“रामायण सनातन चिरंतन”
सीतेचे पुत्र कुशलव जुळे भाऊ
रामाचे चरित्र लागले गाऊ
वनात वाढले तरी ज्ञानी झाले
त्यांनी रामकथेला घरोघरी नेले..
वाल्मिकी ऋषींनी शब्द दिले
चौसष्ट कला गायन वादन दिले
लव-कुशांच्या सुरात झंकारले
रामायण अखंड वाहत राहिले..
ग.दि.माडगूळकरांनी लिहिले
सुधीर फडके यांनी गायले
गीत रामायण अमर झाले
समाजमनावर कोरले गेले…
मालिका झाल्या सिनेमे झाले
कथा कीर्तन प्रवचन झाले
भारतीय संस्कार जगभर गेले
मानवी जीवन समृद्ध झाले…
राम राज्य कुटुंब न्याय-धर्म
त्याग धैर्य नीतीनियम सत्कर्म
श्रीरामांस लवकुशांनी ऐकवले
रामायण राष्ट्रीय वारसा बनले.
अरबी फारसी तिबेटी बर्मी चीनी
फ्रेंच इंग्रजी लॅटिन ग्रीक जपानी
गुजराती तमिळ तेलुगू संस्कृत
कानडी हिंदी बंगाली व मराठीत.
चीन तिबेट म्यानमार कंबोडिया
लंका नेपाळ भूतान मलेशिया
रामायणाने जोडला धागा एकत्र
दुसऱ्यासाठी जगणे राम-चरित्र..
मानवाचा कसा असावा आचार
रामायणाने दिला दिव्य विचार
नीतिमान रामाचा मार्गच भला
म्हणून अहंकारी रावण संपवला.
सीतेच्या अथांग सोशिकतेला
हनुमानाच्या चिरंजीव भक्तीला
भरताच्या बंधुप्रेम व निष्ठेला
लक्ष्मणाची सावली साथीला
नाते संबंधांना उजाळा दिला..
रामायण घडले तो भू नकाशा
उदयास आणी अखंड भारतवर्षा
जनकपूर पंचवटी लंका अयोध्या
दंडकारण्य मिथिला किष्किंधा..
लव-कुशांनी श्रीरामांच्या साठी
केले अमर संस्कार परंपरेसाठी
रामकथा गेली लाखोंच्या ओठी
श्रद्धेने गाईल त्याची किर्ती मोठी.
रामायण कधी संपणार नाही
रामायण कधी थांबणार नाही
सत्य सरळ मार्गानी चालणार
पुण्यवान रामायण पुढे नेणार..
प्रभू श्रीरामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
प्रभू श्री रामचंद्र की जय
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

