श्रीराम श्रीराम श्रीराम !
लंकेत सीतेला भेटून, रावणाला धडा शिकवून, लंका दहन करून हनुमान आकाश मार्गे उडत उडत परत आला. तो जसा वानर सेनेसमोर आला, तसे सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले. “जय हनुमान! जय श्रीराम!” असा जयघोष झाला.
हनुमान लगेच रामाकडे गेला आणि त्याला सगळी कहाणी सांगितली—सीतेच्या धैर्याची, रावणाच्या क्रूरतेची आणि लंकेच्या विध्वंसाची. रावणाच्या राज्याची. त्याच्या सामर्थ्याची. त्याच्या सैन्याची. सगळ्या गुप्त बातम्या हनुमानाने श्रीरामांना सांगितल्या. सीतेने हनुमानाला दिलेले सोन्याचे कंगण बघून श्रीरामाला धीर आला. सीता सुखरूप असल्याची ती खूण होती.
हनुमानाने रामाला एक विनंती केली, “मला सदैव तुमच्या सेवेत राहायचं आहे!” राम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला प्रेमाने आशीर्वाद दिला. आणि तथास्तु म्हटले.
आता वेळ आली होती मोठ्या निर्णयाची! राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमानाने ठरवलं—संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर चढाई करायची, सीतेला परत आणायचं! ते वानर सेनेची जमवाजमव करायच्या तयारीला लागले.
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

