणार. सुग्रीवाचं मन स्वच्छ होतं. म्हणून श्रीरामांनी वालीचा वध करण्याचं वचन दिलं.

सुग्रीवानी वालीला लढाईसाठी आव्हान दिलं. त्यांचं भयंकर युद्ध झालं. दुष्टपणा आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा होणं गरजेचं असतं. रामानी बाणाने दुष्ट वालीचा वध केला. वालीनी शेवटी आपली चूक मान्य केली.

सुग्रीव पुन्हा वानरांचा राजा बनला. आपला सेनापती हनुमान याच्या मदतीने त्यानी आपली वानरसेना जमवली. नर आणि वानर एकसाथ झाले. सीतामातेला रावणाच्या तावडीतून सोडवायला सज्ज झाले.

प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

Scroll to Top