श्रीराम श्रीराम श्रीराम !
लंकेचा राजा बिभीषण महान.
रामाने केला राज्याभिषेक व सन्मान. सांगितलं त्याला. “धर्माचा मार्ग धर प्रजेचा राजा हो” बिभीषणाचा निरोप घेतला. बिभीषणाने नमस्कार केला. आता अयोध्येचा वेध लागला.
सीता-राम, लक्ष्मण सोबत
पुष्पक विमानात बसले मस्त!
विमान हे अनोखं चाले मनाच्या तालावर. जोरात उड हळू चाल मन मानेल तसं उडायला तयार!
रामाने सांगितल्या आठवणी खास लंकेत झालेल्या त्या युद्धाच्या खास! कुंभकर्ण कसा जागा झाला. लक्ष्मण कुठे बेशुद्ध झाला. मारुतीने पर्वत संजीवनीसाठी उचलला
सर्पाच्या विळख्यातून गरुडाने मुक्त केला! वानरांनी पराक्रम गाजवला रामसेतू कुठे बांधला. खारीने आपला वाटा उचलला. हनुमानाने लंका जाळली सीतेला शोधून काढला! शबरीच्या बोरांनी रामाचा झाला सन्मान अशा अनेक आठवणींनी भरलेला भारलेला तो विमान प्रवास !
अयोध्या आली आनंद पसरला.
आसमंत सारा उजळला.
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

