भगवान बिरसा मुंडा

Birsa Munda

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – भगवान बिरसा मुंडा — निसर्गाचा रक्षक, धरती आबा

झारखंड–बिहारच्या घनदाट जंगलात, एक मुलगा जन्मला… बिरसा मुंडा!

त्याचा पहिला शिक्षक कोण?
निसर्ग! जंगल! तिथलं प्रत्येक पान प्रत्येक फूल जमिनीचा प्रत्येक कणकण!

नदी म्हणाली— “मी तुझी आई… मला कधी दुखवू नकोस!”
झाडं म्हणाली— “आम्ही सावली देतो… आम्हाला कधी तोडू नकोस!”
जमीन म्हणाली— “मीच तुझी धरती… तुला माझ्यावर धारण करते. माझ्यावरच तुझं जीवन आहे!”

लोक म्हणू लागले—
“हा आमचा धरती आबा!”
तो जंगलाचा रक्षक,
पाण्याचा संरक्षक,
आणि जमिनीचा देवदूत.

तो राजवाड्यातला राजा नव्हता,
पण जनतेच्या मनातला राजा होता.
त्याच्या राज्याला सीमा नव्हत्या —
जिथे जंगल, तिथे त्याचं हृदय;
जिथे माणूस, तिथे त्याचं प्रेम!

ते दिवस इंग्रजांच्या अन्यायाचे.
जमिनी हिसकावल्या जात,
हक्क पुसले जात.
बिरसा म्हणाला—
“माझ्या लोकांचा, माझ्या निसर्गाचा अपमान मी सहन करणार नाही!”

तो आदिवासींना एकत्र आणतो,
धैर्य शिकवतो, हक्क सांगतो.
गांधीजींच्या सत्याग्रहाच्या १५ वर्षे आधी, त्याने लोकांना अत्याचाराविरुद्ध उभं राहायला शिकवलं!

म्हणून इंग्रज त्याचं नाव घेतलं की थरथर कापू लागले …
“जंगलाचा सिंह उठला होता… जागा झाला होता!” जनतेला जागं करत होता.

इंग्रजानी कपटानी त्याला पकडलं. अटक केलं. जेलमधेच
1900 साली विष देऊन संपवलं.

पण लोक म्हणाले—
“धरती आबा कसे मरतील?
ते तर आमच्या हृदयात राहतात… सदैव!”


आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणतात—“बिरसा मुंडा आमचा प्रेरणास्रोत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

रांचीच्या विमानतळाला भगवान बिरसा मुंडा विमानतळ असे नाव दिले.

“त्यांचा १५ नोव्हेंबर—आज देश ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करतो.”

रांची शहरात त्यांच्या नावाने
नवं संग्रहालय, निसर्ग-संवर्धन उपक्रम, आदिवासी गौरव अभियान सुरू केलं.

मोदीजी म्हणाले—“बिरसा मुंडांनी देशाला निसर्गाचे मोल शिकवले.”

भगवान बिरसा मुंडा म्हणायचा—“निसर्ग आपला देव…त्याचं रक्षण हाच आपला धर्म!”

मग मुलांनो…
“नदीची काळजी घ्या, झाडांना पाणी द्या, मातीला प्रेम द्या—हेच खरं देशप्रेम!”

भगवान बिरसा मुंडा की जय!
भारत माता की जय!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top