चाचा नेहरू

चाचा नेहरू.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

चाचा नेहरू हसरे हसरे,
लहान मुलांचे मित्र खरे.
गुलाब पुष्प घेती हाती,
मुलांवरती प्रेम करती.

स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले,
देशासाठी तनमनाने झटले.
जेलमध्येही स्वप्नं पहिली,
उज्वल भारत उभारणी केली

शाळा कॉलेजे उभी राहिली,
आधुनिक विज्ञानवाट दाखवली.
धरणे, कालवे, वीजनिर्मिती
शेती, सिंचन देशाला पुढे नेती.

आखल्या पंचवार्षिक योजना,
नियोजनबद्ध नवभारत रचना.
मुलं जेंव्हा विचार शिकतात,
तेच देशाला घडवीत जातात.

अखंड भारताची फाळणी झाली
स्त्री, पुरुष मुले निर्वासित झाली
नेहरू चाचांनी छावणी उभारली
पालकत्व स्वीकारत मिठी दिली.

लोकशाहीची मंगल दीपमाला,
भारतमाता मंदिर संसदेला
जनगणमन, वंदे मातरम नारा
नेहरूंनी घातला पाया सारा.

लोकशाही हीच खरी वाट
घटनेने दिली मताची साथ
कर्तव्य आम्ही निभावू सारे
हक्क मिळवू आमचे सारे

चाचा नेहरू की जय
पंडित जवाहरलाल नेहरू की जय
भारत माता की जय
जय हिंद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top