Child & Parental Guide

Father and son posing playfully on a wooden dock by the water, enjoying a day outdoors.

२१व्या शतकातील पालकत्व आणि बालविकास : एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन

आजच्या डिजिटल युगात पालकत्व बदलत आहे आणि त्या बदलाचा वेग अत्यंत जलद आहे. इंटरनेटमुळे माहिती सहज उपलब्ध झाली असली, तरी योग्य आणि शास्त्रीय माहिती ओळखणं मात्र अधिक कठीण झालं आहे. अनेक पालक प्रेम, काळजी आणि अनुभव यांच्या आधारे मुलांना वाढवत असले तरी बालविकासाची खरी शास्त्रीय बाजू समजून घेणं आता अत्यावश्यक बनलं आहे. पालकांनी घेतलेले निर्णय मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर थेट परिणाम करतात. त्यामुळे चुकीची माहिती, चुकीच्या सवयी किंवा गैरसमज यांचा परिणाम लहानपणीच होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर डॉ. अनिल मोकाशी यांनी पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लिहिले आहे. हे मार्गदर्शन प्रत्येक पालकाने वाचावं, समजून घ्यावं आणि आपल्या दैनंदिन पालकत्वात लागू करावं. २१व्या शतकातील पालकांनी बालपणाचं शास्त्र समजून घ्यायलाच हवं. 1) आजचं पालकत्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही.2) माहितीचा मारा वाढलाय, पण योग्य माहिती कमी आहे.3) प्रेम, काळजी आणि सामान्य माहिती पुरेशी राहत नाही.4) सुशिक्षित पालकांनाही अनेकदा “आपल्याला काय माहीत नाही” हे लक्षात येत नाही.5) म्हणूनच माहितीपूर्ण निर्णय घेणं आज अत्यावश्यक झालं आहे.6) मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नसते.7) फुलपाखराच्या जशा अंडे, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा विकासाच्या अवस्था असतात,8) तशाच माणसाच्या गर्भावस्था, नवजात, शैशव, शालेय वय, किशोरावस्था, प्रौढावस्था अशा अवस्था असतात.9) प्रत्येक टप्प्यावर शरीराची रचना बदलते.10) शरीराचं कार्य, मनोवस्था, आहार आणि गरजा बदलतात.11) प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या समस्या आणि वेगळे आजार दिसतात.12) हा फरक समजून न घेतला तर चांगले निर्णय चुकू शकतात.13) डॉक्टर फक्त आजारपणात लागतो असं नाही.14) बालरोगतज्ज्ञ म्हणजे बालपणाचं शास्त्र जाणणारा माणूस.15) तो काय सामान्य आहे, काय नाही, हे ओळखायला मदत करतो.16) शेजारी किंवा आजीपेक्षा डॉक्टराकडे जास्त शास्त्रीय माहिती असते.17) योग्य माहिती असलेले पालक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात.18) ते घाबरत नाहीत, उगाच प्रयोग करत नाहीत.19) ते मुलाच्या वाढीत अडथळा न होता आधार बनतात.20) आणि म्हणूनच २१व्या शतकातील पालकांनीबालपणाचं शास्त्र समजून घ्यायलाच हवं. 21st-century parents must understand the science of childhood. 1) Parenting today is not the same as it was earlier.2) There is an overload of information, but very little right information.3) Love, care, and general knowledge are no longer enough.4) Even educated parents often do not realise what they do not know.5) Therefore, informed decision-making has become essential today.6) A child is not a miniature adult.7) Just as a butterfly has stages—egg, larva, pupa, and butterfly,8) human beings also have stages—fetus, newborn, infancy, school age, adolescence, and adulthood.9) At every stage, the structure of the body changes.10) Body functions, mental state, diet, and needs also change.11) Each stage has its own problems and illnesses.12) If these differences are not understood, wrong decisions are likely to be made.13) A doctor is not needed only during illness.14) A pediatrician is a person who understands the science of childhood.15) He helps parents recognise what is normal and what is not.16) A doctor has more scientific knowledge than a neighbour or even a grandmother.17) Well-informed parents take the right decisions at the right time.18) They do not panic or experiment unnecessarily.19) They support their child’s growth instead of becoming an obstacle.20) That is why 21st-century parents must understand the science of childhood. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

२१व्या शतकातील पालकत्व आणि बालविकास : एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन Read Post »

A mother and daughter embrace and point at the sunset in a grassy field.

Mother, You and Your Child

A Journey of Changing CareFor Mother’s Day and Beyond From the very first breath your child takes, you become a mother—not just in body, but in mind, in soul, in every heartbeat. And from that moment until your last breath, you remain one. Mothering is not just feeding and protecting. It is caring and guiding. It is learning how to let go just enough—at the right time, in the right way. At this stage, your child needs you for everything—nourishment, sleep, warmth, and love. Your touch, your voice, even your scent is their world. Mothering here means total presence. Your baby doesn’t understand language yet, but understands comfort, rhythm, and consistency. This is when your child begins to explore. They walk, talk, question. You are still their anchor, but you are also their mirror. They imitate you, test limits. Here, mothering is about setting gentle boundaries and encouraging curiosity. Let them try, fall, and get up—under your watchful eye. Now the world begins to enter your child’s life—teachers, friends, books. Mothering shifts. You’re no longer the only voice, but still the most trusted one. Teach routines, values, health habits, emotional control. Support learning, but don’t overdo it. Allow space to grow socially and intellectually. Here comes the storm of change—physical, emotional, social. This is when parenting becomes hardest and most important. Your child wants freedom, yet secretly still needs safety. Don’t just control—connect. Talk less, listen more. Trust them gradually. Discuss, don’t dictate. Give independence, but draw clear lines of responsibility. This is where the foundations of lifelong resilience are built. Your child starts stepping out—career, relationships, choices. You worry. But this is the time to shift from protector to advisor. You have prepared them. Now let them try. Be a strong, quiet presence in the background—available, but not intrusive. By now, your child may have become a parent. You’re still a mother, but your role is wise and light-handed. Let them find their own way. Offer experience without imposing. You have not stepped back; you have grown forward. The Golden Thread: Care That Changes with Time What remains constant is love. What must change is the way it is shown. Overprotection delays growth. Too much distance creates fear. The art of mothering lies in knowing when to hold and when to let go. You are not just raising a child—you are shaping a person who must learn how to live, grow, adapt, and thrive in the world. Celebrate yourself this Mother’s Day. Not for being perfect, but for being present. Not for always knowing the answer, but for always being there to help find it. Becoming a mother may be natural — but understanding the science of childhood is not automatic.No mother is born with complete knowledge or expertise.She learns, adjusts, makes mistakes, and relearns — because the child keeps changing, and so does life. Raising a child isn’t only about love and instinct; it includes a thoughtful understanding of the child’s body, mind, health, prevention, and disease management.A wise mother knows when to seek timely help from professionals who understand child development better — not because she’s weak, but because she’s responsible. To grow as the child grows, the mother too must keep learning — not only new skills, but new perspectives. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Mother, You and Your Child Read Post »

Maharana Pratap

महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – महाराणा प्रताप: स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा. महाराणा प्रतापसिंह सिसोदिया! मेवाडचा पराक्रमी राजा! शिवाजी महाराजांच्या शंभर वर्षे आधी महाराणा प्रताप होऊन गेले. महाराणा प्रताप यांनी अकबराशी संघर्ष केला. शिवाजी महाराजांनी अकबराचा नातू औरंगजेब याच्याशी संघर्ष केला. राणा प्रतापाने स्वाभिमानाची ज्योत पेटवली, आणि शिवाजी महाराजांनी त्या ज्योतीला स्वराज्याचं रूप दिलं. महाराणा प्रताप याच राज्य अरावलीच्या डोंगररांगांमध्ये हिरवाईनी, किल्ल्यांनी, आणि शूर लोकांनी भरलेलं होतं. दिल्लीचा बादशहा अकबर सगळं भारतभर आपलं साम्राज्य पसरवत होता. अकबर म्हणाला, “राणा, माझा मांडलिक हो, माझ्या दरबारात येऊन कुर्नीसात कर.” पण स्वाभिमानी राणा प्रतापने ठाम उत्तर दिलं –“मी माझ्या मातृभूमीचा राजा आहे. मी कोणाचा गुलाम होऊ शकत नाही!” अकबर मोठी फौज घेऊन आला. हल्दीघाटीचं युद्ध झालं! राणा प्रतापाच्या घोड्याचं नाव होतं चेतक. पांढरा शुभ्र, उमदा. राणा प्रतापाच्या तलवारी सारखा लखलखीत. शत्रूही घाबरायचे! पण लढाई असमान होती. राणाला जंगलात माघार घ्यावी लागली. तो हारला नाही! जंगलात, पर्वतावर, झोपडीत राहून त्याने पुन्हा सेना तयार केली. आपल्या प्रजेला वाचवलं. आपल्या मातीचा अभिमान जपला. तो सोन्याच्या थाळीत जेवला नाही. त्यानी बांबूच्या वाटीतून मुलांसोबत भाकरी खाल्ली. तो स्वाभिमानाचा राजा होता! जिंकणं म्हणजे नेहमी सिंहासन मिळवणं नाही. जिंकणं म्हणजे मनातला स्वाभिमान न गमावणं! राणा प्रताप यांनी भारताला “स्वराज्य” आणि “संघर्ष” शिकवला. “राणा का प्रताप अमर है, स्वाभिमान की ज्योति प्रखर है।” महाराणा ना होते, महाराणा ना होते, ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. महाराणा प्रताप की जय.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा Read Post »

Mom taking care about sick child

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई बाळ आजारी पडले तर घरातील पहिली डॉक्टर आईच की! बाळाला ताप-सर्दी-खोकला झाला की पहिला प्रश्न येतो, आता काय करायचं? काळजी करण्यासारखं आहे की नाही, हे ठरवायचं कुणी. अर्थातच, आईनी. आईला जर वाटलं — “थोडं काळजी सारखं वाटतंय”, तर तिनं कुटुंबाला सांगायचं, आणि कुटुंबानं डॉक्टरकडे न्यायचं. हीच आपली कौटुंबिक मॅनेजमेंट साखळी. म्हणूनच, बाळाची पहिली जबाबदारी आईवरच असते. आणि त्यामुळे बाळाची आईला “माहितगार” होणे आवश्यक आहे. त्यासाठी महिन्यातून एकदा माहितगार बालरोगतज्ञाच्या संपर्कात, येणे आवश्यक आहे. सर्दी-खोकला (कॉमन कोल्ड) प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हजार एक वेळा सर्दी-खोकला होतो. तो व्हायरसमुळे होतो. दरवेळी नवीन व्हायरस, म्हणजे नवी सर्दी. शरीर त्या व्हायरसशी लढतं, आणि त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करतं. नवजात बाळाला सगळेच व्हायरस नवीन असतात. म्हणून पहिल्या वर्षी 10–12 वेळा सर्दी-खोकला होणं अगदी नॉर्मल आहे. मोठ्या मुलांना वर्षातून ५–६ वेळा, तरुणांना ३–४ वेळा, आणि वय वाढत जाईल तसं हे प्रमाण कमी होतं. सर्दी कशी होते आणि पसरते. सर्दी खोकला श्वासाने आणि स्पर्शाने पसरतो. कुटुंबात, शाळेत, प्रवासात, गर्दीत. म्हणूनच “मास्क वापरा, साथ टाळा.” कोरोना काळात आपण सगळ्यांनी मास्क वापरून आपले जीव वाचवले. अनेक आप्त स्वकीय जवळचे प्रेमाचे लोक देवा घरी गेले. पण अजूनही समाजाचे डोळे उघडले नाहीत. आजही सर्दी झाली तर कुणीही मास्क लावत नाही. अगदी डॉक्टर सुद्धा. मास्क लावण्याची प्रथाच, प्रचलित झाली नाही. खरे तर, बिनमास्कचे घर नको, बिनमास्कचा खिसा नको. हे आपले ब्रीदवाक्य व्हायला पाहिजे. सर्दी झाली की त्याला पहिला प्रतिसाद म्हणजे “मास्क वापरा” हा असायला हवा. घरात डिस्पोजेबल मास्कचा साठा हवा. डॉक्टर, शिक्षक, पालक — सगळ्यांनी ही मास्क संस्कृती रुजवायला हवी. ते त्यांचे सामाजिक कर्तव्य आहे. फळे, दही, थंड, खाल्ल्याने सर्दी होते हे खरे नाही. खोटे आहे. हा गैरसमज आहे! तो शेजारणीचा सल्ला आहे. किती पिढ्या आपण तो ऐकणार आहोत? कधीतरी डॉक्टरचे ऐका. विज्ञानाचे ऐका. सर्दी खाण्या-पिण्याने होत नाही. फळं, दूध, दही बंद करण्याची गरज नाही. उलट अन्नपाणी तोडल्याने बाळाचं नुकसानच होतं. बाळ उशिरा बरं होतं. सर्दीची लागण झाल्यावर शरीरात काय घडतं? व्हायरस शरीरात शिरतात आणि वेगाने वाढतात. दर 20 मिनिटांनी त्यांची संख्या दुप्पट होते! म्हणजे एका दिवसात कोट्यवधी व्हायरस शरीरात वाढतात. मग साधं संक्रमण “आक्रमणात” बदलतं. ही खरी लढाई आहे. आक्रमक व्हायरस विरुद्ध आपल्या प्रतिकारशक्तीची सेना. युद्धभूमी बाळाचे शरीर. काळजी सारखी सर्दी आहे की नाही, कसे ओळखावे. बाळ ताप-सर्दी-खोकल्यातही खेळतंय, खातंय, टवटवीत दिसतंय? तर विशेष काळजी नाही. पण बाळ गळून गेले आहे, निस्तेज आहे, बॅटरी डाउन झाली आहे, खात नाही, लघवी कमी होते, दम लागतोय, श्वास फास्ट आहे, बरगड्या आत खेचतायत. हा धोक्याचा इशारा आहे. बाळ झोपलं असताना एका मिनिटात 40 पेक्षा जास्त श्वास घेत असेल — डॉक्टरकडे जा. 60 पेक्षा जास्त — आजच दाखवा. 80 पेक्षा जास्त — आत्ताच हॉस्पिटलमध्ये न्या. श्वास घेताना नाकपुड्या हलत असतील, नखे किंवा ओठ निळसर दिसत असतील — जीवाचा धोका आहे. तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. आजारी बाळाचे अन्न तोडणे पाप आहे. नेहमीचा आहार, खाणं-पिणं चालू ठेवा. द्रव पदार्थ भरपूर द्या. पाणी पाजा. आईचं दूध ओढता येत नसेल तर पिळून चमच्याने पाजा. थोडं थोडं, जास्त वेळा खाऊ घाला. श्वास मार्गाचे आजार आणि घरगुती उपचार घसा धरला तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. कान ओला असेल तर कोरडा करा — औषधापेक्षा उपयोगी. मध, तुळस, आलं, लिंबू – हे घरगुती उपचार सुरक्षित असतात. औषध म्हणजे दुधारी शस्त्र सर्दी-खोकला बहुतेक वेळा आपोआप बरा होतो. निसर्गच त्याला बरे करतो औषधे क्वचितच लागतात. गरज नसताना दिलेल्या चुकीच्या धोकादायक औषधापेक्षा औषध न दिलेले जास्त चांगले. अँटीबायोटिकने व्हायरल सर्दी बरी होत नाही. पण आपल्या नेहमीच्या विश्वासाच्या डॉक्टरांनी दिल्यास त्यांच्या सल्ल्याने पूर्ण कोर्स घ्यावा. सर्दी होऊ नये म्हणून. सहा महिने फक्त आईचं दूध. पौष्टिक चौरस आहार ✅सरकारी + खाजगी, सर्व लसी वेळेवर ✅अ जीवनसत्वाचे डोस ✅मास्क आणि स्वच्छतेची सवय. बाळाच्या ताप-सर्दी-खोकल्यात आई म्हणजे पहिली डॉक्टर, पहिली नर्स, पहिली काळजीवाहक. माहिती हीच शक्ती. आई माहितगार झाली की घर सुरक्षित होतं. “मास्क वापरा, साथ टाळा.” बाळाची काळजी घ्या — पण घाबरू नका. निसर्ग, प्रतिकारशक्ती आणि आत्मविश्वास असलेली आई हीच खरी औषधं. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई Read Post »

Scabies in Child

Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore

Scabies Is caused by insects mites. Mites burrow tunnels into the skin. They lay eggs, leave poop : excreta, inside the tunnels. Allergy to mite, eggs or poop causes small itchy bumps and blisters. What to do. Scabies is a disease of family. Treating one child may not solve the problem. —————————— खरुज करणाऱ्या किड्यांना माइट्स असे म्हणतात. खरुज लहान मोठ्या कोणालाही होऊ शकते. रोज स्वच्छ आंघोळ करणाऱ्यांनाही खरूज होऊ शकते. खरजेचे किडे कातडी मध्ये स्वतःसाठी बोगदे खोदतात. अंडी घालतात, शी करतात. बोगद्यांच्या आतील किडे, अंडी किंवा शी च्या ऍलर्जीमुळे लहान खाज सुटते. कातडीवर पुरळ येते. फोड येतात. १. खाज सुटणे. (ही एक संवेदना sensation आहे) रात्री वाढते.२. पुरळ, कातडीच्या वर उठून दिसणारे.३. लांब, दोरीसारखे, एकमेकांना जोडलेले, किंवा वळणावळणाचे. लालसर.४. जाड, खवले, ओरखडे असलेली कातडी.(खाजवून ओरखडे येणे ही एक कृती action आहे)५. लहान मुले चिडचिड करतात. किरकिर करतात, रडतात.६. शरीराच्या कोणत्याही भागावर खरजेचे पुरळ येऊ शकतात.७. हातांवर (बोटांमधील खोबणी)८. मनगट, कोपर, हाताखाली. काखेत.९. कंबर, जांघेत.१०. मुलांचे डोके, चेहरा, मान, तळहात, तळपाय.११. खरुज हा संपूर्ण कुटुंबाचा आजार आहे. तो संसर्गजन्य आहे. एकमेकांचा एकमेकांना लागतो. स्पर्श, कपडे, अंथरुण पांघरूण , शाळेत, मोठ्या एकत्र कुटुंबात तो पसरतो. आईने काय करावे. १. माइट्स किड्यांवर उपयुक्त क्रीम किंवा लोशन. (सुरक्षिततेसाठी लोशन लहान मुलांचे हात पोचणार नाहीत असे उंचावर ठेवा) फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या. डॉक्टर बेंझिल बेंझोएट किंवा परमेथ्रिन मलम किंवा क्रीम देऊ शकतात. २. औषध लावण्यापूर्वी मुलाच्या अंगावरील सर्व कपडे काढून मुलाला उघडे करणे आवश्यक आहे. संपूर्ण अंगाला लावा (मानेखाली, पायाच्या नखापर्यंत, मागून पुढून). रोज रात्री झोपण्याआधी. (८ ते १० तास त्वचेच्या संपर्कात). सकाळी आंघोळ घाला. स्वच्छ कपडे घाला. इस्त्री केली तर फारच छान. कपडे निर्जंतुक होतात. किडे व त्यांची अंडी देखील मरतात. सलग ३ दिवस औषध लावा. ३. नखे कापून बोटांच्या टोकांवर औषध लावा. ४. खरूज म्हणजे स्केबीज चे निदान बरोबर असेल तर २४ तासांनंतर नवीन पुरळ यायला नको. ५. गरज पडल्यास पंधरा दिवसांनी परत एकदा औषध लावावी लागते. गरज पडल्यास असे तीन वेळा लावता येते. ६. कधीकधी खाज कमी करण्यासाठी औषध द्यावे लागते. ७. खरुज टाळण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांना, जवळच्या मित्रांना लक्षणे नसली तरीही त्वचेचे औषध लावा. कपडे गरम पाण्यात शक्यतो उकळत्या पाण्यात धुवा, उन्हात वाळवा. इस्त्री करा. त्यामुळे खरुज आजार निर्माण करणारे किडे, माइट्स, त्यांची अंडी मरतात. ८. पू, सूज, जिवाणू bacteria संसर्ग असल्यास, डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकतात. खरुज हा कुटुंबाचा आजार आहे.फक्त एखाद्या मुलावर उपचार करून प्रश्न सुटणार नाही. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore Read Post »

आईबाबांनो, भांडा पण जरा जपून. मुलं शिकताहेत !

आई वडोलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रीयकियाप्रवर्तक (हारमोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. आईवडीलांच्या भांडणात मुलं काळजीनी घेरली जातात. घाबरतात, भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्या मुळेच भांडण होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रीत करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासाात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधान काळ कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उध्दटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्रमकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानसिक समस्या येवू लागतात. मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी त्यात कौटूंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडतांना स्वतःवर मर्यादा घालून घ्यायला हव्या. त्या पाळायला हव्या. भांडणप्रसंगी काय करावे:शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा.राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी.मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे.माफी मागायला व माफ करायला शिकावे.सहसंमतिने मधूनच ‘पाणी’, ‘चहा’, ‘इतर’ यासाठी ‘भांडणविश्रांती’ घ्यावी. भांडणप्रसंगी काय करू नये:मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको.शिवीगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उध्दार नको.निघून जावू नये. त्यानी प्रश्न सुटत नाही.किंचाळून खेकसून बालणे नको. जाहीर भांडण नको.मुलांना भांडणात ओढायला नको.फक्त वयस्कांचे ‘लैंगिक’, ‘पैसे’, ‘सासुरवाडी’ असे विषय मुलांसमोर नको.जुन्या चुका, जुने मुददे उकरून उकरून भांडण नको. थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचाच एक भाग असतो. अगदी बंद दाराआड कुजबुजत भांडायची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलून वाट मोकळी करून देणं आवश्यक असतं. कुटूंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्या. रागाच्या भरात बोललेलं सगळचं खरं नसतं हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडीलांना भांडतांना बघितल्यावर जुळवून घेतानाही बघायला हवे. त्यातून ते तडजोड किती जीवनावश्यक आहे, जुळवून कसे घ्यावे हे धडे शिकतील. पण भांडणं वारंवार, जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होवू लागली तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधा-यांचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटूंबाचं हित आहे. भांडणाचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेलं व्यसन, जुगार, पावित्रयाबद्दल शंका असे प्रश्न समुपदेशनातून उघड होतात व त्यांचे निवारण करता येते. म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा पण जरा जपून, तुमची मुलं बघताहेत, ऐकताहेत, शिकताहेत. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आईबाबांनो, भांडा पण जरा जपून. मुलं शिकताहेत ! Read Post »

संत तुकाराम म्हणजे भक्ती

संत तुकाराम म्हणजे भक्ती. भारतीय इतिहासाच्या गोष्टी. देहूचे संत तुकाराम म्हणजे भक्ती. संत तुकाराम म्हणजे अभंग. तुकारामाची पालखी. पालखी मार्ग. भक्तीचा मार्ग. पंढरपूरची वारी. चालत चालत. अभंग गात. जे का रंजले गांजलेत्यांसी म्हणे जो आपुलेतोची साधू ओळखावादेव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवातोची मुंगी साखरेचा रवा.लहान वयातच देवावर प्रेम करायला सुरुवात करा. ऐरावत रत्न थोरत्यासी अंकुशाचा मारजया अंगी मोठेपणतया यातना कठीण मोले घातले रडायानाही आसू नाही मायाऐसा भक्तीवेड कायरंग बेगडीचा न्यारा पांढऱ्या शुभ्र कापसाच्या फुलावर कुठलाच मळकट रंग नसतो. भक्तीचं वेड असलेल्या माणसाचं मन साफ आणि सुंदर असतं. पांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंग बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलकरावा विठ्ठल, जिवभावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल संत तुकाराम महाराज की जयपंढरीनाथ महाराज की जयएकनाथ महाराज की जयनामदेव महाराज की जयज्ञानेश्वर महाराज की जय जय महाराष्ट्रजय हिंदभारतमाता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

संत तुकाराम म्हणजे भक्ती Read Post »

Caring for Children with Different Needs

A child who is difficult to raise or educate is sometimes called a problem child. Many children do not develop or learn like others. They are different. They are special. They have special needs. “Special” does not necessarily mean abnormal. There are many special children around. SPECIAL CHILDREN The list is unending. It is a community pediatric problem. The causes of such difficulties are classified according to etiological factors: A pediatrician is the first contact person in case of any childhood problem, health or otherwise. He is supposed to identify and institute remedial measures. Calling any problem multidisciplinary is sometimes counterproductive. When everybody is responsible, in fact nobody is responsible. Here comes the role of child advocacy. Family and community connections with schools are many times the answer to educational needs of children with difficulties. SPECIAL PROBLEMS Formal education is designed for typical children, in typical families, in a typical community. Special needs children in formal school get the label of scholastic backwardness. “If he cannot learn the way we teach, we should teach the way he can learn.” That is the guiding principle of special schools. We need to identify the cause of “Red Lines in School Progress Card” and institute remedial measures. Special education in essence is remedial education. It is individualized education. Because of difficulties faced by special children, a formal school cannot cope with their needs. They need a special school. It is not enough to identify the branch as ‘special education’, or to call the teachers ‘special education graduates’. Special facilities with special syllabus and special curriculum need to be evolved. SPECIAL SCHOOL There are few schools for children with mental retardation and hearing impairment. Still fewer for the blind. There are hardly any facilities for slow learners, dyslexics, autistics. In many places these special children are grouped with children having intellectual disability. The flaw lies in government rules. Government wants to report all special children as mild intellectually disabled. Special schools need special teachers, smaller classes, capacity-building curriculum, developmental atmosphere (not just academic), audio-visual aids, do-it-yourself mode of learning, multisensory teaching programs (our specialty). A child needs 4 hours academic & 2 hours developmental syllabus. Extracurricular activities should be considered curricular activities. What he can do is more important than what he knows. Teach them doing things. Developmental syllabus promotes action. OPEN EDUCATION AND NIOS Open education is adjustable to the needs of an individual special child. It is non-competitive. The rat race for marks is eliminated. So are extra tuitions, extra homework, frustration, and resulting humiliation. With the help of open education a special child can enjoy learning. National Institute of Open Schooling (NIOS) has given us this opportunity to bring smiles on the faces of special children and their parents. NIOS is a statutory body established by the Human Resource Ministry of Government of India. It is like CBSE or SSC board. It is established for children who cannot attend formal school. Special children also cannot attend formal school. They do not like ‘this school’; the school does not like ‘this child’. Both struggle with each other. Best of the schools wait for a second-time failure and hand over the school leaving certificate. What happens to the child is none of their business. It is not their fault. They are not equipped to handle the child. NIOS Open Basic Education offers 3rd, 5th, 8th standard courses. Examination is conducted locally by our school. The 10th and 12th examinations are conducted by NIOS at national level. NIOS has special schemes for handicapped and disadvantaged children. They have vocational subjects in academic curriculum. That is the revolution. Students have the freedom to choose their subjects. They can pass 10th & 12th without Math, Science, and English. 60 percent of children fail in S.S.C. / H.S.C. All of them fail in these three subjects only. A small businessman, trader, service provider, electrician, plumber, building contractor, hotel owner, farmer, sportsman, singer, photographer needs to pass 12th but need not get stuck with Mathematics, Physics, Chemistry, and English. But he needs to be a graduate. Open education has opened the gates for him. Home science teaches adequate science. Subjects like typing, word processing, business studies are useful for life. Five subjects option, credit accumulation facility, direct registration facility – all are novel, extremely useful concepts. The disability sector needs to revise its orientation and fit their curricula in NIOS format. At Baramati we have done just that. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Caring for Children with Different Needs Read Post »

Failed in exam

प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना

या प्रगतीपुस्तकात आलेल्या लाल रेघांनी घरोघरी धुमाकूळ घातला आहे. अनेक पालकांना आपले आयुष्य उध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. सर्व भौतिक सुखे पायांशी लोळण घेत असताना शैक्षणिक अपयश का यावे हेच त्यांना समजत नाही. कुणाचं काय चुकलं याचा शोध कुटुंबात चालू आहे. आई, वडील, शिक्षक, शाळा, शिकवणी हे सर्वजण लाल रेघांचे पितृत्व एकमेकांवर ढकलून विश्वामित्री पवित्रा घेत आहेत. मुलं तर बिचारी आई-वडिलांची प्रक्षोभक किंवा हताश प्रतिक्रिया पाहून अवाक झाली आहेत. सैरभैर झाली आहेत. परिस्थिती या चिमुरड्याच्या आटोक्याबाहेर आहे. त्यांच्या आजूबाजूची माणसं कशी वागतील यावर मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची घडी बसणे किंवा विस्कटणे अवलंबून आहे. अशा कुटुंबांना मदतीचा हात हवा आहे. मार्गदर्शन हवे आहे. पालक लाल रेघा आल्यावर धावपळ चालू करतात. शिक्षक, मुख्याध्यापक, शिकवणीचे सर यांना भेटतात “अधिक कष्ट घ्या, अधिक लक्ष द्या, काळजी करू नका, पुढे जाऊन त्याला आपोआप समज येईल.” असे सल्ले मिळतात. घरातले वडीलधारे नातेवाईक मुलांसाठी जास्त वेळ देण्याचा सल्ला देतात. शाळा बदल, माध्यम बदल, राहण्याची जागा बदल, होस्टेलवर पाठव, जास्तीच्या शिकवण्या लाव अशा टोकाच्या उपाययोजना केल्या जातात. हा प्रश्न असा आज या घडीला निर्णय घेऊन एक्शन घेणारा नसतो. शैक्षणिक पीछेहाट एकाच वेळी विविध कारणांनी होत असते. त्यांचे निदान करून निवारण करण्यासाठी पावले उचलावी लागतात. बालमार्गदर्शन केंद्र (Child Guidance Clinic) ही अशावेळी सल्ल्यासाठी जाण्याची जागा आहे. बालमार्गदर्शन केंद्रात बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, श्रवणतज्ञ, वाचनतज्ञ, बालमानसतज्ञ, सोशल वर्कर, फिजिओथेरपिस्ट, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ असतात. ते सगळे मिळून शैक्षणिक पीछेहाटीची कारणं शोधून काढतात, मार्गदर्शन करतात. एकंदरीत Child Guidance Clinic म्हणजे प्रगतीपुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना आहे, असे समजायला हरकत नाही. लाल रेघांची काही कारणे :१. डोळ्यांना नंबर२. ऐकायला कमी येणे३. वाचनदोष४. लेखनदोष५. स्पेलिंग घोटाळा६. वाचादोष७. कमी एकाग्रता८. अस्थिरता९. कमी बुद्धिमत्ता१०. कौटुंबिक ताणतणाव११. वर्तणूक समस्या१२. शाळेतील समस्या१३. भावनांशी वैर१४. जुनाट शारीरिक आजार१५. शैक्षणिक अपरिपक्वता१६. अति कडक किंवा अति बेफिकीर पालक१७. पालकांच्या अवाजवी अपेक्षा अशी अनेक कारणं असतात. अनेकदा एकाच वेळी अनेक कारणं काम करत असतात. त्यांच्याकडे कानाडोळा केल्यास लाल रेघा येतात. सुशिक्षित पालकांना आपल्याला सगळं समजतं असा गैरसमज असतो. आपल्याला मदतीची गरज आहे हे त्यांना माहीत नसतं. विशेषतः नापास होण्याचं कारण मानसशास्त्रीय असलं तर ते पालकांना पटायला कठीण जातं. मानसिक व भावनिक समस्या म्हणजे फक्त मनोरुग्ण असं नाही. नॉर्मल मुलांनाही मानसिक व भावनिक कारणांनी शैक्षणिक अडचणी येऊ शकतात. “काही नाही, तो फक्त आळशी आहे” — हे वाक्य स्वतःची फसवणूक करून घेण्यासाठी म्हटलं जातं. खरं तर मुलगा अजिबात आळशी नसतो हे म्हणणाऱ्यालाही ठाऊक असतं. बुद्ध्यांक मापन करणे महत्त्वाचे असते. चांगली बुद्धी असूनही नापास होण्याची कारणं असतात. आणि बुद्धी कमी असूनही कष्टाळू मुले चांगले मार्क मिळवू शकतात. चष्म्याचा नंबर काढणे, श्रवणशक्तीद्वारे अनेक मुलांच्या लाल रेघा निघालेल्या आम्ही पाहिल्या आहेत. मानसिक व भावनिक चाचण्या देखील महत्त्वाच्या आहेत. मानसशास्त्रज्ञांशी चर्चा म्हणजे मनोरुग्ण असणे असे नाही. तज्ञांच्या हातून केलेल्या अशा चाचण्यांचे निष्कर्ष सहसा योग्यच असतात. अशा प्रसंगी पालकांना पटले नाही तरी पालकांनी सहकार्य करायला हवं. सल्लागाराचे कर्तव्य योग्य सल्ला देण्याचे आहे, पटेल असाच सल्ला देण्याचे नाही. उदाहरणार्थ : मुलगा सातवीत गेला, लाल रेघा आल्या म्हणून बालमार्गदर्शन केंद्रात आणला. शैक्षणिक क्षमता चाचणीत लेखन, वाचन, गणित या तीन क्षेत्रात चौथीची क्षमता सिद्ध झाली. आता त्याला शाळेत सातवीचे शिक्षण, सगळीकडे शेकड्यात मुले — कशी होणार प्रगती? नुसतं “त्याचा पाया कच्चा राहिला” हे वाक्य म्हणून प्रश्न सुटणार नाही. हा पाया पक्का करण्यासाठी काही प्रयत्न हवेत. बालमार्गदर्शन केंद्रातील शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ वैयक्तिक क्षमताधिष्ठित शैक्षणिक आराखडा (Individualized Education Therapy Plan) आखतात आणि त्याची अंमलबजावणी करणारी विशेष शिकवणी/शैक्षणिक उपचार (Educational Therapy) देतात. एकेक क्षमता वाढवतात. ती आली की पुढच्या पायरीवर जातात. काही केंद्रांमध्ये ही सोय नसते, पण नसली तर ती निर्माण करायला हवी. आपलं काम समाजाच्या उपयोगी पडण्याचं आहे. सल्ला देऊन मोकळं होण्याचं नाही. पालकांनी लाल रेघांच्या दवाखान्यात जावं. शिक्षकांनी पालकांना पाठवावं. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना बालमार्गदर्शन केंद्राचं कार्य व उपयोग याविषयी माहिती द्यावी. एकूणच समाजाचा शैक्षणिक पीछेहाट बघायचा दृष्टिकोन परिपक्व व शास्त्रोक्त व्हावा ही या लेखामागील अपेक्षा आहे. आपल्या जवळचं बालमार्गदर्शन केंद्र कोठे आहे हे जवळच्या बालरोगतज्ञांना विचारा. जवळपास नसल्यास ते निर्माण करायला पुढाकार घेण्याची विनंती बालरोगतज्ञांना करा. पक्का पाया शिकवणी बालकल्याण केंद्रामार्फत प्रगतीपुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना चालवला जातो. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने शैक्षणिक पीछेहाटीची कारणं शोधली जातात. विशेषतः गतिमंद आणि शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी विशेष वैयक्तिक शिक्षणाची गरज असते. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत अशाप्रकारे उपचारात्मक शिक्षण देण्याची व्यवस्था नाही. आठवीतल्या मुलाला चौथीचं लिहता-वाचता येत नसेल तरी आठवीचीच शिकवणी लावली जाते. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या व एकूण परिस्थिती पाहता शाळांकडून फार अपेक्षा ठेवता येत नाही. समाजाने व पालकांनी या अडचणीतून मार्ग काढायला हवा. बालकल्याण केंद्राने आपल्या “पक्का पाया शिकवणी” प्रकल्पामार्फत हे काम हाती घेतले आहे. विशेष शिक्षकांमार्फत खाजगी शिकवणीच्या स्वरूपात हा प्रकल्प राबवला जातो. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वैयक्तिक शैक्षणिक आराखडा आखतात व दर तीन महिन्यांनी प्रगतीचा आढावा घेतात. विशेष शिक्षक क्षमताधिष्ठित शिक्षणाच्या तत्त्वावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना Read Post »

Sant Eknath

पैठणचे संत एकनाथ महाराज

पैठणचे संत एकनाथ महाराज – 10 भारतीय इतिहासाच्या गोष्टी महाराष्ट्राची संतपरंपरा खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, त्यानंतर सोळाव्या शतकातील तेजस्वी संत. एकनाथ महाराज. आणि मग आले तुकाराम महाराज. त्या काळात लोकांच्या मनात जातपात, भेदभाव आणि अन्याय खोलवर रुतलेले होते. पैठणचे संत एकनाथ महाराज विठोबाचे मोठे भक्त होते. त्यांची शिकवण होती – सगळ्यांना आपले मानावे. एकदा काय झाले?गोदावरी नदीच्या घाटावर संत एकनाथ स्नानाला गेले होते. वाटेत एक खोडकर माणूस उभा राहिला. त्याने घरातले घाण पाणी एकनाथांच्या अंगावर फेकले. संत काही न रागवता पुन्हा स्नानाला गेले. तो पुन्हा पुन्हा तसेच करीत राहिला. अनेक वेळा हे घडले. शेवटी संत एकनाथ हसून म्हणाले –“बरे झाले! माझ्या मुळे तुझ्या घरातले सगळे घाण पाणी संपले. बघ, माझा तुला उपयोगच झाला.” हे ऐकताच तो दुष्ट खजील झाला. येऊन एकनाथांच्या पायांशी पडला. संतांच्या क्षमाभावाने आणि सहनशीलतेने त्याचे मन उजळले. संत एकनाथ म्हणतात –“एका जनार्दनी नाम घेऊनी । सुखेचि सुखे भोगावे ॥” ते पुढे एकनाथी भागवत लिहितात. लोक म्हणतात –“एकनाथी भागवत वाचलं की, मन शांत होतं, आनंदी होतं, आणि भांडणं कमी होतात.” आपण गातो ती दत्ताची आरती“त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा” ही सुद्धा संत एकनाथांनीच लिहिली आहे. श्री संत एकनाथ महाराज की जय!जय महाराष्ट्र!भारत माता की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पैठणचे संत एकनाथ महाराज Read Post »

मासिक पाळी : वाढ, बदल आणि आत्मविश्वास

‘पाळी’ म्हणजे काय? ‘पाळी’ येते म्हणजे योनीमार्गे रक्त आणि टिश्यूचा प्रवाह सुरू होतो.दरमहा येते म्हणून तिला मासिक पाळी म्हणतात. पाळी साधारणपणे २ ते ७ दिवस चालते.पहिल्यांदाच येणाऱ्या पाळीला “मिनार्की” म्हणतात.ही वाढीचं लक्षण आहे. शरीर तयार होत आहे. तरुण होत आहे. पाळीत रक्त किती जाते? एका ‘पाळी’त साधारण ३० मिली रक्त जाते.👉 अंतर्वस्त्राला आतून चिकटणारे पॅड वापरावे.👉 पॅड रक्त शोषून घेते आणि कपड्यांवर डाग येणार नाहीत.👉 आता नवीन ‘मेंस्ट्रुअल कप’ देखील उपयुक्त, सोयीचे आणि हायजेनिक आहेत. त्याबद्दल माहिती करून घ्या. शरीरात काय चाललं आहे? पण बहुतेक वेळा स्त्रीबीज फलित होत नाही.तेव्हा निरुपयोगी झालेलं अस्तर मासिक पाळीच्या स्वरूपात बाहेर टाकलं जातं. 👉 पाळी २१ ते ४५ दिवसांची असू शकते. पाळी कधी सुरू होते? बहुतांश मुलींमध्ये पहिली पाळी १० ते १५ वर्षे या वयोगटात येते.सरासरी वय साधारण १२ वर्षे असते. जर पहिली पाळी १० वर्षांपूर्वी किंवा १५ वर्षांनंतर आली,तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आधी दिसणारी लक्षणे काय नॉर्मल आहे? आईला ‘नॉर्मल काय आहे’ हे माहिती असतं.👉 तिच्याशी या विषयावर बोला.👉 कुठलीही समस्या आली तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ‘पाळी’ म्हणजे काय खरं तर? पहिल्या पाळीची थोडी टेन्शन येणं अगदी स्वाभाविक आहे.पाळीमुळे होणारी कटकट कुणालाच आवडत नाही. पण — अभिमान बाळगा.‘मासिक पाळी येणे’ म्हणजे शरीराची वाढ व विकास योग्य आहे याचं सुंदर लक्षण आहे. What is a ‘Period’? A ‘period’ means blood and tissue flow from the vagina.It comes every month, hence called menstrual period. A period lasts for 2 to 7 days.The first period is called “Menarche”.It is a sign of growth — the body is preparing, becoming young. How much blood is lost? About 30 ml of blood is lost in one period.👉 Wear a pad that sticks to underwear.👉 The pad absorbs blood and prevents stains.👉 The new menstrual cup is also very useful, convenient, and hygienic. Learn more about it. What’s going on inside the body? But most of the time, the egg is not fertilized.The lining is shed in the form of a period. 👉 A normal cycle ranges from 21 to 45 days. When do periods start? In most girls, the first period starts between 10 and 15 years.The average age is 12 years. If it occurs before 10 or after 15 years,consult a gynecologist. Early signs before first period What is ‘Normal’? Mothers know what is normal.👉 Talk with her about “this” topic.👉 If there are any problems, consult a gynecologist. What does ‘Period’ mean? It’s natural to be a little nervous about the first period.No one really likes the inconvenience it brings. But — be proud.‘Menstruation’ is a sign of normal growth and development. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

मासिक पाळी : वाढ, बदल आणि आत्मविश्वास Read Post »

गोष्ट संत नामदेव महाराजांची

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. 9 संत नामदेव महाराज यांची गोष्ट. भारतीय इतिहासात महाराष्ट्राची संतपरंपरा खूप महत्त्वाची आहे. संत नामदेव महाराज यांची गोष्ट त्यातले एक तेजस्वी पान आहे.संत नामदेव यांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग निवडला.पंढरपूरच्या वारीने हे महत्त्व आजही टिकून आहे. – संत नामदेवानी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. भक्ती लोकांपर्यंत नेली. विठ्ठल भक्तीचे घर बांधले. तर तुकाराम महाराजांनी त्या भक्तीच्या परंपरेचा कळस चढवला. अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला तेज दिलं. 2.“सत्य सोडून देऊ नये.” नामदेव म्हणतात, खोटं बोलणं म्हणजे देवापासून दूर जाणं. शाळेत, घरी, मित्रांत – सत्याला धरून राहा. नेहमी खरे बोला. 3.“सर्वत्र विठोबा आहे.” प्रत्येक माणसात देव आहे. सर्वांशी नीट वागावे. फक्त देवळात जाऊन प्रार्थना नाही, तर रोजच्या वागण्यात दयाळूपणा, मदत, चांगुलपणा — हाच खरा देव. नामदेव सांगतात, गरजेपुरतं घेतलं की समाधान मिळतं. जास्तीचा लोभ शेवटी त्रास देतो. “दोन पेढे छान, पण दोन किलो खाल्ले तर?” दोन जिलब्या छान पण दोन किलो खाल्ल्या तर. गरजे पुरतं घेतलं की समाधान मिळतं. “श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.श्री संत नामदेव महाराज की जय.श्री संत एकनाथ महाराज की जय.”जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गोष्ट संत नामदेव महाराजांची Read Post »

Scroll to Top