श्रीराम श्रीराम श्रीराम !
एका उडीत समुद्र, हनुमानच ओलांडणार.
वानर राज सुग्रिवाचे सेनापती, अंगद, जांबुवंत, नल, नील व हनुमान चिंतेत होते. एवढा अथांग समुद्र एका उडीत कोण पार करू शकेल. एवढे सामर्थ्य कुणाचेच नव्हते. जांबुवंत म्हणाला हनुमाना तुझ्या इतकी शक्ती वेग सहनशीलता आणि शहाणपणा दुसऱ्या कुणात नाही. एवढे कठीण काम करायल, तू एकटाच लायक आहेस.
एका उडीत समुद्र, पवनपुत्र, हनुमानच ओलांडणार.
हनुमान तर गप्प गप्प विचार मग्न दिसत होता. एका शापामुळे तो आपले सामर्थ्य प्रचंड शक्ती विसरून गेला होता.
श्रीरामांची भेट झाल्यावर श्रीरामांनी एका दृष्टीक्षेपात त्याचे सुप्त सामर्थ्य जागृत केले. त्याला शक्ती बरोबर युक्ती दिली. मारुती ज्ञानी झाला. आणि आपले सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य, राम कार्यासाठी कारणी लावायचे वाहून घ्यायचे त्यानी ठरवले.
आणि अचानक हनुमानाला स्फुरण चढले. अंगात उत्साह संचारला. त्याचा चेहरा उजळून निघाला. त्यानी “जय श्रीराम” असा नारा दिला. आणि तो हनुमान उडी घ्यायला सज्ज झाला.
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
प्रभू श्रीरामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

