भारतीय इतिहासाच्या गोष्टी – “भारत एक एक सोने की चिडिया थी, हम फिर बनायेंगे.”
एक गाव होते छोटेसे.
बारामतीसारखे आपलेसे.
देवांश नावाचा मुलगा.
तिसरीत शिकणारा.
त्याला गोष्टी आवडायच्या.
भारतीय इतिहासाच्या गोष्टी.
एक दिवस त्याला प्रश्न पडला.
इतिहास शिकायचा कशाला?
तो सरांकडे गेला.
सर म्हणाले,
“भारत सोने की चिडिया होता.”
“लोक शिस्तीत जगत.”
“काम प्रामाणिक करत.”
“शेती, व्यापार फुलले.”
“जगभरातून विद्यार्थी मूल्य शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी भारतात येत.”
“पण आपण ढिले पडलो.”
“भांडणं वाढली.”
आपण एकमेकांपासून दूर गेलो.”
“परकीय आक्रमकराज्य करू लागले.”
“देश गुलाम झाला.”
देवांश शांत ऐकत होता.
त्यांनी विचारलं,
“आता काय करायचं?”
सर म्हणाले,
“स्वतः बदलायचं.”
“खोटं बोलायचं नाही.”
“नियम पाळायचे.”
“देशाची मालमत्ता जपायची.”
“चुकीला साथ द्यायची नाही.”
“स्वतः चांगले व्हायचे.”
“समाज आपोआप चांगला होईल.”
“समाज चांगला झाला की,”
“देश पुन्हा सोने बनेल.”
देवांशने मुठ आवळली.
सगळी मुले उभी राहिली.
आवाज घुमला —
“नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है?
मुट्ठी में है तक़दीर हमारी.
हमने किस्मत को बस में किया है.”
देवांश हसत होता.
त्याच्या मुठीत भविष्य होते.
“भारत माझा देश आहे.”
“मी त्याचा जबाबदार नागरिक आहे.”
भारत माता की जय
जय हिंद
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)



डॉ. अनिल मोकाशी सर, मुलांच्या विकासावर इतकं स्पष्ट आणि समजण्यासारखं मार्गदर्शन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
पालकांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. अशाच माहितीपूर्ण व्लॉग्सची अपेक्षा आहे 👍