Child & Parental Guide

Failed in exam

प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना

या प्रगतीपुस्तकात आलेल्या लाल रेघांनी घरोघरी धुमाकूळ घातला आहे. अनेक पालकांना आपले आयुष्य उध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. सर्व भौतिक सुखे पायांशी लोळण घेत असताना शैक्षणिक अपयश का यावे हेच त्यांना समजत नाही. कुणाचं काय चुकलं याचा शोध कुटुंबात चालू आहे. आई, वडील, शिक्षक, शाळा, शिकवणी हे सर्वजण लाल रेघांचे पितृत्व एकमेकांवर ढकलून विश्वामित्री पवित्रा घेत आहेत. मुलं तर बिचारी आई-वडिलांची प्रक्षोभक किंवा हताश प्रतिक्रिया पाहून अवाक झाली आहेत. सैरभैर झाली आहेत. परिस्थिती या चिमुरड्याच्या आटोक्याबाहेर आहे. त्यांच्या आजूबाजूची माणसं कशी वागतील यावर मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची घडी बसणे किंवा विस्कटणे अवलंबून आहे. अशा कुटुंबांना मदतीचा हात हवा आहे. मार्गदर्शन हवे आहे. पालक लाल रेघा आल्यावर धावपळ चालू करतात. शिक्षक, मुख्याध्यापक, शिकवणीचे सर यांना भेटतात “अधिक कष्ट घ्या, अधिक लक्ष द्या, काळजी करू नका, पुढे जाऊन त्याला आपोआप समज येईल.” असे सल्ले मिळतात. घरातले वडीलधारे नातेवाईक मुलांसाठी जास्त वेळ देण्याचा सल्ला देतात. शाळा बदल, माध्यम बदल, राहण्याची जागा बदल, होस्टेलवर पाठव, जास्तीच्या शिकवण्या लाव अशा टोकाच्या उपाययोजना केल्या जातात. हा प्रश्न असा आज या घडीला निर्णय घेऊन एक्शन घेणारा नसतो. शैक्षणिक पीछेहाट एकाच वेळी विविध कारणांनी होत असते. त्यांचे निदान करून निवारण करण्यासाठी पावले उचलावी लागतात. बालमार्गदर्शन केंद्र (Child Guidance Clinic) ही अशावेळी सल्ल्यासाठी जाण्याची जागा आहे. बालमार्गदर्शन केंद्रात बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, श्रवणतज्ञ, वाचनतज्ञ, बालमानसतज्ञ, सोशल वर्कर, फिजिओथेरपिस्ट, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ असतात. ते सगळे मिळून शैक्षणिक पीछेहाटीची कारणं शोधून काढतात, मार्गदर्शन करतात. एकंदरीत Child Guidance Clinic म्हणजे प्रगतीपुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना आहे, असे समजायला हरकत नाही. लाल रेघांची काही कारणे :१. डोळ्यांना नंबर२. ऐकायला कमी येणे३. वाचनदोष४. लेखनदोष५. स्पेलिंग घोटाळा६. वाचादोष७. कमी एकाग्रता८. अस्थिरता९. कमी बुद्धिमत्ता१०. कौटुंबिक ताणतणाव११. वर्तणूक समस्या१२. शाळेतील समस्या१३. भावनांशी वैर१४. जुनाट शारीरिक आजार१५. शैक्षणिक अपरिपक्वता१६. अति कडक किंवा अति बेफिकीर पालक१७. पालकांच्या अवाजवी अपेक्षा अशी अनेक कारणं असतात. अनेकदा एकाच वेळी अनेक कारणं काम करत असतात. त्यांच्याकडे कानाडोळा केल्यास लाल रेघा येतात. सुशिक्षित पालकांना आपल्याला सगळं समजतं असा गैरसमज असतो. आपल्याला मदतीची गरज आहे हे त्यांना माहीत नसतं. विशेषतः नापास होण्याचं कारण मानसशास्त्रीय असलं तर ते पालकांना पटायला कठीण जातं. मानसिक व भावनिक समस्या म्हणजे फक्त मनोरुग्ण असं नाही. नॉर्मल मुलांनाही मानसिक व भावनिक कारणांनी शैक्षणिक अडचणी येऊ शकतात. “काही नाही, तो फक्त आळशी आहे” — हे वाक्य स्वतःची फसवणूक करून घेण्यासाठी म्हटलं जातं. खरं तर मुलगा अजिबात आळशी नसतो हे म्हणणाऱ्यालाही ठाऊक असतं. बुद्ध्यांक मापन करणे महत्त्वाचे असते. चांगली बुद्धी असूनही नापास होण्याची कारणं असतात. आणि बुद्धी कमी असूनही कष्टाळू मुले चांगले मार्क मिळवू शकतात. चष्म्याचा नंबर काढणे, श्रवणशक्तीद्वारे अनेक मुलांच्या लाल रेघा निघालेल्या आम्ही पाहिल्या आहेत. मानसिक व भावनिक चाचण्या देखील महत्त्वाच्या आहेत. मानसशास्त्रज्ञांशी चर्चा म्हणजे मनोरुग्ण असणे असे नाही. तज्ञांच्या हातून केलेल्या अशा चाचण्यांचे निष्कर्ष सहसा योग्यच असतात. अशा प्रसंगी पालकांना पटले नाही तरी पालकांनी सहकार्य करायला हवं. सल्लागाराचे कर्तव्य योग्य सल्ला देण्याचे आहे, पटेल असाच सल्ला देण्याचे नाही. उदाहरणार्थ : मुलगा सातवीत गेला, लाल रेघा आल्या म्हणून बालमार्गदर्शन केंद्रात आणला. शैक्षणिक क्षमता चाचणीत लेखन, वाचन, गणित या तीन क्षेत्रात चौथीची क्षमता सिद्ध झाली. आता त्याला शाळेत सातवीचे शिक्षण, सगळीकडे शेकड्यात मुले — कशी होणार प्रगती? नुसतं “त्याचा पाया कच्चा राहिला” हे वाक्य म्हणून प्रश्न सुटणार नाही. हा पाया पक्का करण्यासाठी काही प्रयत्न हवेत. बालमार्गदर्शन केंद्रातील शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ वैयक्तिक क्षमताधिष्ठित शैक्षणिक आराखडा (Individualized Education Therapy Plan) आखतात आणि त्याची अंमलबजावणी करणारी विशेष शिकवणी/शैक्षणिक उपचार (Educational Therapy) देतात. एकेक क्षमता वाढवतात. ती आली की पुढच्या पायरीवर जातात. काही केंद्रांमध्ये ही सोय नसते, पण नसली तर ती निर्माण करायला हवी. आपलं काम समाजाच्या उपयोगी पडण्याचं आहे. सल्ला देऊन मोकळं होण्याचं नाही. पालकांनी लाल रेघांच्या दवाखान्यात जावं. शिक्षकांनी पालकांना पाठवावं. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना बालमार्गदर्शन केंद्राचं कार्य व उपयोग याविषयी माहिती द्यावी. एकूणच समाजाचा शैक्षणिक पीछेहाट बघायचा दृष्टिकोन परिपक्व व शास्त्रोक्त व्हावा ही या लेखामागील अपेक्षा आहे. आपल्या जवळचं बालमार्गदर्शन केंद्र कोठे आहे हे जवळच्या बालरोगतज्ञांना विचारा. जवळपास नसल्यास ते निर्माण करायला पुढाकार घेण्याची विनंती बालरोगतज्ञांना करा. पक्का पाया शिकवणी बालकल्याण केंद्रामार्फत प्रगतीपुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना चालवला जातो. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने शैक्षणिक पीछेहाटीची कारणं शोधली जातात. विशेषतः गतिमंद आणि शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी विशेष वैयक्तिक शिक्षणाची गरज असते. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत अशाप्रकारे उपचारात्मक शिक्षण देण्याची व्यवस्था नाही. आठवीतल्या मुलाला चौथीचं लिहता-वाचता येत नसेल तरी आठवीचीच शिकवणी लावली जाते. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या व एकूण परिस्थिती पाहता शाळांकडून फार अपेक्षा ठेवता येत नाही. समाजाने व पालकांनी या अडचणीतून मार्ग काढायला हवा. बालकल्याण केंद्राने आपल्या “पक्का पाया शिकवणी” प्रकल्पामार्फत हे काम हाती घेतले आहे. विशेष शिक्षकांमार्फत खाजगी शिकवणीच्या स्वरूपात हा प्रकल्प राबवला जातो. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वैयक्तिक शैक्षणिक आराखडा आखतात व दर तीन महिन्यांनी प्रगतीचा आढावा घेतात. विशेष शिक्षक क्षमताधिष्ठित शिक्षणाच्या तत्त्वावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना Read Post »

मासिक पाळी : वाढ, बदल आणि आत्मविश्वास

‘पाळी’ म्हणजे काय? ‘पाळी’ येते म्हणजे योनीमार्गे रक्त आणि टिश्यूचा प्रवाह सुरू होतो.दरमहा येते म्हणून तिला मासिक पाळी म्हणतात. पाळी साधारणपणे २ ते ७ दिवस चालते.पहिल्यांदाच येणाऱ्या पाळीला “मिनार्की” म्हणतात.ही वाढीचं लक्षण आहे. शरीर तयार होत आहे. तरुण होत आहे. पाळीत रक्त किती जाते? एका ‘पाळी’त साधारण ३० मिली रक्त जाते.👉 अंतर्वस्त्राला आतून चिकटणारे पॅड वापरावे.👉 पॅड रक्त शोषून घेते आणि कपड्यांवर डाग येणार नाहीत.👉 आता नवीन ‘मेंस्ट्रुअल कप’ देखील उपयुक्त, सोयीचे आणि हायजेनिक आहेत. त्याबद्दल माहिती करून घ्या. शरीरात काय चाललं आहे? पण बहुतेक वेळा स्त्रीबीज फलित होत नाही.तेव्हा निरुपयोगी झालेलं अस्तर मासिक पाळीच्या स्वरूपात बाहेर टाकलं जातं. 👉 पाळी २१ ते ४५ दिवसांची असू शकते. पाळी कधी सुरू होते? बहुतांश मुलींमध्ये पहिली पाळी १० ते १५ वर्षे या वयोगटात येते.सरासरी वय साधारण १२ वर्षे असते. जर पहिली पाळी १० वर्षांपूर्वी किंवा १५ वर्षांनंतर आली,तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आधी दिसणारी लक्षणे काय नॉर्मल आहे? आईला ‘नॉर्मल काय आहे’ हे माहिती असतं.👉 तिच्याशी या विषयावर बोला.👉 कुठलीही समस्या आली तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ‘पाळी’ म्हणजे काय खरं तर? पहिल्या पाळीची थोडी टेन्शन येणं अगदी स्वाभाविक आहे.पाळीमुळे होणारी कटकट कुणालाच आवडत नाही. पण — अभिमान बाळगा.‘मासिक पाळी येणे’ म्हणजे शरीराची वाढ व विकास योग्य आहे याचं सुंदर लक्षण आहे. What is a ‘Period’? A ‘period’ means blood and tissue flow from the vagina.It comes every month, hence called menstrual period. A period lasts for 2 to 7 days.The first period is called “Menarche”.It is a sign of growth — the body is preparing, becoming young. How much blood is lost? About 30 ml of blood is lost in one period.👉 Wear a pad that sticks to underwear.👉 The pad absorbs blood and prevents stains.👉 The new menstrual cup is also very useful, convenient, and hygienic. Learn more about it. What’s going on inside the body? But most of the time, the egg is not fertilized.The lining is shed in the form of a period. 👉 A normal cycle ranges from 21 to 45 days. When do periods start? In most girls, the first period starts between 10 and 15 years.The average age is 12 years. If it occurs before 10 or after 15 years,consult a gynecologist. Early signs before first period What is ‘Normal’? Mothers know what is normal.👉 Talk with her about “this” topic.👉 If there are any problems, consult a gynecologist. What does ‘Period’ mean? It’s natural to be a little nervous about the first period.No one really likes the inconvenience it brings. But — be proud.‘Menstruation’ is a sign of normal growth and development. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

मासिक पाळी : वाढ, बदल आणि आत्मविश्वास Read Post »

A mother engaging with her teenage son holding a smartphone outdoors.

बडे बच्चों की बातें

बडे बच्चों च्या मनातील ३० खास गोष्टी. पालकांसाठी मार्गदर्शन, मुलांचे विचार, शिस्त, विश्वास, मैत्री, खेळ व जीवन मूल्यांवरील सुंदर विचार. १.चुकांमधूनच मुलं शिकतात. वेळीच चूक दाखवून द्या. २.आई शिस्त लावते, रागावते म्हणूनच गरजेची असते. तिच्याशी समंजसपणे बोलावे. ३.फादर हे “आपले” फादर असतात. त्यांच्याबद्दल टेरर नको. आदर हवा. ४.मी चांगलं वागायचे नियम आपण एकत्र ठरवू. सोपं पडतं आणि मजाही येते! ५.माझ्या सारखा मीच. माझी इतरांशी तुलना नको. ६.माझ्या छोट्या यशाचं तुम्ही केलेलं कौतुक मला खूप आवडतं. ७.“मला शब्दात सांगता येत नाही… पण तुम्ही ‘छान केलंस’ म्हटलंत, की एकदम भारी वाटतं!” ८.तुम्ही “नाही” का म्हणताय, हे सांगितलं तर मला पटतं. मोठ्यांनी सांगितलं ते मुकाट्यानी ऐकायचं कठीण जातं. ९.घरचं जेवण आवडत नाही, बाहेरचं आवडतं, ती मुलं बिच्चारी दुर्दैवी असतात. १०.माझ्यासाठी आखलेल्या मर्यादेच्या लक्ष्मणरेषांमधे मला सुरक्षित वाटतं, अडकल्या सारखं नाही. ११.कृत्रिम बुद्धिमत्तेला भावना शिकवता येतात.आपल्या मुलांनाही भावना शिकवता येतात. १२.विश्वास ठेवा माझ्यावर, सारखी तीक्ष्ण नजर नको!मी फुलेन विश्वासातून, परीक्षेतल्या मार्कांचे दडपण नको. १३.“अहो, देव बहुतेक माझ्या डोक्यात फिल्टर बसवायचं विसरला…डोक्यात विचार आले की ते तोंडातून सरळ बाहेर पडतात!” १४.आई, बाबा… स्टेअरिंग माझ्या हातात ठेवा ना! तुम्ही नेव्हिगेटर व्हा – गरज असेल तेव्हा सांगाच! १५.“रस्ता मोठा आहे. मी लहान आहे. लायसन्स लर्निंग आहे.चुकीला माफी हवी. राग नको, साथ हवी. ड्रायव्हर शिकत आहे.समज येत आहे.” १६.“मला काय आवडतं” विचारणारतर माझं मलाच समजणारमजा येईल, जमेल तेच करणार,मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार! १७.तुम्ही आज्ञा दिलीत, तर मी फक्त ऐकतो.तुम्ही पर्याय दिलात, तर मी विचार करतो.मला आवडेल तो पर्याय माझा मी निवडतो. १८.माझा प्रयत्न माझा असतो. तुमची साथ हवी… पण तुमचा हट्ट नको. १९.मी माझ्या स्पीडनी चालतो, मी माझा वेळ घेतो,तुमची विश्वासाची सोबत, मनातून मी जाणतो.फुल उमलायचं ठरलेलं, याची खात्री असते,पोचेन नक्की, मागं राहणं माझ्या स्वभावात नसते! २०.खेळ म्हणजे आहे एक धमाल दुकान,मिळतं इथे शरीर-मनाच्या फिटनेसचं सामान.जिंकलो तर छान, हरलो तर मांडू नवा डाव छान,अंपायरच चुकला तर पार्टीचा चान्स महान! Social Development २१.मित्रच शिकवतात चांगल्या वाईट कला,त्यांच्या एका हाळीने उत्साह येतो मलाघरच्यांनी सांगितलं तर फक्त डोकं हलवतो,मित्राचं मात्र पटतं, लगेच करून टाकतो! २२.मित्र हवा निरपेक्ष साथ देणारा,आहे तसा मला स्वीकारणारा.चुकलो तर वेळीच थांबवणारा,मर्यादा पाळत एन्जॉयही करणारा. २३.समोरच्याचा खोडरबर, खाली पडला,पायाच्या बोटांनी मी, हळूच ओढला.देऊन टाक त्याचा त्याला, मित्र म्हणाला.नाही तर चोरायची, सवयच लागेल तुला. २४.“वर्गात केला दंगा, सगळ्यांनी ‘हिरो’ बनवलं,‘आलायस काय शिकायला, मित्रानं विचारलं.धरून नाही यार हे शाळेच्या शिस्तीलामोठेपणी ‘व्हिलन’ व्हायचंय का तुला!” २५.पाळीव प्राणी माणसाळती,जंगली श्वापदेही वश होती,मोबाइल-व्यसनी नाठाळ घोडे,घरकाम, खेळ, माणसांत जोडे. २६.मित्रांचं जग भन्नाट, सैराट,कधी कधी सुसाट वादळवाट.घरची खोल मुळे देतात स्थैर्य अपार,तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. २७.घरच्यांपेक्षा मित्रांचं मला जरा जास्तच पटतं.कारण त्यांचं डोकं माझ्यासारखंच चालतंमित्रांबरोबर कसंही काहीही बोललं तरी चालतंघरचं आणि मित्रांचं जग दोन्ही मला लागतं. २८.मोबाईल गेम, व्हिडिओ, नुसता टाइमपासत्यांच्या विळख्यात, खऱ्या जगाला मुकलासहोऊन बसलेत मालक, त्यांना गुलाम करआवडेल ते शिकण्यासाठी, त्यांचा वापर कर. २९.भांडण मारामारी करायला अक्कल कुठे लागतेवाद, प्रश्न सोडवायची कला शिकावी लागतेमैदान सोडून पळून जाऊन प्रश्न नाही सुटणारते आहेत तसेच रहाणार, जास्तच चिघळणार. ३०.मित्रांशिवाय लाईफ, आहे जाम बोअरिंग.जुने दोस्तच असतात, बेस्ट सूदिंग.करतात कधी लिफ्टिंग, तर कधी ट्रोलिंग.म्हणून मित्र निवडतांना, करा जरा थिंकिंग. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बडे बच्चों की बातें Read Post »

A family cooking activity emphasizing hygiene with kids washing hands in the kitchen.

The Magic of Hand Washing

Do you want to know a magic trick that keeps you strong every day?Simple, frequent hand washing!Your hands are like superheroes. But sometimes, tiny bad guys called germs hide on them. You can’t see them with your eyes. You can’t hear them shouting. Yet, they can make you sick! Where Do Germs Hide?On your chocolate wrapper. On a shiny stone you pick up. On your pet’s fur. Even on your best friend’s sneeze! Germs are naughty — they travel fast! How to Beat Germs?With soap and water. Yes! Handwashing is your magic power. Just like superheroes wear capes, you wear soap bubbles! Soap bubbles chase away germs. The Super Steps When to Use Your Superpower* Before eating or cooking with mum.* After using the toilet.* After playing with pets.* After sneezing or coughing.* After playing outside. Every time you wash your hands, you defeat the germs. And guess what?Healthy kids = more play, more fun, more energy!So, next time you wash your hands, smile — you just used your superpower! हात धुण्याची जादू एक गम्मत माहिती आहे का? मुलांनी कायम निरोगी  राहायची एक जादू असते.एक सिक्रेट असते. ते म्हणजे — हात धुणं! तसे खरं तर आपले हात म्हणजे सुपरहिरोच आहेत. पण कधी कधी त्यावर छोटे दुष्ट शत्रू — जंतू लपून बसतात. ते डोळ्यांना दिसत नाहीत. कानांना ऐकू येत नाहीत. पण ते आपल्याला आजारी करू शकतात! जंतू कुठे लपतात? चॉकलेटच्या रॅपरवर. रस्त्यावर सापडलेल्या गुळगुळीत चकचकीत दगडावर. आवडत्या कुत्र्या मांजरीच्या , पाळीव प्राण्यांच्या केसांत. अगदी खास जवळच्या मित्राच्या शिंकेतही! जंतू खूप फास्ट असतात. ते पटकन एकाकडून दुसऱ्याकडे जातात! जंतूंवर मात कशी करायची? साबण आणि पाण्याने. होय! हात धुणं हीच आपली जादूची ताकद.सुपरहिरो जसं केप घालतात, तसं आपण साबणाचे बुडबुडे हातावर घालतो! बुडबुडे म्हणजे जंतूंचे शत्रू. हात धुण्याच्या जादूच्या पायऱ्या १. हात पाण्याने ओले करा. २. साबण लावून नीट घासा — तळहात, बोटांच्या मध्ये, नखांखाली, मनगटावर. ३. “हॅपी बर्थडे टू यू” हे पूर्ण गाणं एकदा म्हणत म्हणत हात घासा (साधारण १५ सेकंद). ४. गाणं संपल्यावर साबण धुऊन काढा. ५. स्वच्छ टॉवेलने हात पुसा. आता आपले हात निर्जंतुक  आणि स्वच्छ झाले! ही सुपरपॉवर कधी वापरायची? जेवायच्या आधी किंवा आईसोबत स्वयंपाक करताना. टॉयलेट वापरल्या नंतर. पाळीव प्राण्यांबरोबर खेळून झाल्यावर. शिंकताना किंवा खोकल्यानंतर. बाहेर खेळून आल्यानंतर. दर वेळी तुम्ही तू हात धुता, तेव्हा तुम्ही जंतूंवर लढाईत विजय मिळवता.  निरोगी मुलं = जास्त खेळ, जास्त मजा, जास्त धमाल मस्ती! हात धुणं म्हणजे जंतूंविरुद्ध लढाईत सुपरपॉवर वापरणं! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

The Magic of Hand Washing Read Post »

Happy family teaching their child to cycle on a sunny day outdoors.

एकुलता एक अन एकुलती लेक

बरोबर आहे, एकुलता एक आहे नं ! डोक्यावर बसणारच. मुलाच्या कोणत्याही समस्येला ‘एकुलता एक’ हे कारण सर्रास दिलं जातं. एकच मुल असणं खरचं इतक चुकीचं आहे का ? एकच मुल असणं चुकीचं नाही. एकुलती एक मुलं इतरांपेक्षा वेगळी नसतात. हे पुराव्यानिशी सिध्द झालं आहे. कृष्णाच्या सात बहिणी कंसाने मारल्या अन तो एकुलता एक राहिला. कृष्णाच्या व्यक्तीमत्वात  तर काही दोष राहिले नाहीत ना ? एक सुभाषितही आहे.  “देवा, अनेक मुर्ख मुलांपेक्षा एकच पण गुणी मुलगा मला दे ” अनेक तारका नाही तर एक चंद्रच रात्रीचा अंधार नाहीसा करू शकतो. एका धर्मग्रंथात म्हटलं आहे की ‘भावापेक्षा मित्र बरा. भाऊ हिस्सा घेतो, मित्र हिस्सा देतो’. साहित्य पुराणाचं जाऊ द्या, विज्ञान काय म्हणतं बघू. कौटुंबीक मानसशास्त्राचं मत बघू आजचा कल एकच मुलाचा :- तीन चार पिढ्यांचे, पंधरा वीस जणांचे, वाडा, अंगण, तुळशी वृंदावन, गोठा, दुभत्या जनावारांसह नांदणारे गोकुळ आता इतिहासजमा झाले. हम दो, हमारे दो, ब्रँड चौकोनी कुटुंब ही गेल्या पिढीतील संकल्पना होती. ‘एकच मुल कुटुंब’ ही आजची परंपरा आहे. बिनभावंडांचे कौटुंबिक वातावरण :- बिनभावंडांचे कौटुंबिक वातावरण हा या प्रश्नाचा गाभा आहे. चीनमध्ये ‘एकच मुल धोरण आहे’ काही पालक निर्णय घेऊन एकावर थांबतात. दुस-या बाळाचा जन्म होईपर्यंत पहिले मुल एकटेच असते.      ब-याच वर्षांनी झालेले दुसरे मुल सुद्धा ‘एकुलत्या’ वातावरणातच वाढते. कुणाला दुसरं मुल होतच नाही. कुणाचे मुल आजार, अपघात अशा कारणांनी जाते. कुणाला कौटुंबिक, वैवाहिक समस्या असतात. कुणाला नोकरीधंदा असल्याने दुसरे मुल नको असते. कारणं काहीही असो, एकच मुल असल्याचे फायदे, तोटे यांचा विचार करून “आपल्याला योग्य” असा निर्णय घ्यावा लागतो. एकाच मुलाचे फायदे :- तुमचं प्रेम, लक्ष, वेळ, शक्ती, पैसे एकाच मुलावर केंद्रित करता येतात. शिक्षणाच्या विकासाच्या जास्त संधी एकाच मुलाला देता येतात. एकुलती एक मुलं  शिक्षणात जास्त यशस्वी होतात. स्वावलंबी होतात. इतरांशी सहज मैत्री करतात. त्यांना दर्जेदार राहणीमान, आरोग्यसेवा, पुरवता येतात. कुटुंब लहान राहिल्याने दरडोई उत्पन्न वाढते. कुटुंबाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावतो. पर्यायच नसल्याने लहान कुटुंबाचे आपापसातले नातेसंबंधही घट्ट होतात. एकाच मुलाचे तोटे :- राजपुत्राची बडदास्त एकुलती एक मुलं राजपुत्राचं आयुष्य जगतात. हट्टी, लाडावलेली, स्वार्थी, बिघडलेली, एकलकोंडी अशी अनेक “विशेषणं” त्यांना लावली जातात. ये सब सरासर झूट है ! या सर्व दंतकथा आहेत. ती एकटी पडतात हे मात्र खरं आहे. एकास दोन दोनास चार समस्या :-   एकुलत्या एक मुलावर मोठेपणी, दोन आईवडिल, आणि चार आजीआजोबा, अशा सहा वृद्धांची जबाबदारी येते. आजकाल आयुष्यमान वाढल्याने अनेक घरात हा प्रश्न निर्माण होतो. प्रश्न फक्त आर्थिक नाही. वृद्धांना भावनिक व दैनंदिन जीवनासाठीही आधार लागतो. तो मिळाला नाही तर ते शब्दशः अनाथ होतात. धनदौलत, मुलं बाळं, सगळे काही आल वेल असून देखील,  एकटे पडतात. एकुलती लेक :- लग्न झाल्यावर, आईवडिल वाऱ्यावर? कसं शक्य आहे. लवचिकता हवी. सगळ्यांनाच. स्थळ काळ वेळ पाहून कुणाला तरी ताठरता सोडावी लागेल. सोय बघावी हेच बरे. लग्नानंतर तिला स्वतःचे आईवडील, सासूसासरे, नवरा आणि मुलं अशा तीन पिढयांचा आधारस्तंभ व्हावं लागतं.भरपूर कमावत्या एकुलत्या लेकीला लग्न करणं जड जातं. नैराश्य येऊ शकतं. एकच मुल समंजसपणे वाढवणे. एकावर थांबण्याचा निर्णय त्याच्याच भल्यासाठी होता. तुम्ही त्याच्यावर अन्याय केलेला नाही. अपराधीपणाची भावना नको. त्याला वेळ द्या त्याच्याशी बोला. महागड्या खेळण्यांची, वस्तूंची फारशी आवश्यकता नसते. गृहिणी असाल तर ‘त्याच्याशिवाय’ इतरही कशात तरी रस घ्या. नाहीतर त्याचं आयुष्य, त्याच्यासाठी, तुम्हीच जगण्याची चूक कराल. त्याला मोकळीक द्या. वाव द्या. तुम्ही काम करणारी आई असाल, तर तुम्हांला मिळेल तेवढ्या वेळेत त्याचं जेवण, अभ्यास, छंद, शिस्त सगळं कोंबायचा प्रयत्न करू नका. कळीच्या पाकळ्या ओढून तिला फुलवता येत नाही. दुहेरी उत्पन्न, विभक्त कुटुंबातील एकुलत्या एक मुलाला  हवी असते ती साथ संगत. तुम्ही दिली नाही तर तो कुणाची तरी शोधणार. (ती चुकीच्या संगतीत गेली तर?) एकलकोंडा होतो. बोलायला कुणी उपलब्धच नसेल, तर मन बिघडते. आईलाच गरजेप्रमाणे रोल  बदलून, त्याची बहीण, भाऊ, मित्र व्हावं लागतं. वेगवेगळ्या कला, खेळ, छंद, पुस्तकांमधे त्याला गुंतवा. टी.व्ही. इंटरनेटवर बंधन घाला. नाहीतर त्याचं मन भावनाशून्य यांत्रिक बनेल. त्याच्या स्वतःचा व तुमचा मित्रपरिवार आवर्जून वाढवा. लग्न, मुंज, समारंभ, क्लब, मंडळामध्ये रस घ्या. त्यासाठी पैसा व वेळ खर्च करा. त्याला बरोबर न्या. त्याचे आजी आजोबा बरोबर राहत नसतील तर ‘जवळपासचे’ शोधा. नक्की सापडतात. तेही प्रेमाला पारखे असतात. जवळपास राहणारी मानलेली बहीण किंवा भाऊ ही अतिशय चांगली संकल्पना आहे. निवड करून कौटुंबिक संबंध वाढवा. पुढाकार घ्या. त्यांना तुमचा संबंध वाढवण्याचा उद्देश स्पष्ट शब्दात सांगा.  राखी, भाऊबीज, वाढदिवस, तिळगुळ, कार्यक्रमांमध्ये त्यांचे मानलेले नाते घट्ट करायची संधी द्या. समाजात मिसळणे हा एकटेपणावरचा तोडगा आहे. दुसरे मुल दत्तक घेणे हा सुध्दा एक उत्तम पर्याय आहे. काळ हिरे सोडून बाकी सगळ्या गोष्टी बदलतो.(फक्त हिरा ‘सदा के लिये’ असतो).  कुटुंबातल्या काही गोष्टी पडद्याआड जातात. काही नव्या येतात. कुटुंबाची रचनाच बदलती असते. बदलानां सामोरे जाण्याचे शिक्षण त्याला द्या. एक तर मुलाने आई वडील रहात असतील तिथे नोकरी व्यवसाय करावा. नाही तर आईवडीलांनी मुलाकडे जावे. इतके सामंजस्य नसेल, तर विभक्त कौटुंबिक जीवन अटळ आहे. आजच्या परिस्थितीत, शेजारचा फ्लॅट घेऊन स्वतंत्र राहणे, हाही एक उत्तम मार्ग आहे. गरज पडेल तेव्हा सोबत. नसेल तेंव्हा स्वतंत्र ! तुमचा एकुलता एक कुलदीपककाही चुकीचं वागला तर नाराज होऊ नका. प्रत्येक मुल कधी ना कधी चुकीचं वागतं. आशावादी रहा. शेवटी हे सगळं प्रकरणच समंजसपणाचं आहे. तुम्ही एक मूल बिघडवू शकता. किंवा डझनभर मुलं बिघडवू शकता. त्याचा ‘एकुलता एक’ असण्याशी काहीही संबंध नाही! निर्णय वैयक्तिक आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

एकुलता एक अन एकुलती लेक Read Post »

Family enjoying playful soccer game outdoors, capturing joyful moments.

The ‘Only Child’

The ‘Only Child’ The only child is not a lonely child. It is not harmful for the child to remain single. Only children are no different from their peers. Joint family is a history. ’We two our two’ square family is a past. ‘Single child’ is the current trend. Being single and having no siblings, is a question of family environment. China has a ‘one child policy’. First born child is a temporary only child’ till the second child is born. A child with a much older sibling is also single. It costs to bear and rear children. It costs money, time energy and everything. Family stress, marital disharmony, career, bad obstetric history, fear over next pregnancy, advanced age, infertility or death of a sibling are some of the causes of having single child. The decision to ‘stop at one’ is difficult. There are advantages and disadvantages of a single child. There are do’s and don’ts in raising a single child. Disadvantages of a single child. ‘Little Emperors.’ He is the boss of the house. He commands. He demands. He gets everything he wants. People say only children are spoiled, selfish, aggressive and what not! They say only children do not develop normally as they do not get opportunity to interact with brothers and sisters. But research proves that it is not true. ‘One-Two-Four’ Problem. When the only child grows to become an adult, he has to support six elderly. His two parents and four grand-parents. With increasing life span, the number of elderly family members is increasing fast. Many self employed elderly do not have retirement benefits. And the problem is not of economic provisions only. Day to day living support and emotional support is also a need. Without support the elderly become destitute or resource less. The single girl child In Indian culture, a single girl child becomes a ‘sandwich generation’. She is sandwiched with responsibilities of three generations. She finds it difficult to get married if she is the only or an important earning member of the maternal family. She may land in despair and become pessimistic. If she gets married, she has to care for her own aging parents, her husband, children and in-laws. She is needed by everybody. Advantages of a single child. You can give more of everything to a single child. More attention, more quality time, more educational facilities and more developmental facilities. Eventually a single child achieves better. He is more likely to make outside friends and become extremely independent. By limiting the number of members, the family can raise it’s socio-economic status, per capita income, offer better heath care. As there is no option, the family is bound together and is likely to have better interpersonal relationships. Parenting a single child. Do not feel guilty.You have not done any injustice to him. You need not be apologetic. Do not try to overcompensate for keeping him alone. Opting for a single child is your personal decision taken for his better future. You have every right to have your opinion. Give more attention, but don’t overdo.View your single child as an advantage. Give your quality time to make him a responsible adult. Responsible for his thoughts and actions. A housewife mother should have some interest other than raring her only child. Otherwise she will try to live his life for him. A working mother should not try to force all her childcare in her available and convenient time. Feeding, cleaning, education, play, hobbies, extra curricular, discipline, everything can not be packed (zipped) in the available hour or two. The bud has to blossom, don’t try to force open the petals! A balance is very important. He needs his space and independence for his development. Do not shower gifts, shower time and words.Do not try to fulfill all his wishes. He will learn to emotionally blackmail you. Along with money, time, attention, love and care are also important resources. Costly gifts and excessive pocket moneyare not necessary. Affluence gives a wrong signal. He will not be able to face life in the true spirit. In a nuclear double income family, the child might crave for company. In your absence, he may get involved with wrong company, or suffer alone. You have to play multiple roles. You have to be his brother, sister, friend as well as a mother. Do not praise him for everything, whether it’s well done or not. Maintain discipline. Otherwise he may become self-centered or pampered. Keep him busy Engage him in activities like painting, drawing, craft (fine arts) music, dance, sports, indoor games etc. Consider his aptitude. Give him exposure to many activities and let him select one to pursue. Books can be long lasting friends. Let him watch T V and surf the net for a limited time. Excessive TV and net removes emotions and makes the mindset mechanical. Activities make him creative. Expand your family and family friends Socialization can prevent loneliness of the only child. Encourage him to have his own friend circle. Teach him the need of family friends. Teach him how to develop friendship. Teach him the significance of lasting friendship. Grand parents provide a wonderful bonding. If he is not lucky enough to live with his own grand parent, search for an elderly couple without grandchild in the neighborhood. You will certainly find one. Develop relationship. Open the windows of communication. It will be mutually beneficial. He should have cousins. Assumed brother or assumed sister is a suitable concept. Find out one in the vicinity. Nurture the relations on rakhi, bhaubeej, tilgul and other similar occasions. Adoption of the second child, is also a good option. This step may teach him caring and sharing. Expose him to social gatherings, ceremonies, music concerts, clubs and like minded groups. He should know how to organize ‘birds of same feather’. Give him an opportunity to socialize with strangers. Make him independent while maintaining strong family ties. Family gives him roots and stability. Independence without family ties

The ‘Only Child’ Read Post »

Joyful family moment in park with kids playing among colorful autumn leaves.

समजून घ्या बालविकासाचे टप्पे

“लहान मूल” ही “मोठ्या माणसा”ची छोटी प्रतिकृती नसते! हे बालपणाच्या विज्ञानाचं मूलभूत तत्व आहे.गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून ते मुलगा “पुरुष” आणि मुलगी “स्त्री” होईपर्यंत, हा विचार लागू राहतो.बालपणाच्या प्रत्येक टप्प्यात हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.बालरोगतज्ज्ञांना हे चांगलंच माहीत असतं. पण त्यातील काही गोष्टी पालकांना आणि कुटुंबालाही समजायला हव्यात.मुलांची जबाबदारी घेताना, प्रत्येक टप्प्यात त्यांच्या गरजा, शरीर, मन आणि विकास समजून घेणं आवश्यक असतं. १. शरीररचना आणि कार्यातील फरक (Anatomy and Physiology) २. औषधोपचारातील फरक (Pharmacology) ३. विकासाचे टप्पे (Developmental Stages)जसं फुलपाखराला अंड्यापासून फुलपाखरूपर्यंत टप्पे असतात,तसं माणसाच्या जीवनातही विकासाचे टप्पे असतात: गर्भावस्था०-९ महिनेशरीर व मेंदूची प्राथमिक घडण नवजात०–२८ दिवसश्वसन, तापमान नियंत्रण, स्तनपानशैशव१ महिना – २ वर्षेवेगाने शारीरिक वाढ, भाषा विकास शालेयपूर्व२ – ५ वर्षेहालचाली, सवयी, भावबंध शालेय वय६ – १२ वर्षेबौद्धिक, सामाजिक वाढ किशोरावस्था१२ – १८ वर्षेलैंगिक परिपक्वता, स्व-ओळख तारुण्य व वृद्धावस्थापुढे…जबाबदाऱ्या, मानसिक समतोल ४. मानसिक आणि सामाजिक गरजा निष्कर्ष:बालक म्हणजे फक्त छोटा माणूस नव्हे – तो स्वतंत्र टप्प्यावर असलेला, सतत बदलत जाणारा, संवेदनशील जीव आहे.त्याचा विकास समजून घेणं हेच खऱ्या अर्थानं जागरूक पालकत्व ठरतं. जागरूक पालकत्वासाठी टिप: “आजारी पडलं की डॉक्टर” हे जुने धोरण आता पुरेसं नाही.“मुलासाठी डॉक्टर” हेच नव्या काळाचं योग्य धोरण! शुभेच्छा – जागरूक पालकत्व, निरोगी बालपण! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

समजून घ्या बालविकासाचे टप्पे Read Post »

An attentive girl helps her younger brother concentrate on homework in a cozy home setting.

गृहपाठाचा “फंडा”

गृहपाठात पालकांनी लक्ष घातले तर मुलांना शिक्षणात निश्चितपणे यश मिळते. गृहपाठ किती महत्वाचा आहे हे त्यामुळे मुलांना कळते. गृहपाठात मदत करण्याचे अनेक फायदे असतात. शिवाय पालकांनाही एखादी नविन गोष्ट शिकायला मिळते. मदत कशी करायची. गृहपाठाचा हा ‘फंडा’ लक्षात घेतला तर ‘अतिच गृहपाठ देतात ‘म्हणून शाळेला दोष देण्याची पाळी येणार नाही आणि गृहपाठ म्हणजे एक ‘शिक्षा किंवा कटकट’ न वाटता शिक्षणाचे एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघता येईल. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गृहपाठाचा “फंडा” Read Post »

Child Doctor

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत!

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत! बहुतेक वेळा बाळ आजारी पडलं तरच आपण डॉक्टरांकडे जातो.पण खरंतर बाळासाठी, आणि ते आजारी पडू नये म्हणून डॉक्टरांकडे जावं लागतं. बाळ महत्वाचं आहे.बाळ निरोगी ठेवायचं असेल, तर “काय करायचं?” आणि “काय टाळायचं?” हे डॉक्टरांकडून शिकावं लागतं. माहितगाराशी अपूरा संपर्क ही एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे. आई–डॉक्टर नातं कसं असावं? “विद्यार्थिनी – शिक्षक” असावं “ग्राहक – व्यापारी” नको डॉक्टर केवळ उपचार देत नाही – ते मार्गदर्शन करतात.डॉक्टरांचा पेशंटवर विश्वास असेल, तर ते जबाबदारीने निर्णय घेतात.विश्वास नसेल, तर फक्त तपासणी करून चिठ्ठी देतात. डॉक्टरची निवड करताना लक्षात ठेवा… आपल्या शिक्षणपद्धतीत बाल संगोपनाचं वैज्ञानिक शिक्षण नसतं.बाळाच्या गरजेनुसार आईला वेळीवेळी नव्याने शिकावं लागतं.हे काम डॉक्टर करू शकतो – आणि करायलाच हवं. डॉक्टर – आई – बाळ : एक सहजीवन आपुलकीचे संबंध हवे डॉक्टरच आदर्श माता घडवू शकतो. बाळासाठी डॉक्टर हवे – फक्त आजारासाठी नव्हे! बेस्ट लक! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत! Read Post »

baby Playing

पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र

“पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा!”हा बालविकासाचा नवा मंत्र आहे. बाळांनी झोपावं पाठीवर, खेळावं पोटावर. याला “पालथा खेळ वेळ”, Tummy Time म्हणतात. पालथा वेळ – कधी सुरू करावा? बाळ जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासूनच पालथा वेळ सुरू करता येतो.आईच्या पोटावर, छातीवर – स्तनांच्या मध्ये बाळाला सुरक्षित व मायेने पालथं ठेवून सुरुवात करता येते.हे बाळाला आवडतं, कारण त्याला आईचा उबदार स्पर्श, नजरेचा संपर्क आणि आवाज मिळतो.ही जवळीक बाळात विश्वास, प्रेमाची जाणीव, आणि संवेदनशील परस्परसंवाद निर्माण करते. पालथा वेळ का महत्वाचा आहे? १. मेंदूला चालना मिळते २. स्नायू बळकट होतात ३. डोक्याचा सपाटपणा टाळतो ४. श्वसन सुधारते. ५. दृष्टी आणि समन्वय सुधारते. ६. शरीराबाबतची जाणीव वाढते ७. भावनिक विकासास हातभार ८. विकासातील अडथळ्यांपासून संरक्षण बाळ उशिरा उलटतं, बसतं, उभं राहतं डोकं चपटं होऊ शकतं हात-खांद्यांचा समन्वय कमी होतो ९. भविष्याच्या विकासाची पायाभरणी पालथा वेळ – किती आणि कसा द्यावा? दिवसातून काही मिनिटांचा हा पालथा खेळ वेळ,बाळाच्या आयुष्यात मोठा फरक घडवतो!हे खेळाच्या रूपात करा.बाळाच्या जवळ रहा, संवाद साधा, हसा, गा, प्रेम द्या!तुमचं बाळ हसतं, खेळतं, बळकट होतंय हे अनुभवणं हीच सर्वात मोठी भरभराट आहे! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र Read Post »

Group of kids bullying another child at school, signaling peer pressure and harassment.

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” ही एक गंभीर समस्या आहे. लक्ष ठेवा बरं का! मुलांच्या भोवतीचं सामाजिक वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक आहे की हानीकारक आहे हे कुणी तरी जबाबदारीनी बघावं लागतं. मुलांसंबंधी एखाद्या गोष्टीसाठी बरेच लोक जबाबदार असल्यावर, कुणीच जबाबदारीने वागत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवतात. नुकसान मुलांचे होते. कधी कधी कायमस्वरूपी होते. गंभीर होते. दुर्दैवी देखील होऊ शकते. मोठी समंजस मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन, पालक, संबंधित डॉक्टर यांना समस्येबद्दल परिपूर्ण माहिती व जागरूकता असायला हवी. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण टोचते. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण खोलवर टोचते. मुलांचं मन दुखावते. आत्मविश्वास खचवते. त्यांचं हसणं, खेळणं, शिकणं सगळंच बिघडते. छळवादी दांडगाई’ चे शिकार आणि शिकारी दोन्ही मुलेच असतात. दोघांच्याही कडे लक्ष देण्याची गरज आहे. छळ म्हणजे साधं भांडण नाही, साधी चिडवाचिडवीही नाही.तो मुद्दाम, सहेतुक, वारंवार, आणि एखाद्यालाच लक्ष्य करून केला जातो — त्याला त्रास द्यायचाच हेतू असतो. `छळवादी दांडगाई’ चे प्रकार. १) शारीरिक छळ. मारहाण, ढकलणे, वस्तू फेकणे, शारीरिक इजा. २) शाब्दिक छळ. नावं ठेवणे, उपहास, चिडवणे, टोमणे, धमक्या, शिव्या, छेडखानी, अश्लील बोलणे. ३) मानसिक सामाजिक छळ. चिडवणे, दुर्लक्ष करणे, एकटा पाडणे, सामूहिक बहिष्कार, अफवा पसरवणे, इतरांना भडकवणे. ४) सायबर छळ (सायबरबुलिंग) मोबाईल, सोशल मीडिया, मेसेजेस, ई-मेल अपमान, धमकावणे, फोटो, व्हिडिओ दुरुपयोग. ५) गंभीर गुन्हे. रॅगिंग, लैंगिक, गटाने, शस्त्राने हल्ला, ॲसिड हल्ला. हुंडा यांच्यात मुलांचा सहभाग. मुलं अशी का वागतात कारण त्यांना चांगले वागावे चुकीचे वागू नये हे कुणी कधी शिकवलेच नसते. ना घरी ना शाळेत. त्यांनी अशी वागणूक पाहिलेली असते. अनुभवलेली असते. “हे चुकीचं आहे” असं त्यांना कुणी सांगितलेलंच नसतं. ‘छळवादी दांडगाई’ बाबत शंकेखोरच असायला हवे” दर तीन मुलांपैकी एकाला छळवादी दांडगाईचा अनुभव आलेला असतो. मुलींना सुद्धा. इतकी या समस्येची व्याप्ती मोठी आहे. एक सडका आंबा अख्खी अढी नासवतो. दोनचार गुंड पुंड एकत्र येऊन लांडगे झाले, की ते दहा बारा कोकरांपैकी कुणाला तरी एकटे पाडून लक्ष्य करू शकतात. बाकीचे प्रेक्षक होतात. किंवा सहभागी होतात. मूल`छळवादी दांडगाई’ चा शिकार असल्याचा संशय यायला हवा. मुलांचं जेवण, वजन, झोप, बोलणं, वागणं अचानक बदलतं. डोकं दुखतं, पोट दुखतं, उलट येते अशी वारंवार तक्रार येते. पण तपासण्यात काहीच आजार सापडला नाही तर समजावं, कारण मानसिक आहे. दडपण आहे. ताण तणाव आहे. छळवादी दांडगाईची डॉक्टरांना शंका यायला हवी. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. वर्गात गटबाजी, टोमणे, सामाजिक सुसंवाद यावर शिक्षकांचे लक्ष द्यायला हवे. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. मूल जर वारंवार शाळेत जायचं नाही, तो मला त्रास देतो. असं म्हणत असेल. गप्प गप्प, एकटा रहात असेल. घाबरलेला, भेदरलेला वाटत असेल तर पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. मुलांशी बोला. बोलतं करा. मित्र, खेळ, वर्गातील, दिवसभरातील घटनांबाबत गप्पा मारा. काहीतरी सूचक सापडतेच. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. छळवादी दांडगाई थांबवली पाहिजे. दुष्परिणाम टाळायला पाहिजे. छळ सहन करणारी मुलं स्वतःला कमी लेखतात. स्वतःमध्ये गुरफटून जातात. त्याला शाळा, माणसं नकोशी वाटतात. बालपण हरवतं. ते एकटे पडतात. कधी कधी आत्महत्येपर्यंतही विचार जातात. आणि छळ करणाऱ्या मुलांना वाटतं की तेच स्ट्राँग, गटनायक हिरो आहेत. त्यांना गुंडगिरी करण्याचा निसर्गदत्त हक्क आहे. दुर्लक्ष झाले तर पुढे जाऊन ते गुन्हेगारीकडेही वळू शकतात. ग्रुपचा गट. गटाची गँग. गँगची कंपनी होऊ शकते. उशीर झाल्यावर चुकीची संगत लागली म्हणून चालत नाही. जागरूकता, सतर्कता, हा एकमेव मार्ग आहे. जागरूकता आणि संशयाचं तीक्ष्ण भान — हाच एकमेव उपाय! छळवादी दांडगाई थांबवा. बालपण वाचवा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या Read Post »

Happy Family

मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी

मी एक ‘चांगला माणूस’ बनेन.माझा मीच ठरवून चांगला बनेन.हाताला काम असेल, डोक्यात ज्ञान असेल — तोच खरा माणूस. नसेल, तर तो फक्त सजीव. चांगलं व्हायला शिकावं लागतं. चांगलं वागायलाही शिकावं लागतं. रोज थोडं थोडं ठरवून चांगलं वागत गेलो, तर आयुष्य सुंदर होतं. हे अजिबात कठीण नाही — अगदी सोपं आहे! कुटुंब हीच आपली खरी ताकद असते.कुटुंब म्हणजे आपल्या माणसांचं बंध, आपुलकी आणि आधार. फक्त रक्ताचं नातं म्हणजे कुटुंब नाही. जसे आहेत तसे एकमेकांना आपलं मानणं,जुळवून घेणं, हेच खरं कुटुंब.कुटुंबासाठी जगावं. कौटुंबिक जीवन समाधान आणि शांती देतं. कुटुंबाशिवाय जीवन म्हणजे मुळापासून अलग झालेलं झाड — उखडलेलं रोप. रोजच्या साध्या साध्या गोष्टींनी आपण चांगले होतो.घरात सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत जेवणं. जेवण तयार करणाऱ्याला “वा, मस्त!” अशी दिलेली दाद. घरातल्या स्त्रियांशी सन्मानाने वागणं,सर्वांशी आपुलकीने बोलणं.तिरकस, कुजकट बोलणं टाळणं. भांडणं न करता — समजूतदारपणानं वागणं.घरातली कामं आनंदानं करणं.या साध्याच साध्या गोष्टी चांगला माणूस बनवतात. त्यासाठी ना मोठं तत्वज्ञान लागतं, ना अध्यात्म. संवाद, सन्मान आणि संयम समृद्ध कौटुंबिक जीवनाची त्रिसूत्री.कुटुंब म्हणजे संवाद. घरातल्या माणसांशी नम्रतेने बोलावं.खेकसून बोलल्याने शब्द संपतात, पण मन ओरखडून जातं. योग्य वेळ, योग्य शब्द, योग्य प्रमाण — हाच संवादाचा मंत्र. मनातला राग, स्वार्थ, मत्सर, अहंकार — हे संसार उध्वस्त करतात. त्यामुळे कुणाला ओरबाडून काही मिळवण्याचा हव्यास नको. मी, कुटुंब आणि मग दुनियादारीप्रथम मी स्वतःची जबाबदारी ओळखावी. मग कुटुंबाची. आणि मग समाजाची. दुनियादारी म्हणजे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रसंगी त्याग करणं. स्वतःच्या वागणुकीवर लक्ष देणं. सज्जन माणसांच्या सहवासात राहणं. घरात प्रेम, संयम आणि समंजसपणा असेल, तर बाहेरच्या जगात वागणं सोपं आणि सहजसाध्य होतं. “मी, माझं, मला” करत राहिलो, तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणणार?कुटुंबसंस्था हे आपल्या भारतीय संस्कृतीचं सर्वात मोठं बलस्थान आहे. ती पूर्वापार लाभलेली अमूल्य देणगी आहे.ती समजा, आणि जीवापाड जपा. हेच खरं — मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी Read Post »

Scroll to Top