श्रीराम श्रीराम श्रीराम !
रावणाचा अंत झाला. आनंदी आनंद गडे. जिकडे तिकडे चोहीकडे. मारुतीने धाव घेतली. सीतेला बातमी सांगितली. राम-सीतेची भेट झाली. सगळ्यांच्या डोळ्यांत खुशी आली! पण या आनंदावर सावली आली एक विचित्र कुजबुज पसरली!
रावणाच्या कैदेत सीता शुद्ध कशी. कोणीतरी दुष्ट शंका घेई अशी. कुजबुज मोहीम बदनामीची लाटच जशी.
राम राजा न्यायप्रिय शंका दूर करणं होतं आवश्यक! त्यांनी सीतेला विचारलं ती शांतपणे धैर्याने बोलली! “मी गंगाजला सारखी पवित्र आहे. कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे!”
सीतेने दिलं धैर्याचं उदाहरण कठीण वेळी संयमाचं दर्शन! शेवटी विजय सत्याचाच होतो हीच खरी अग्निपरीक्षा असते!
अग्नीदेवता न्याय देती झाली. सीतेची पवित्रता सिद्ध झाली! सगळ्यांच्या मनातली शंका दूर झाली! सगळ्यांनी तिला वंदन केलं राम-लक्ष्मण आनंदाने हसले! पुष्पक विमानातून अयोध्येला निघाले त्यांच्याबरोबर मारुतीही आकाशात उड्डाणले!
सियावर रामचंद्र की जय
पवनपुत्र हनुमान की जय
जयघोषांनी आकाश दुमदुमले!
प्रभू श्री रामचंद्र की जय.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
प्रभू श्री रामचंद्र की जय.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

