रामायणाच्या गोष्टी 35 – रावणाचे कपट कारस्थान

रामाची सेना लंकेला पोचली. सर्व बाजूंनी लंकेला घेरले. वानरांच्या आरोळ्या. जय श्रीराम नारे आकाश दणाणून टाकत होते.

रावण काळजीत पडला. त्याने दोन राक्षसांना हेर म्हणून पाठवले. मायावी शक्तीने रूप बदलून अस्वल आणि म्हातारे माकड बनुन आले. सैनिकांची माहिती गोळा करू लागले. कोणालाच शंका आली नाही. पण बिभीषणाने त्यांना ओळखले! वानरांनी त्यांना पकडले. रामासमोर उभे केले.

हेर घाबरले माफी मागू लागले. श्रीरामांनी त्यांना क्षमा केली. परत जाऊन इथे काय काय पाहिले ते रावणाला सांगा.

हेर रावणाकडे गेले. “रामाची सेना अपराजेय आहे,” असे त्यांनी सांगितले. रावण चडफडत महालात गेला. त्याने एक, नवीन कपट कारस्थान आखले. मायावी जादूने त्याने रामासारखे एक शीर तयार केले. ते सीतेपुढे ठेवले. आणि म्हणाला “रामाचा वध झाला. आता तरी माझी राणी हो!”

सीता म्हणाली. “श्रीराम अजिंक्य आहेत. तुझे हे कारस्थान मला फसवू शकत नाही !”
रावण खजिल झाला. निराश होऊन निघून गेला.

प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!
प्रभू श्रीरामचंद्र की जय!

Scroll to Top