स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकर
भीतीवर मात करून जो लढतो, तोच खरा वीर.
सावरकरांनी इंग्रज राजवटीला थेट आव्हान दिलं.
छळ सहन केला, हाल सोसले,
पण कधीच झुकले नाहीत.
अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये
त्यांना काळ्या पाण्याची जन्मठेप झाली.
तरीही त्यांचा विचार बदलला नाही.
म्हणूनच त्यांना “वीर सावरकर” म्हणतात.
त्यांचं संपूर्ण आयुष्य
स्वातंत्र्यासाठी समर्पित होतं.
म्हणून ते स्वातंत्र्यवीर होते.
सावरकरांच्या कविता देशप्रेमाच्या होत्या.
अंदमानच्या तुरुंगात,
भारतापासून दूर असताना,
त्यांचं मन खूप व्याकुळ झालं.
आईपासून दूर गेल्यावर बाळ रडतं,
तसं त्यांचं मन तळमळत होतं.
म्हणून ते समुद्राला विनंती करतात —
“मला माझ्या मातृभूमीकडे परत घेऊन चल.” हाच भाव आहे
“ने मजसी ने परत मातृभूमिला” या कवितेत.
“जयोस्तुते श्रीमहन्मंगले”
ही भारतमातेची स्तुती आहे.
गुलाम देशाला धैर्य देण्यासाठी
आणि स्वाभिमान जागा करण्यासाठी
ही कविता रचली गेली.
“हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”
या कवितेत सावरकर
शिवाजी महाराजांची आठवण करून देतात.
शिवाजी महाराजांनी
हिंदवी स्वराज्य उभं केलं.
हिंदवी स्वराज्य म्हणजे —
या मातीचं,
आपल्या लोकांचं,
आणि परकीय सत्तेपासून स्वतंत्र असलेलं राज्य.
या कवितेत सावरकर
फक्त शिवाजी महाराजांना हाक देत नाहीत.
ते आपल्या आतल्या धैर्याला जागं करतात.
कारण प्रत्येक भारतीयाच्या मनात
एक छोटा शिवाजी आहे.
आपली माती, आपले लोक, आपलं धैर्य —
हेच हिंदवी स्वराज्य!
सावरकर हे
प्रखर हिंदुत्ववादी
आणि तेजस्वी राष्ट्रभक्त होते.
सूर्यासारखे —
तेजस्वी, तळपते, ऊर्जावान, मार्ग दाखवणारे.
स्वातंत्र्यवीर सावरकर — की जय!
भारत माता — की जय!
जय हिंद!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


