भारतीय इतिहासाच्या गोष्टी १६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
अहिल्यानगर, म्हणजे जुन्या अहमदनगर जिल्ह्यातील, चोंडी या गावात, जन्माला आली एक मुलगी. अहिल्या तिचं नाव. हुशार. चुणचुणित.
एकदा आपल्या, दहा-बारा मैत्रिणींसोबत, ती नदीकाठी, खेळत होती. अचानक लांबून, खूप धुरळा, उडलेला दिसला. धुळीचे लोट, आकाशात उठले. सगळ्या मुली, घाबरल्या. सैन्य आले, सैन्य आले, मोगलांचे सैन्य आले. असं ओरडत, घाबऱ्या घुबऱ्या, सगळ्या जणी, आपापल्या घरी, सुरक्षित स्थळी, पळून गेल्या.
पण तिथे नदीकाठी, एक शिवलिंग होते. त्या जागी, पूर्वी एक मोठे, शिवमंदिर होते. मोगलांनी, सगळी मंदिरे, सगळ्या धर्मशाळा, सगळे रस्ते उद्ध्वस्त केले होते. छोट्या अहिल्याने ठरवले, हे शिवलिंग, कसेही करून, वाचवायचेच. ती एकटीच, त्या शिवलिंगाचे, रक्षण करण्यासाठी, थांबली.
खरं तर ते सैन्य, शिवाजी महाराजांचे, इंदोरचे सेनापती, मल्हारराव होळकर, यांचे होते. मल्हाररावांना, या मुलीला, एकटीला बघून आश्चर्यच वाटले. कोण आहे बरं, ही मुलगी. एकटीच, का थांबली आहे. त्यांनी जवळ जाऊन, चौकशी केली.
अहिल्याने, बाणेदारपणे सांगितले, मी शिवलिंगाचे, रक्षण करत आहे. मल्हारराव होळकरांनी, अहिल्येच्या वडिलांना भेटून, त्यांच्याकडे, आपला मुलगा खंडेराव, याच्याशी लग्नासाठी, मागणी घातली. अहिल्येच्या मनात, तिची आई सीताबाई, हिचे चांगले विचार, रुजलेले होते. मल्हाररावांना, अशीच धैर्यवान, सून हवी होती.
आणि चोंडीची अहिल्या, राणी अहिल्यादेवी होळकर झाली. मल्हाररावांनी, व खंडेरावांनी, अहिल्येला, राज्यकारभाराचे धडे दिले.
काही दुर्दैवी घटनांमुळे, अचानकच, संपूर्ण राज्याची जबाबदारी, त्यांच्यावर आली. त्यांनी ती, अत्यंत हुशारीनी, आणि कुशलतेनी, सांभाळली.
अहिल्यादेवी यांनी, काशी विश्वनाथ, सोमनाथ, महाकाल, यांसारखी अनेक देवस्थाने, पुन्हा बांधली. भक्तीच्या मार्गाने, भारत जोडला.
प्रवाशांसाठी रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. यात्रेला सुरक्षित, आणि सुखकर बनवले. पर्यटन फुलवले.
त्यांनी स्त्रिया, विधवा, यांना मदत,, आणि आदर दिला. गरीब, शेतकरी,—सर्वांसाठी समान, न्याय दिला. समतेचा संदेश दिला. “राजा मोठा नाही… न्याय मोठा!” हे सांगितले.
म्हणून तर अजितदादांनी, बारामतीच्या मेडिकल कॉलेजचे नाव,
“पुण्यश्लोक, अहिल्यादेवी, होळकर, मेडिकल कॉलेज” ठेवले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, जय
भारत माता की, जय
जय हिंद.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


