श्रीराम श्रीराम श्रीराम !
रावणाने राक्षसांना, मारुतीच्या शेपटीला, कपडे चिंध्या बांधून, त्यावर तेल ओतून, पेटवून देण्याची, आज्ञा दिली. जसजसे राक्षस, शेपटी भोवती, कपडे गुंडाळत होते, तसतशी शेपटी, मोठी मोठी, होत जात होती. रावण म्हणाला, लंकेतील सगळे, कपडे आणा. एकही कापड दुकान, सोडू नका. हजारो सेवक, पळत सुटले. लंकेतील सगळी, कापड दुकाने लुटली.
लंकेच्या एकाही घरात, कापड म्हणून, शिल्लक उरले नाही. सगळे कपडे, हनुमानाच्या शेपटी भोवती, गुंडाळून देखील, थोडेसे शेपूट, शिल्लकच राहिले. सेवकांनी भराभर, त्याच्यावर तेल ओतले. शेपटाला, आग लावून दिली. शेपूट काही पेटेना. रावण स्वतः, पुढे आला, आणि जोरात, फुंकर मारली. त्याबरोबर आग भडकून, रावणाच्या दाढी मिशा, जळून गेल्या.
आग भडकल्यानंतर, हनुमान एका, उंच प्रासादावर, उडी मारू बसला. जळत्या शेपटीने, तो प्रासाद, धडाधडा पेटू लागला. भराभर उड्या मारत, या घरावरून, त्या घरावर. या गावातून, त्या गावात. या राज्यातून, त्या राज्यात. संपूर्ण देश, हनुमानाने, काही क्षणात, पेटवून दिला. हनुमानाची, टिंगल टवाळी करत, खदाखदा हसणारे राक्षस, जीवाच्या भीतीने, सैरावैरा पळत सुटले. एकच, हलकल्लोळ, उडाला. आगीच्या ज्वाळा, आकाशाला भिडल्या. जमिनीवर, राखेचे पर्वत, उभे राहिले. राक्षस म्हणाले, रावणाने सीतेला, पळवून आणल्यामुळे, आमच्यावर हा, प्रसंग आला. बिभीषण म्हणाला, करावे तसे, भरावे, पापाचे फळ नेहमीच, कडू असते. संपूर्ण लंका, पेटल्याची, खात्री झाल्यावर, हनुमानाने, समुद्रकिनाऱ्यावर येऊन, समुद्राच्या पाण्यात, आपली शेपटी, विझवली. आणि भराभर, उड्या मारत तो, सीतेजवळ आला.
सीता सुखरूप होती. हनुमान सीतेला, भक्ती भावाने, नमस्कार करीत म्हणाला. सीतामाते, तू सुरक्षित असल्याची, खूण म्हणून, तुझ्या हातातील, सोन्याचे कंगण, मला दे. मी ते, श्रीरामांना दाखवीन. तू निश्चिंत रहा. तुझे दुःख, लवकरच, दूर होईल.
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

