श्रीराम श्रीराम श्रीराम !
इंद्रजीत रावणाचा बलाढ्य सेनापती. तो अदृश्य होऊ शकत होता. अदृश्य होऊन त्याने वानरांवर बाणांचा वर्षाव केला. कित्येक वानर ठार झाले.
इंद्रजीताने राम-लक्ष्मणावर सर्पास्त्र सोडले. असंख्य सापांनी त्यांना घट्ट विळखे घातले. गळ्याभोवती फास आवळले. राम-लक्ष्मण बेशुद्ध झाले. इंद्रजीताने विजयाचा जल्लोष केला.
तेवढ्यात गरुडराज आला! सापांचा परम शत्रू! गरुडराज दिसताच सारे साप घाबरले. राम-लक्ष्मणांना सोडून ते सैरावैरा पळाले. राम-लक्ष्मण शुद्धीवर आले.
वानरसेना जल्लोषात गर्जली. नवा उत्साह घेऊन राक्षसांवर तुटून पडली. घनघोर युद्ध पेटले. रावणाची सेना मागे हटू लागली. रामाचा विजय जवळ येत होता!
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

