बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २१
बाळ गंगाधर टिळक पुण्याचे होते. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. लहानपणी टिळक खूप हुशार होते. प्रश्न विचारायचे. चौकस बुद्धी. हा त्यांचा गुण होता.
शाळेत त्यांना गणित आणि इतिहास विषय आवडायचा.
टिळकांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पण पैसे कमावण्यासाठी वकिली व्यवसाय केला नाही.
कायद्याचं ज्ञान त्यांनी लोकांना न्याय मिळावा म्हणून वापरलं.
त्यांना प्रश्न पडायचा, आपला देश गुलाम का आहे?
त्या काळात इंग्रज राज्य करत होते.
सामान्य माणूस दुःखी होता.
शेतकरी, कामगार यांच्यासाठी कोणी बोलत नव्हते.
टिळकांच्या लक्षात आले. हीच वेळ आहे आवाज उठवण्याची.
“मी गप्प बसणार नाही,” असं त्यांनी ठरवलं.
त्यांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलं. निर्भयपणे खरं लिहिलं.
त्यांचा आवाज भारतभर पोचला. लोक जागे होऊ लागले.
लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
स्वातंत्र्यलढ्याला खरी सुरुवात झाली.
टिळकांनी त्या विचारांना धाडस आणि लढ्याची दिशा दिली.
टिळकांनंतर गांधीजी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी लढा पुढे नेला.
पण पहिला बुलंद आवाज लोकमान्य टिळकांचाच होता.
गणपती उत्सव, शिवजयंतीमुळे लोक एकत्र आले.
लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य होते.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


