श्रीराम श्रीराम श्रीराम !
श्रीराम, लक्ष्मण, आणि सीता, अयोध्येत परत आले. शहर आनंदानं, फुलून गेलं! पुष्पक विमान, आकाशात दिसताच, प्रजाजनांनी, जल्लोष केला. “श्रीरामचंद्र की जय!” असा जयघोष, आसमंतात घुमला. रस्ते फुलांनी सजले. ढोल-ताशांच्या गजरानं, वातावरण दणाणलं. फटाक्यांची आतषबाजी, सुरू झाली, आणि आकाशात, रंगीबेरंगी पताका, फडकल्या!
वानरसेना तर, वेड्यासारखी आनंदानं उड्या, मारत होती. साखर फुटाणे, आणि गोड फळं, खात होती. सगळ्या शहरात, सणासारखा, उत्साह होता. अयोध्येत, एक मोठ्ठा रोड शो, झाल्यासारखं, वाटत होतं!
रामभरताची, भेट झाली. दोघंही एकमेकांना, घट्ट बिलगले. त्यांना बघून, सगळ्यांच्या डोळ्यात, आनंदाश्रू आले. माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, यांनी श्रीराम, आणि सीतेचं, औक्षण केलं. आईच्या नजरेतलं, प्रेम आणि अभिमान दोन्ही, ओसंडून, वाहत होतं.
मग आला, तो शुभ दिवस! श्रीरामांचा भव्य, राज्याभिषेक झाला. अयोध्येच्या राजसभेत, अयोध्येच्या सीमेलगत असलेल्या सर्व राज्यांचे राजे आणि मित्रमंडळी जमली होती – सुग्रीव, विभीषण, अंगद, जांबवंत, हनुमान… सगळे उपस्थित होते. पृथ्वीवर पहिल्यांदाच अभिमानाने भगवा झेंडा फडकला!
श्रीरामांना युद्ध नको होतं. शांती हवी होती. दुःख नको होतं. सुख हवं होतं. द्वेष नको होता. प्रेम हवं होतं. हे रामराज्य खरंच स्वर्गासारखं होतं! रामराज्याचं स्वप्न असंच सुंदर आणि प्रेमानं भरलेलं होतं.
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

