श्रीराम श्रीराम श्रीराम !
डासाच्या, सूक्ष्म रूपात, हनुमान, सीतेला शोधत होता. रावणाच्या महालात, सीता दिसली नाही. पण एका महालासमोर त्याला, तुळशीचं, पवित्र वृंदावन दिसलं. राक्षसांच्या राज्यात, तुळशीवृंदावन! त्याला आश्चर्य वाटलं.
आत रावणाचा भाऊ बिभीषण मनोभावे श्रीरामाची पूजा करत होता. तो शांत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर, भक्तीचं तेज होतं. हनुमानाने स्वतःचे मूळ रूप धारण केलं. मी प्रभू श्रीरामाचा दूत हनुमान आहे. अशी स्वतःची ओळख करून दिली. राक्षस असला तरी बिभीषणानी सत्य, धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नव्हता. जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेने ठरवून त्यानी तो मार्ग स्वीकारला होता.
राक्षसांच्या राज्यात अधर्माचे वाळवंट असले तरी बिभीषणाच्या रूपानी एक निवडुंग शिल्लक होता. त्याच्या मनात भक्तीचा ओलावा होता. रामावरती श्रद्धा होती. हनुमानाने सीतेला सन्मानाने अयोध्येला परत नेण्यासाठी बिभीषणाची मदत मागितली. मदत करायला बिभीषण आनंदानी तयार झाला. त्यानी सांगितलं, मी नेहमी, सत्याच्या बाजूनी, उभा राहीन. बिभीषणाने सांगितलं, की रावणानी सीतादेवींना अशोक वनात राक्षसींच्या पहाऱ्यात कडे कोट बंदोबस्तात कैद करून ठेवले आहे.
सीतामाता, अशोकवनात आहे. हे आता, हनुमानाला समजले होते.
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्रीरामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

