रामसेतू बांधायला, लाखो वानर, झपाटल्यासारखे, काम करत होते. मोठमोठे दगड उचलून, समुद्रात टाकत होते. नल-नील त्यांना, मार्गदर्शन, करत होते.
किनाऱ्यावर एक, लहानशी खार, हे सगळं, बघत होती. एवढ्या मोठ्या कामात, आपणही मदत, करू शकतो का, असा विचार, तिच्या मनात आला. तिला एक, युक्ती सुचली.
ती वाळूत, गडाबडा लोळली. तिच्या अंगाला, वाळू चिकटली. मग ती, पुलावर जाऊन, अंग झटकू लागली. दगडांच्या खाचांमध्ये, ती वाळू, जाऊ लागली.
छोट्याशा खारीचं, हे छोटेसे काम! पण तिच्या दृष्टीने, ते खूप, मोठं होतं. सेवा, मनापासून, करायची असते. ती कधीच, मोठी-छोटी नसते.
श्रीराम, सगळं पाहत होते. त्यांना खारीचं, श्रमदान भावलं. त्यांनी प्रेमाने, तिला उचललं. तिच्या अंगावरून, हात फिरवला.
तेव्हापासून, खारीच्या अंगावर, सोनेरी पट्टे आले, असं म्हणतात. श्रीरामांच्या स्पर्शाने, तिचं जीवन, धन्य झालं!
सगळ्यांनी मिळून, सहा दिवसांत, रामसेतू , तयार केला. आता फक्त, श्रीरामांच्या आज्ञेची, वाट होती. वानरसेना, लंकेवर स्वारीसाठी, सज्ज होती!
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय

