Child & Parental Guide

A child and mother engaging with a laptop at a home table, focused on learning or work.

डिजिटल जग आणि मूल

बदलत्या बालपणाशी जुळवून घेताना “आजकालची मुलं फार बदलली आहेत!” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. कधीकधी आपणही म्हणतो. पिढ्यांमधले अंतर काही आजचे नाही. प्रत्येक पिढीला पुढची पिढी वेगळी वाटली आहे. पण आजचा बदल केवळ नेहमीचा generation gap नाही. केवळ आपलेच मूल बदललेले नाही.सगळीच मुले बदललेली आहेत.सगळ्यांचीच मुले बदललेली आहेत. कारण— बालपणाची संपूर्ण परिसंस्थाच बदलली आहे. मुलाला फक्त आई-वडील वाढवत नाहीत. त्याच्या भोवतालचे कुटुंब, शाळा, मित्र, समाज, आरोग्य आणि वातावरण—हे सारे मिळून त्याला घडवत असतात. यालाच आपण ‘बालपणाची परिसंस्था’ म्हणतो. डिजिटल क्रांतीने या संपूर्ण परिसंस्थेलाच बदलून टाकले आहे. घर बदलले. शाळा बदलली. मित्रांशी संबंध बदलले. खेळ बदलले. मनोरंजन बदलले. माहिती मिळवण्याचे मार्ग बदलले. एकमेकांशी बोलण्याच्या पद्धती बदलल्या. आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता—AI—आल्यामुळे शिकणे, प्रश्न विचारणे, उत्तरे शोधणे आणि ज्ञानाशी संवाद साधणेही बदलत आहे. डिजिटल जग आता फक्त मोबाईलमध्ये नाही म्हणूनच हा प्रश्न आता फक्त “मोबाईल आणि मूल” एवढा राहिलेला नाही. मोबाईल हे एक साधन आहे. डिजिटल जग त्याहून खूप मोठे आहे. ते घरात आहे. शाळेत आहे. अभ्यासात आहे. खेळात आहे. मित्रांच्या गप्पांमध्ये आहे. मनोरंजनात आहे. खरेदीत आहे. आरोग्यविषयक माहितीत आहे. आणि हळूहळू मुलाच्या विचारविश्वातही प्रवेश करत आहे. डिजिटल जग बालपणाच्या परिसंस्थेतील केवळ एक घटक राहिलेले नाही; ते संपूर्ण परिसंस्थेत मिसळले आहे. बालपणाच्या सीमा बदलल्या पूर्वी घराला दार होते. शाळेला गेट होते. मित्र आसपासचे असायचे. खेळ मैदानावर व्हायचा. माहिती आई-वडील, शिक्षक, पुस्तके आणि आसपासच्या समाजातून मिळायची. मुलाच्या जगाच्या भौगोलिक सीमा होत्या. आज त्या सीमा जवळजवळ नाहीशा होत आहेत. एका छोट्याशा स्क्रीनमधून जग मुलाच्या घरात येते. आणि त्याच स्क्रीनमधून— मूलही जगात प्रवेश करते. मुलाच्या हातात केवळ एक मोबाईल आलेला नाही. त्याच्या हातात जगाची खिडकी आली आहे. मग हे चांगले की वाईट? डिजिटल जग म्हणजे वाईट आणि आपले जुने जग म्हणजे चांगले—इतके साधे हे गणित नाही. डिजिटल जगाने मुलांसाठी ज्ञानाची प्रचंड दारे उघडली आहेत. मुलाला जगातील उत्तम शिक्षक ऐकता येतात. विज्ञान पाहता येते. भाषा शिकता येतात. संगीत ऐकता येते. चित्रकला करता येते. दूरच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्क ठेवता येतो. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी नवीन साधने उपलब्ध झाली आहेत. आणि आता AI मुलाच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकते, समजावून सांगू शकते आणि त्याच्याशी संवादही साधू शकते. पण याच जगात चुकीची माहिती आहे. हिंसक किंवा वयाला अयोग्य मजकूर आहे. सायबरबुलिंग आहे. सततची तुलना आहे. जाहिराती आहेत. आणि मुलाचे लक्ष शक्य तितका वेळ स्वतःकडे धरून ठेवण्यासाठी बनवलेल्या डिजिटल यंत्रणाही आहेत. म्हणून प्रश्न डिजिटल जग स्वीकारायचे की नाकारायचे हा नाही. प्रश्न आहे— या डिजिटल जगात आपल्या मुलाला वाढायला कसे शिकवायचे? फक्त Screen Time पुरेसे नाही किती तास मोबाईल पाहिला? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्याहूनही काही प्रश्न महत्त्वाचे आहेत. मूल स्क्रीनवर काय पाहते? ते का पाहते? त्यातून काय शिकते? कोणाशी संवाद साधते? कशावर विश्वास ठेवते? कुणाशी स्वतःची तुलना करते? आणि त्या डिजिटल अनुभवामुळे त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातून काय बाजूला पडत आहे? झोप? खेळ? व्यायाम? अभ्यास? कुटुंबातील गप्पा? मित्रांसोबतचा प्रत्यक्ष सहवास? की स्वतःशीच निवांत राहण्याचा वेळ? म्हणून आता केवळ Screen Time मोजून डिजिटल बालपण समजणार नाही. ‘श्यामची आई’ आता कुठून आणणार? आपल्या पिढीला श्यामची आई प्रिय आहे. त्या काळातील साधेपणा, संस्कार, कुटुंबातील जवळीक आणि जगण्याची मूल्ये आपल्याला आजही हवी आहेत. पण श्यामच्या आईच्या काळचे वातावरण आज कुठून आणणार? आता तसाच श्याम नाही.तशीच श्यामची आई नाही.आणि तशी परिसंस्थाही राहिलेली नाही. श्यामची आई आपल्याला आजही मूल्ये देऊ शकते. पण तिच्या काळचे बालपण आपण आजच्या मुलावर लादू शकत नाही. मूल्ये टिकवता येतात.काळ मागे नेता येत नाही. “आबा, मला माझा स्वतःचा व्लॉग सुरू करायचा आहे…” काही वर्षांपूर्वी माझा दहा वर्षांचा नातू समिहन मला म्हणाला, “आबा, मला माझा स्वतःचा व्लॉग सुरू करायचा आहे. मदत कराल?” प्रश्न माझ्यासमोरही उभा राहिला. त्याला डिजिटल जगापासून दूर ठेवायचे? की त्याला त्या जगात जबाबदारीने वावरायला शिकवायचे? मी त्याला वाढदिवसाला एक टॅबलेट दिला. आणि त्यासोबत एक चिठ्ठी दिली— “अटी आणि नियम.” आज मागे वळून पाहताना वाटते, उत्तर त्या टॅबलेटमध्ये नव्हते. उत्तर त्या सोबतीत होते. मुलाला संधी द्यायची. त्याच्या नव्या जगाबद्दल उत्सुकता ठेवायची. त्याच्याबरोबर शिकायचे. धोके समजावून घ्यायचे. मर्यादा ठरवायच्या. आणि हळूहळू स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकवायचे. बंदी नाही. बेबंदपणाही नाही. आपल्यालाच पुन्हा शिकावे लागेल आजच्या मुलांना कालच्या जगासाठी तयार करून उपयोग नाही. ती मोठी होणार आहेत उद्याच्या जगात. आणि गंमत अशी की— ती ज्या जगात मोठी होणार आहेत, त्या जगाचा पूर्ण अनुभव आपल्यालाही नाही! म्हणून पालकांनी शिकावे लागेल. आजी-आजोबांनी शिकावे लागेल. शिक्षकांनी शिकावे लागेल. डॉक्टरांनी शिकावे लागेल. आणि अनेकदा— मुलांकडूनही शिकावे लागेल. आपण त्यांना आपला अनुभव देऊ. त्यांच्याकडून नवे जग समजून घेऊ. मग कदाचित generation gap ही दरी न राहता दोन पिढ्यांना जोडणारा पूल बनेल. आपली भूमिका काय? डिजिटल जग मुलांपासून बंद करणे हे उत्तर नाही. मुलाला डिजिटल जगात एकटे सोडणे हेही उत्तर नाही. आपले काम प्रत्येक डिजिटल दाराला कुलूप लावणे नाही. कोणते दार उघडायचे, किती उघडायचे आणि त्या दारातून दिसणाऱ्या जगाकडे कसे पाहायचे—हे मुलाला शिकवायचे आहे. नियंत्रणापेक्षा संवाद. भीतीपेक्षा समज. बंदीपेक्षा विवेक. केवळ वापरापेक्षा निर्मिती. आणि डिजिटल संपर्काबरोबर प्रत्यक्ष मानवी नाती. बालपण मात्र जपायचे आहे तंत्रज्ञान बदलत राहील. आजचा मोबाईल उद्या बदलेल. आजचे सोशल मीडिया उद्या वेगळे असेल. AI आणखी बदलेल. पण मुलाच्या काही गरजा हजारो वर्षांपासून बदललेल्या नाहीत. प्रेम. सुरक्षितता. स्वीकार. खेळ. कुतूहल. मैत्री. संवाद. कौतुक. आपलेपणा. आणि आपल्या माणसांचा सहवास. त्यामुळे डिजिटल युगासाठी आपल्याला जुन्या बालपणाची नक्कल नको. आजच्या काळाला अनुरूप चांगले बालपण घडवायचे आहे. मूल्ये टिकवायची; माध्यमे बदलू द्यायची. बालपण जपायचे; काळ मागे न्यायचा नाही. डिजिटल क्रांती थांबवता येणार नाही. तशी गरजही नाही. बदलत्या जगाशी आपण जुळवून घ्यायचे. आणि त्या जगाशी जुळवून घेताना मुलांचे बालपण फुलवत राहायचे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

डिजिटल जग आणि मूल Read Post »

A young child expressing strong emotions during a studio portrait shoot.

मुलाचं वर्तन की मदतीची हाक?

हा असा का वागतोय आजकाल? काहीतरी बिघडलंय बरं का! कालपर्यंत व्यवस्थित असलेला मुलगा आजकाल फार चिडचिड करतोय.अभ्यासात लक्ष लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतो. उलट उत्तर देतो. शाळेत जायला नको म्हणतो. कधी एकटाच बसून राहतो. तर कधी विनाकारण रडतो. आई म्हणते —“हा असा का वागतोय आजकाल? काहीतरी बिघडलंय बरं का!” आणि खरंच, हा प्रश्न विचारायला हवा. पण प्रश्न फक्त —“याचे वर्तन कसे सुधारायचे?”एवढाच नसावा. त्याआधी विचारायला हवे —“हा असा का वागतोय?” मुलांना आपल्या मनात काय चाललंय हे नेहमी शब्दांत सांगता येत नाही. “मला भीती वाटतेय.”“मला काहीतरी त्रास होतोय.”“मला हे जमत नाहीये.”“माझ्यावर खूप दबाव आहे.”“मला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतंय.” हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नसतील. पण त्यांचे वर्तन बोलत असते. चिडचिड, राग, हट्टीपणा, आक्रमकपणा, अस्वस्थपणा, अभ्यासात लक्ष न लागणे, शाळेत जायला नको म्हणणे, प्रगती घसरणे, एकटे राहणे किंवा वारंवार काहीतरी दुखत असल्याच्या तक्रारी — यामागे कधी कधी काहीतरी कारण असते. ते कारण मुलामध्येही असू शकते. वाढ-विकासातील अडचण, शिकण्याची समस्या, लक्ष केंद्रित करण्यातील अडचण, संवाद साधण्याची समस्या, भावनिक अस्वस्थता किंवा एखादा आजार. पण कारण मुलाच्या आजूबाजूलाही असू शकते. घरातील ताणतणाव, आई-वडिलांमधील मतभेद, मुलाकडून अवाजवी अपेक्षा, शाळेतील अडचणी, अभ्यासाचा ताण, शिक्षकांची भीती, मित्रांकडून होणारी चेष्टा किंवा छळ, एकटेपणा, असुरक्षितता किंवा आयुष्यात अचानक झालेला एखादा बदल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी — समस्या मुलामध्ये दिसते; पण ती मुलामध्येच सुरू झालेली असेल असे नाही. मूल एकटेपणात वाढत नाही. ते कुटुंबात वाढते. शाळेत शिकते. मित्रांमध्ये वावरते. समाजात राहते. डिजिटल जगाशी जोडलेले असते. या सगळ्यांच्या भावनिक आणि भौतिक वातावरणात त्याचे बालपण घडत असते. हीच त्याची बालपणाची परिसंस्था. या परिसंस्थेतील एका ठिकाणी काही बिघडले, तर त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी मुलाच्या वर्तनातून दिसू शकतो. घरातील अस्वस्थता शाळेतील चिडचिडीतून दिसू शकते. शाळेतील त्रास घरातील रागातून बाहेर पडू शकतो. मित्रांकडून नाकारले गेलेले मूल एकटे राहू लागते. अभ्यास जमत नसलेले मूल अभ्यासालाच नकार देऊ शकते. म्हणून मुलाला लगेच हट्टी, आळशी, खोडकर, उद्धट किंवा त्रासदायक ठरवू नका. मुलांना शिस्त हवी. योग्य-अयोग्य समजायला हवे. वर्तनाला मर्यादाही हव्यात. पण वर्तन सुधारण्याआधी ते समजून घ्यायला हवे. कारण कधी कधी मुलाचे बदललेले वर्तन हीच त्याची भाषा असते. ते कदाचित आपल्याला सांगत असते — “मला काहीतरी होतंय.काय होतंय ते मलाही नीट सांगता येत नाही.पण मला समजून घ्या.” म्हणून पुन्हा एकदा तोच प्रश्न — “हा असा का वागतोय आजकाल? काहीतरी बिघडलंय बरं का!” होय. काय बिघडलंय ते शोधूया.फक्त मुलाला सुधारायला लागू नका. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मुलाचं वर्तन की मदतीची हाक? Read Post »

grandparents and child

आजी-आजोबा : बालपण फुलवणारे संवर्धक

नमस्कार! आपण सगळे आपल्या नातवंडांवर मनापासून प्रेम करतो. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो. त्यांच्या हसण्यात आपले बालपण पुन्हा दिसते आणि त्यांच्या भविष्यात आपली स्वप्नेही दिसतात. नातवंडांना चांगले शिक्षण मिळावे, उत्तम आरोग्य लाभावे, चांगले संस्कार व्हावेत आणि जीवनात त्यांनी यशस्वी व्हावे—ही प्रत्येक आजी-आजोबांची मनापासूनची इच्छा असते. पण मुलांच्या वाढीकडे आपण थोडे व्यापकपणे पाहिले, तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. मुलांना फक्त आई-वडील वाढवत नाहीत. त्याच्या भोवतालचे कुटुंब, शाळा, मित्र, आरोग्य व्यवस्था, परिसर, तंत्रज्ञान, निसर्ग, समाज आणि भावनिक वातावरण—हे सर्व मिळून त्या मुलाचे बालपण घडवत असतात. यालाच आपण ‘बालपणाची परिसंस्था’ म्हणू शकतो. बालपणाची परिसंस्था म्हणजे काय? आपण एखादे बीज जमिनीत पेरतो. त्या छोट्याशा बीजात एका मोठ्या वृक्षाची क्षमता दडलेली असते. पण केवळ बीजामध्ये क्षमता आहे म्हणून वृक्ष आपोआप सुंदर आणि निरोगी वाढेलच असे नाही. त्याला योग्य माती लागते. पाणी लागते. सूर्यप्रकाश लागतो. हवा लागते. संरक्षण लागते. आणि या सगळ्यांचे योग्य संतुलन लागते. या सर्वांचा मिळून त्या बीजासाठी एक परिसंस्था तयार होते. मूलही काहीसे असेच असते. प्रत्येक मूल काही क्षमता, काही गुण, काही वैशिष्ट्ये आणि काही मर्यादा घेऊन जन्माला येते. पण त्या क्षमतेचे प्रत्यक्षात फुलणे हे केवळ मुलाच्या जन्मजात गुणांवर अवलंबून नसते. मुलाभोवतीचे वातावरण त्याच्या विकासाला दिशा देते. म्हणूनच बालविकासाकडे केवळ मुलाच्या दृष्टीने न पाहता, त्याच्या संपूर्ण परिसंस्थेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. बालपणाची परिसंस्था कशाने बनते? मुलाच्या बालपणाभोवती अनेक घटक कार्यरत असतात. कुटुंब मुलाला प्रेम, सुरक्षितता, विश्वास आणि संस्कार देते. शाळा केवळ पुस्तकी शिक्षण देत नाही; ती शिस्त, आत्मविश्वास, सहकार्य आणि सामाजिक जीवनाची सुरुवात घडवते. आरोग्य सेवा मुलाची वाढ, विकास, पोषण, लसीकरण आणि आजारांचे प्रतिबंध यांची काळजी घेते. मित्रपरिवार मुलाला मैत्री, सहकार्य, वाटून घेणे, मतभेद हाताळणे आणि समूहात राहणे शिकवतो. आजच्या काळात डिजिटल परिसंस्थेचे महत्त्वही वाढले आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही मुलांसाठी नवीन साधने आहेत. त्यांच्यात संधी आहेत; पण त्याचबरोबर नवीन आव्हानेही आहेत. भौतिक परिसंस्था—खेळण्यासाठी सुरक्षित जागा, निसर्ग, व्यायाम, मुक्त हालचाल आणि विविध अनुभव—मुलाच्या शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक आहे. भावनिक परिसंस्था म्हणजे प्रेम, स्वीकार, कौतुक, संवाद आणि मानसिक सुरक्षितता. मुलाला ‘मी कोण आहे?’ आणि ‘मी महत्त्वाचा आहे’ याची जाणीव याच वातावरणातून मिळते. आणि त्यापलीकडे आहे समाज—संस्कृती, परंपरा, मूल्ये, नागरिकत्व, जबाबदारी आणि माणुसकी यांची ओळख मुलाला समाजातून मिळते. हे सर्व घटक वेगवेगळे असले तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र नाहीत. ते एकमेकांवर परिणाम करतात आणि मुलाच्या विकासावर एकत्रित परिणाम घडवतात. म्हणूनच एखाद्या मुलाबद्दल समस्या निर्माण झाली की आपण फक्त एकच प्रश्न विचारू नये— “मुलाचं काय बिघडलं आहे?” कधी कधी त्याऐवजी दुसरा प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे असते— “मुलाभोवती काय घडत आहे?” मग आजी-आजोबांची भूमिका काय? आजी-आजोबांनी आई-वडिलांची जागा घ्यायची नाही. त्यांनी शिक्षक व्हायचे नाही. त्यांनी डॉक्टर व्हायचे नाही. पण आजी-आजोबांकडे एक अशी संपत्ती असते, जी अनेक संस्थांकडे नसते. वेळ. संयम. अनुभव. निरपेक्ष प्रेम. कुटुंबाचा इतिहास. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—नात्यांना जोडून ठेवण्याची ताकद. आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळ कमी असू शकतो. त्यांच्या जबाबदाऱ्या अनेक असतात. अशा वेळी आजी-आजोबांचा निवांत सहवास मुलासाठी अत्यंत मौल्यवान ठरू शकतो. आजी-आजोबा मुलाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतातच असे नाही; पण ते त्याचा प्रश्न शांतपणे ऐकतात. ते प्रत्येक गोष्ट शिकवत नाहीत; पण गोष्टी सांगतात. ते प्रत्येक समस्येचे निराकरण करत नाहीत; पण मुलाला आधार देतात. आणि अनेकदा हेच पुरेसे असते. आजी-आजोबा : परिसंस्थेचे संवर्धक म्हणून मला वाटते— आजी-आजोबा हे केवळ कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य नाहीत; ते बालपणाच्या परिसंस्थेचे संवर्धक आहेत. संवर्धक म्हणजे केवळ जपणारा नव्हे. संवर्धक म्हणजे— वाढ घडवणारा, जोडून ठेवणारा, समृद्ध करणारा, संधी निर्माण करणारा, मूल्ये जतन करणारा, आणि प्रेमाचे वातावरण तयार करणारा. आजी-आजोबा हे काम अनेक साध्या गोष्टींमधून करू शकतात. नातवंडांसोबत वेळ घालवून. त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून. गोष्टी सांगून. वाचनाची आवड निर्माण करून. त्यांच्यासोबत खेळून. मोबाईलपेक्षा संवादाला प्राधान्य देऊन. प्रयत्नांचे कौतुक करून. तुलना टाळून. निसर्गाशी मैत्री करून. आरोग्यदायी सवयी रुजवून. पालकांना आधार देऊन. शाळेशी सकारात्मक नाते ठेवून. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे— “तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस.” ही भावना मुलाला देऊन. मुलांना काय आठवते? मुलं मोठी होतात. त्यांना दिलेली अनेक खेळणी ते विसरतात. कपडे विसरतात. भेटवस्तू विसरतात. पण ज्यांनी त्यांच्यासाठी वेळ दिला, ज्यांनी त्यांच्या गोष्टी ऐकल्या, ज्यांनी त्यांना गोष्टी सांगितल्या, ज्यांनी त्यांचा हात धरला आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला—त्या व्यक्तींची आठवण त्यांच्या मनात खोलवर राहते. बालपणातील अशा आठवणी केवळ आठवणी नसतात. त्या मुलाच्या भावनिक विकासाचा एक भाग असतात. आजी-आजोबांसाठी एक छोटासा विचार म्हणून आजी-आजोबांनी स्वतःकडे केवळ “आजी” किंवा “आजोबा” म्हणून पाहण्यापेक्षा स्वतःला बालपणाच्या या मोठ्या परिसंस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहावे. स्वतःला एक प्रश्न विचारावा— “मी माझ्या नातवंडांच्या बालपणाच्या परिसंस्थेचा संवर्धक आहे का?” जर या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर आपण केवळ एका मुलाच्या बालपणाला समृद्ध करत नाही. आपण पुढच्या पिढीच्या विचारांना, मूल्यांना आणि नात्यांना आकार देत असतो. एकूण काय? आई-वडील मुलाला वाढवतात. शिक्षक त्याच्या शिक्षणाला दिशा देतात. डॉक्टर त्याचे आरोग्य जपतात. थेरपिस्ट आणि इतर व्यावसायिक आवश्यक त्या विकासात्मक गरजांना आधार देतात. पण या सगळ्यांना जोडणारी एक मानवी आणि भावनिक शक्ती असते—कुटुंब. आणि त्या कुटुंबाच्या अनुभवाची, प्रेमाची आणि सातत्याची मुळे अनेकदा आजी-आजोबांमध्ये असतात. म्हणूनच— मुलाला फक्त आई-वडील वाढवत नाहीत. त्याच्या भोवतालची संपूर्ण परिसंस्था त्याला घडवत असते. आणि त्या परिसंस्थेची मजबूत मुळे आणि प्रेमळ संवर्धक होण्याची संधी आजी-आजोबांकडे असते. बालपण फुलवण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी… थोडा वेळ, एक गोष्ट, एक प्रेमळ स्पर्श, एक शांतपणे ऐकणारे मन, आणि एक वाक्य— “मी आहे ना!” एवढेच एका मुलाच्या बालपणाला सुरक्षित, समृद्ध आणि सुंदर बनवण्यासाठी पुरेसे असते. कनक मोकाशीचा आबा – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आजी-आजोबा : बालपण फुलवणारे संवर्धक Read Post »

Boy in red jacket stacking colorful blocks in a creative classroom setting.

Development in Childhood: Milestones, Brain Maturation, and the Importance of Early Recognition

Understanding How a Child Learns to Move, Think, Communicate, and Connect Every parent eagerly waits for the first smile, the first step, or the first word. These moments are celebrated as milestones, but to a pediatrician, they represent something far more profound. They are visible evidence that the child’s brain is developing, organizing, and acquiring new functions. Unlike growth, which can be measured in centimetres and kilograms, development cannot be measured with a weighing scale or a measuring tape. It reflects the gradual maturation of the nervous system and the child’s ability to interact with the surrounding world. Every new skill a child acquires is the result of millions of neural connections being formed, strengthened, and refined. Development, therefore, is not merely the learning of new abilities—it is the unfolding of the brain’s remarkable potential. Development Follows a Predictable Sequence Parents often compare their child’s development with that of siblings, cousins, or neighbours. While the timing of milestones may vary slightly, the sequence of development remains remarkably constant. A child first gains head control before sitting, sits before standing, and stands before walking. Similarly, babbling usually precedes meaningful words, and simple words gradually evolve into sentences. Development progresses from simple to complex, general to specific, and dependence to independence. This predictable progression allows pediatricians to identify when development is following its expected course and when it may be deviating. Understanding this sequence is far more important than memorising the exact age at which a milestone should occur. Development is More Than Walking and Talking Child development encompasses several interconnected domains, each reflecting a different aspect of brain maturation. Gross motor development enables a child to control posture, balance, and movement. Rolling over, sitting, crawling, walking, and running are all milestones within this domain. Fine motor development reflects the growing coordination between the brain, eyes, and hands. Holding objects, transferring toys from one hand to another, picking up tiny objects, and eventually writing are examples of these skills. Language development begins long before the first spoken word. A baby’s cries, cooing, babbling, gestures, understanding of familiar voices, and later speech all represent progressive stages of communication. Social and adaptive development reflects how a child relates to people and adapts to the environment. A social smile, eye contact, waving goodbye, pretend play, and increasing independence in daily activities all belong to this domain. Although described separately, these domains develop together. A delay in one area may influence progress in another, reminding us that child development is an integrated process rather than a collection of isolated skills. Milestones Are Guides, Not Deadlines Developmental milestones should never become a source of anxiety for families. They are reference points that help us understand whether the child’s brain is developing appropriately. Children are not machines programmed to achieve every milestone on a particular day. Some may walk a little earlier, others may speak slightly later, while remaining entirely healthy. The important question is not “Has my child achieved this milestone today?” but rather “Is my child continuing to acquire new skills in the expected sequence?” A child who continues to learn and progress usually reassures the pediatrician far more than one who appears to have stopped progressing altogether. When Development Raises Concern Pediatric practice teaches us that delay is important, but regression is even more significant. A child who acquires skills more slowly than expected deserves careful observation and evaluation. However, a child who loses previously acquired abilities—such as stopping speech, losing eye contact, or no longer walking independently—requires urgent assessment. Developmental concerns should never be dismissed with statements such as “Boys speak late,” or “Every child develops differently.” While individual variation certainly exists, persistent delays or regression may indicate underlying neurological, genetic, metabolic, hearing, or developmental disorders. Recognising these concerns early allows intervention during the period when the developing brain is most responsive. Developmental Surveillance: An Ongoing Responsibility Development should not be assessed only when parents become worried. Every interaction with a child is an opportunity to observe development. Pediatric consultations, immunization visits, preschool observations, Anganwadi assessments, and classroom interactions all contribute valuable information. Developmental surveillance is therefore a continuous process rather than a single screening test. Parents, grandparents, teachers, Anganwadi workers, therapists, and healthcare professionals each observe the child in different environments. Together, they create a more complete understanding of the child’s strengths and emerging concerns. Early Intervention Changes the Child’s Future One of the greatest advances in developmental pediatrics has been the recognition that early intervention can significantly alter long-term outcomes. The young brain possesses remarkable plasticity. During the first few years of life, it responds exceptionally well to appropriate stimulation, therapy, and supportive caregiving. Physiotherapy, occupational therapy, speech and language therapy, special education, behavioural intervention, and structured parent training are not simply treatments. They are opportunities to help the developing brain build stronger pathways during its most receptive period. Early intervention does not merely improve milestones; it enhances participation, independence, learning, and quality of life. Autism and ADHD: Understanding Developmental Differences Among the various developmental conditions encountered in childhood, Autism Spectrum Disorder (ASD) and Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) are increasingly recognised. Autism primarily affects social communication, interaction, and behaviour. Poor eye contact, limited response to name, delayed communication, repetitive behaviours, and restricted interests often represent early indicators. ADHD, in contrast, primarily affects attention, impulse control, and activity regulation. Children may appear excessively restless, impulsive, or easily distracted despite having normal intelligence. Although these conditions differ, they share one important principle: early recognition leads to earlier support, allowing children to reach their fullest potential. A diagnosis should never be viewed as a label. It is the beginning of understanding the child’s unique developmental needs. The Child Develops Within an Ecosystem Development does not occur in isolation. A nurturing family, responsive caregivers, stimulating play, adequate nutrition, quality healthcare, inclusive education, and a supportive community together shape the child’s developmental journey. Every conversation, every story read aloud, every opportunity to explore, every encouraging word, and every meaningful interaction contributes to the architecture of the developing brain. Development is therefore not solely the responsibility of the pediatrician or therapist. It is a shared responsibility of the

Development in Childhood: Milestones, Brain Maturation, and the Importance of Early Recognition Read Post »

Smiling child playing and exploring with wooden toys in a bright room, fostering creativity.

Growth in Childhood: More Than Height and Weight

Growth in Childhood: More Than Height and Weight Understanding the Child’s Biological Journey A newborn weighing 2.8 kilograms and another weighing 3.4 kilograms may both be perfectly healthy. Similarly, one five-year-old may be shorter than his classmates yet be growing normally, while another, apparently “healthy-looking” child may already be showing the earliest signs of an underlying disease. The difference lies not merely in how much a child grows, but how the child grows over time. Growth is one of the most sensitive indicators of a child’s health. Long before many diseases become clinically evident, they often leave their first footprints on the child’s growth pattern. For this reason, pediatricians regard growth as the fifth vital sign of childhood, alongside temperature, pulse, respiration, and blood pressure. Growth is not simply an increase in height or weight. It is the visible outcome of a complex biological process influenced by genetics, nutrition, hormonal balance, emotional well-being, recurrent illnesses, environmental conditions, and social circumstances. Every child carries a unique genetic blueprint, but whether that potential is achieved depends upon the environment in which the child is conceived, born, nourished, protected, and nurtured. Growth is a Process, Not an Event One of the common misconceptions among families is to judge growth from a single measurement. A child may gain one kilogram in a month or remain at the same weight for several weeks, leading to unnecessary anxiety or false reassurance. Pediatricians rarely interpret a single reading in isolation. What matters is the direction of growth, not merely the measurement itself. Imagine watching a movie by looking at only one frame. It tells you very little about the story. Similarly, one measurement tells us where the child is today, but serial measurements reveal the child’s biological journey. This journey is represented by the growth curve. The Growth Curve: Every Child Writes a Different Story A growth chart is far more than a graph. It is a visual record of a child’s health over months and years. Every plotted point represents a moment in the child’s life. When these points are joined together, they create a growth curve. A healthy child usually follows a smooth and predictable curve, even if the child belongs to a lower or higher percentile. Parents often become concerned because their child is “only on the 25th percentile” or compare their child with a neighbour’s child on the 75th percentile. Such comparisons are misleading. A child growing consistently along the 25th percentile may be perfectly healthy. On the other hand, a child who suddenly falls from the 75th percentile to the 25th percentile deserves careful evaluation, even though the final percentile still appears to be within the normal range. The pattern of growth is often more important than the position on the chart. Growth Velocity: The Dynamic Indicator If the growth curve tells us where the child is going, growth velocity tells us how fast the child is travelling. Growth velocity refers to the rate at which a child gains height or weight over a defined period. Unlike a single measurement, it reflects the child’s ongoing biological activity. Many endocrine disorders, chronic illnesses, nutritional deficiencies, and systemic diseases first affect growth velocity before obvious clinical symptoms develop. A child may still appear to have a “normal height,” yet if the annual increase in height has slowed significantly, it may be the earliest warning of an underlying disorder. For this reason, pediatricians insist on regular measurements rather than occasional observations. Anthropometry: Measuring the Child Scientifically Growth assessment is based on carefully standardised measurements, collectively known as anthropometry. Each measurement answers a different clinical question. No single measurement provides the complete picture. Together, they offer a comprehensive understanding of the child’s physical growth. Understanding Red Flags In medicine, a red flag is not a diagnosis. It is a warning signal that tells us a child deserves closer attention. A red flag does not necessarily mean that a serious disease is present. Equally, ignoring a red flag may delay the diagnosis of an important medical condition. Examples include: These changes may indicate nutritional deficiencies, chronic infections, endocrine disorders, gastrointestinal diseases, congenital conditions, or psychosocial problems. The purpose of recognising red flags is not to create fear, but to encourage timely evaluation. Growth Reflects the Child’s Entire Ecosystem A child’s growth is never determined by food alone. It reflects the combined influence of the family, healthcare providers, teachers, Anganwadi workers, nutritionists, therapists, schools, and the wider community. Good nutrition without emotional security cannot produce optimal growth. Likewise, appropriate healthcare without adequate nutrition cannot achieve the child’s full biological potential. Growth therefore represents the health of the entire child ecosystem, not merely the child. A Final Thought Every child carries within them a remarkable biological potential. Growth monitoring is not about comparing one child with another; it is about ensuring that each child has the opportunity to achieve that potential. When growth is measured carefully, interpreted scientifically, and monitored regularly, it becomes much more than a number on a weighing scale or a mark on a wall. It becomes one of the earliest conversations between the child’s body and the pediatrician—a conversation that often begins long before illness speaks through symptoms. Growth should never be viewed merely as an increase in height or weight. It is the living record of a child’s health, nutrition, development, and future. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Growth in Childhood: More Than Height and Weight Read Post »

Autism-Sensory-Overload

ऑटिझम आणि सेन्सरी ओव्हरलोड

ऑटिझम आणि सेन्सरी ओव्हरलोड ऑटिझम असलेल्या अनेक मुलांना आपल्या आजूबाजूचे जग इतरांपेक्षा खूप जास्त तीव्रतेने जाणवते. आपल्याला साधारण वाटणारा आवाज, प्रकाश, गर्दी, स्पर्श किंवा गोंधळ त्यांच्यासाठी असह्य ठरू शकतो. मोठ्या स्पीकरजवळ, प्रखर दिव्यांमध्ये, गर्दीत, अंगाला टोचणारे कपडे घालून सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करा… सेन्सरी ओव्हरलोड साधारण असा अनुभव असू शकतो. अशा वेळी मूल: मूल जणू सांगत असते—“माझ्या मेंदूला थोडी विश्रांती हवी आहे.”अशा वेळी शिक्षा उपयोगाची नसते. उपाय म्हणजे— मेंदू पुन्हा शांत झाला की मूल पुन्हा शिकू शकते, बोलू शकते आणि सहकार्यही करू शकते. सेन्सरी ओव्हरलोड हा शिस्तीचा प्रश्न नाही;तो मज्जासंस्थेवर आलेल्या ताणाचा प्रश्न आहे.” AUTISM AND SENSORY OVERLOAD. Sensory overload is one of the commonest hidden challenges in Autism Spectrum Disorder (ASD). The autistic brain often processes sensory information differently rather than simply more or less intensely. Ordinary environmental stimuli—such as noise, bright lights, crowds, certain textures, smells, touch, or unexpected changes—may exceed the individual’s sensory processing capacity. When this happens, the child is not being defiant or manipulative. The nervous system has become overwhelmed. Clinical manifestations may include: The first intervention is not behaviour correction—it is reducing sensory load. Management includes: “A sensory overload is not a discipline problem. It is a nervous system problem.” – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

ऑटिझम आणि सेन्सरी ओव्हरलोड Read Post »

personal hygiene puberty

किशोरवयातील स्वच्छता : A Sign of Maturity

किशोरवयातील वैयक्तिक स्वच्छता : मोठं होण्याची एक खूण [ PERSONAL HYGIENE IN ADOLESCENCE: A SIGN OF GROWING UP] किशोरवयात शरीरात अनेक बदल घडू लागतात. उंची व वजन वाढते, हार्मोन्स सक्रिय होतात, घामाच्या ग्रंथी अधिक कार्य करू लागतात आणि शरीराला विशिष्ट वास येऊ लागतो. शरीराला वास येणे हा आजार नाही. तो मोठं होण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे. मात्र वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास हा वास इतरांना अप्रिय वाटू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नकारात्मक छाप निर्माण करू शकतो. घामाला स्वतःला फारसा वास नसतो. त्वचेवरील जंतू, मृत त्वचापेशी आणि शरीरावरील केस यांच्या संपर्कात घाम आल्यावर वास निर्माण होतो. काखा, जांघेचा भाग, पाय, टाळू आणि त्वचेच्या घड्या याठिकाणी हा वास अधिक जाणवतो. किशोरवयात शरीराचा वास वाढण्याची काही कारणे: यावर उपाय अगदी सोपे आहेत: लक्षात ठेवा, किशोरवय म्हणजे फक्त उंची वाढणे किंवा आवाज बदलणे नाही. स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवातही याच वयात होते. लोक आपल्या दिसण्याकडे, बोलण्याकडे, वागण्याकडे लक्ष देतात; पण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष देतात. स्वच्छता आपल्याला फक्त नीटनेटके बनवत नाही, तर इतरांचा विचार करणारी व्यक्ती बनवते. मोठं होणं म्हणजे फक्त शरीराने वाढणं नाही; तर स्वतःबद्दल जागरूक होणं, इतरांचा विचार करणं आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणं होय. किशोरावस्था तुमच्या शरीरात बदल आपोआप घडवते;पण त्या शरीराची जबाबदारी स्वतः स्वीकारता,तेव्हा खरी परिपक्वता सुरू होते. PERSONAL HYGIENE IN ADOLESCENCE: A SIGN OF GROWING UP As children enter adolescence, many physical changes begin to occur. The body grows rapidly, hormones become active, and sweat glands start working more vigorously. One common consequence is increased body odour. Body odour is not a disease. It is a normal part of growing up. However, if personal hygiene is neglected, it can become unpleasant and affect how others perceive us. Sweat itself is almost odourless. The smell develops when sweat mixes with bacteria naturally present on the skin, particularly in areas such as the armpits, groin, feet, scalp, and skin folds. Dead skin cells, body hair, and poor hygiene can further contribute to the problem. Several factors make body odour more noticeable during adolescence: Good personal hygiene is simple: As you grow from a child into a young man or woman, personal hygiene becomes your own responsibility. Parents can remind you, but ultimately self-care must come from within. People notice our appearance, our behaviour, our speech—and yes, even our personal hygiene. Cleanliness does not make a person great, but it makes a person pleasant, presentable, and respectful of those around them. Growing up is not only about becoming taller and stronger. It is also about becoming more aware of yourself, more considerate of others, and more responsible for your own well-being. PUBERTY CHANGES YOUR BODY AUTOMATICALLY.MATURITY BEGINS WHEN YOU LEARN TO TAKE CARE OF THAT BODY YOURSELF. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

किशोरवयातील स्वच्छता : A Sign of Maturity Read Post »

Mother and daughter bonding through yoga outdoors in a serene grassy field.

सशक्त आई, सशक्त बालक

माझ्या प्रिय आयांनो, फक्त मुलांना मोठं करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. मुलांना वाढवणं हा तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण भाग आहे, हे नक्की. पण म्हणून तुमचं संपूर्ण अस्तित्वच मातृत्वाच्या कर्तव्यावर ओवाळून टाकण्याची गरज नाही. ताई, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका बरं! आधुनिक विज्ञान आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मुलांचा विकास केवळ अन्न, औषधे, लसीकरण किंवा शिक्षणावर अवलंबून नसतो. मुलांच्या विकासावर त्यांच्या caregiver च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा देखील खोल परिणाम होत असतो. चांगली आई होण्यासाठी, सुरक्षित मातृत्वासाठी, तिचे वय 20 ते 35 हवे, वजन 45 किलो हवे, उंची 145 सेमी (4 फूट 9 इंच) हवी. किडकिडीत आईची मुलं किडकिडीत होतात. दणदणीत आईची मुलं दणदणीत होतात. घाबरट आईची मुलं भितृट होतात. खंबीर आईची मुलं आत्मविश्वासू होतात. एका वेळी एक मूल बोटाला, एक मूल कडेला आणि एक मूल पोटात असलेल्या आईचे हालच असतात. चार जिवांवर अन्याय. दोन मुलात कमीत कमी तीन वर्षाचे अंतर हवे. शिक्षणामुळे आयांना आरोग्य, पोषण, लसीकरण आणि बालविकास याबाबत अधिक माहिती मिळते. त्यामुळे त्या मुलांची वैज्ञानिक पद्धतीने काळजी घेऊ शकतात. त्या प्रथा आणि अंधश्रद्धांच्या आहारी जात नाहीत. सतत थकलेली, झोपेअभावी त्रस्त, तणावाखाली असलेली किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणारी आई कितीही प्रेमळ असली तरी तिच्यावरचा भार वाढत जातो. उलट सशक्त, आत्मविश्वासू, आनंदी आईच आपल्या मुलाला सुरक्षित, स्थिर आणि पोषक वातावरण देऊ शकते. म्हणूनच आईची काळजी घेणे हा बालसंगोपनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित आरोग्य तपासणी, थोडा विरंगुळा, स्वतःसाठी थोडा वेळ, भावनिक आधार आणि सन्मान — या गोष्टी आईच्या गरजा नाहीत, तर मुलांच्या विकासासाठीची गुंतवणूक आहेत. म्हणूनच आता कुटुंब, आजी-आजोबा, वडील, समाज आणि मुलांच्या विश्वातील सर्व मोठ्या माणसांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी: मुलं सशक्त हवी असतील तर आया सशक्त हव्या ना! आईला सशक्त करणे हे सुद्धा एक प्रकारचे बालसंगोपनच आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

सशक्त आई, सशक्त बालक Read Post »

Vitamin A

अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी

तोंडाने अ जीवनसत्वाचा डोस मुलांना आजारांपासून संरक्षण देतो आणि निरोगी ठेवतो.भारतात सरकारी आरोग्य सेवा सहा महिन्यांनंतर पाच वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना दर सहा महिन्यांनी अ जीवनसत्वाचा डोस मोफत देते.ही अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टीची सार्वजनिक आरोग्य सेवा आहे.पण अनेक मुले खासगी डॉक्टरांकडून लसी घेतात. अशा मुलांना अ जीवनसत्वाचा डोस मिळत नाही.खरं तर:• खासगी बालरोग तज्ञांनी सरकारी यंत्रणेकडून अ जीवनसत्वाचा डोस मिळवून मुलांना द्यायला हरकत नाही.• किंवा बाजारात मिळणाऱ्या अ जीवनसत्वाचा डोस:o BLUE Capsule — 100000 IUo RED Capsule — 200000 IUवापरता येऊ शकतात.मुलांचे कुटुंब, आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांनी अ जीवनसत्वाचा डोसचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.ही फक्त “व्हिटॅमिन देणे” इतकी साधी गोष्ट नाही.ही एक preventive health practice आहे.ती समाजात सवय आणि संस्कार बनायला हवी. अ जीवनसत्व म्हणजे “साधं व्हिटॅमिन” नाही. आहे मायक्रोन्यूट्रिअंट, पण बालपणात त्याचे काम फार मोठे आहे.मूल बाहेरून निरोगी दिसू शकते, पण शरीरात शांतपणे अ जीवनसत्वाची कमतरता वाढत असू शकते. अ जीवनसत्व कशासाठी आवश्यक आहे?• दृष्टीसाठी• रातांधळेपणा टाळण्यासाठी• रोगप्रतिकारशक्तीसाठी• वाढीसाठी• त्वचा व शरीराच्या आतील आवरणांच्या आरोग्यासाठी• संसर्गातून बरे होण्यासाठीविशेषतः महत्त्वाचे:• लहान बाळांसाठी• वेगाने वाढणाऱ्या मुलांसाठी• कुपोषित मुलांसाठी• वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांसाठी अ जीवनसत्व कुठून मिळते.प्राणिजन्य पदार्थ:• यकृत (liver)• दूध• चीज• इतर प्राणिजन्य अन्नवनस्पतीजन्य पदार्थ:• गाजर• भोपळा• रताळे• शेवग्याची पाने• कढीपत्ता• हिरव्या पालेभाज्या• पिवळी-केशरी फळे एक महत्त्वाची गोष्ट:अ जीवनसत्व शोषण्यासाठी अन्नात थोडे fat आवश्यक असते.म्हणून:• फक्त गाजर खाऊन उपयोग नाही• भाजीत थोडे तेल/तूप असणे उपयोगी ठरतेआपला पारंपरिक भारतीय आहार यासाठी उत्तम आहे:• डाळ• भाजी• थोडे तेल/तूप• दूध• पोळी/भातसाधा. व्यावहारिक. वैज्ञानिक. काही मुलांना Vitamin A deficiency चा धोका जास्त असतो:• अकाली जन्मलेली बाळे• कमी वजनाची बाळे• कुपोषित मुले Protein malnutrition आणि अ जीवनसत्व यांचा एक लपलेला संबंध आहे.अ जीवनसत्व रक्तात एकटे फिरत नाही.तिला “Retinol Binding Protein (RBP)” नावाच्या protein ची मदत लागते.शरीरात protein कमी असेल तर:• RBP कमी बनते• अ जीवनसत्व नीट वाहून नेता येत नाही• कमतरता निर्माण होतेम्हणजे:मूल अ जीवनसत्व खात असते,पण शरीराला ते योग्य प्रकारे वापरता येत नाही.Nutrition हे एक टीमवर्क आहे — एकट्या nutrient चे काम नाही. संसर्गाच्या, इन्फेक्शनच्या वेळी अ जीवनसत्व तात्पुरते कमी दिसू शकते.जसे:• गोवर• कांजिण्या• गालगुंड• डांग्या खोकला• Hand Foot Mouth Diseaseअशा वेळी शरीरात inflammation वाढते आणि अ जीवनसत्व पातळी खाली जाते. WHO च्या शिफारसी:६ ते ११ महिने:• 100000 IU — BLUE Capsule — एकदा१ वर्ष ते ५ वर्ष:• 200000 IU — RED Capsule — दर ६ महिन्यांनीVitamin A यकृतात साठवले जाते आणि शरीर ते हळूहळू वापरते. Vitamin A supplementation मुळे:• गंभीर आजार कमी होऊ शकतात• रोगप्रतिकारशक्ती सुधारते• बालमृत्यू कमी होण्यास मदत होतेएक छोटीशी capsule,मुलाच्या भविष्यासाठी शांतपणे संरक्षण देत असते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी Read Post »

झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत?

बाळाला पूर्ण आडवे झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत? लहान बाळ मोठ्या माणसासारखे सुरक्षितपणे पिऊ शकत नाही. बाळ जेव्हा दूध, पाणी किंवा औषध गिळते,तेव्हा शरीराला एका क्षणात अनेक गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात. म्हणजेचशोषणे + गिळणे + श्वास घेणेयांचा अचूक समन्वय आवश्यक असतो. बाळ पूर्ण सपाट झोपलेले असेल,तर हा समन्वय अधिक कठीण होऊ शकतो. त्यामुळे द्रव: म्हणून:लहान बाळाला पूर्ण आडवे झोपवूनपाणी, दूध किंवा औषधे देणे टाळावे. सुरक्षित पद्धत: लक्षात ठेवा:बाळाला पाजणे म्हणजे फक्त द्रव पोटात ओतणे नाही. ती शरीराची अत्यंत सूक्ष्म आणि संरक्षक जैविक प्रक्रिया आहे. योग्य स्थिती, योग्य गती आणि योग्य काळजी —यामुळेच बाळ सुरक्षितपणे पिते. WHY INFANTS SHOULD NOT BE GIVEN WATER OR MEDICINES IN A FULLY HORIZONTAL POSITION An infant cannot safely drink like an older child or adult. While swallowing,the baby’s body has to do many things together within a fraction of a second. This requires proper coordination of:sucking + swallowing + breathing. If a baby is lying completely flat,this coordination may become more difficult. Liquid may: Therefore:Avoid giving water, milk, or medicines to infants in a fully horizontal position. Safer method: Remember:Feeding is not “pouring liquid into the stomach.”It is a highly coordinated protective reflex. A baby drinks safely only when the body gets time and position to protect the airway. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत? Read Post »

गुड बॉय सूर्य आणि बॅड बॉय सूर्य.

ऊन तापत चाललय. उकाडा वाढत चाललाय. दिवस मोठा मोठा होऊ लागलाय. बाहेर खेळायला, धमाल मस्ती करायला जास्त वेळ मिळू लागलाय. पण जरा जपून. ऊन बाधण्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. सूर्य बॅड बॉय कि गुड बॉय ? तसा सूर्य हा गुड बॉयच आहे. सूर्य जरी तोंट, आग ओकत असला तरी तो फार छान छान कूल गोष्टी करत असतो. तो आपल्याला ऊब देतो. तो झाडांना ,फुलांना वाढवतो. तो आपल्या कातडीखाली ‘ड’ जीवनसत्व निर्माण करतो. ड जीवनसत्वाच्या मदतीने अन्नातले कॅल्शियम आतडयातून रक्तात शोषलं जातं. आणि हाडं बळकट होतात. म्हणजे तसा सूर्य हा गुड बॉयच आहे. पण आपण काळजी घेतली नाही तर तो बॅड बॉय होऊ शकतो. सूर्यकिरणांमध्ये काही अदृश्य डोळयांना न दिसणारे अतिनील अल्ट्राव्हायोलेट (आपण यू.व्ही. म्हणू) किरण असतात. ते सूर्यदाह, सनबर्न करतात. सूर्यांची उष्णता शरीराला सहन न झाल्याने उष्माघात होतो. आपण काळजी घेतली नाही, शिस्त लावली नाही तर सूर्य बॅड बॉय होऊ शकतो. सूर्यदाह : कातडीची आग होऊ देऊ नका. यू.व्ही.किरण ढगांतून, हवेतून प्रवास करत आपल्या कातडीवर पडतात. यू.व्ही. किरणांमुळे कातडी भाजल्यासारखी, करपल्यासारखी होते.कातडी गोरी असेल तर सूर्यदाह लवकर होतो. काळी असेल तर उशीर होतो. काळ्या कातडीतील मेलेनिन हे रंगद्रव्य कातडीचे यू.व्ही. किरणांपासून संरक्षण करते. सूर्यदाह झाल्यावर कातडीची आग होते, जळजळ करते. कातडीवर पाणी भरलेले फोड येतात. अशा कातडीवर मोठेपणी सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते. क्वचित मोठेपणी कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. काळजी घेतलेली बरी. सकाळी १० ते ४ सूर्यप्रकाश प्रखर असतो. तेंव्हा अघुतन मधून सावलीत जावे. सनस्क्रीन लोशन लावावे. सनस्क्रीन लोशन ३० किंवा जास्त एस पी एफ चे असावे. एस पी एफ. म्हणजे सन प्रोटेक्टींग फॅक्टर. उन्हात जाण्याच्या १५, २० मिनिट आधी लावावे. शरीराच्या ज्या ज्या भागावर ऊन पडणार त्या त्या भागावर लावावे. दर २ तासांनी लावावे. पोहतांना पाण्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तीत होऊन दुप्पट प्रमाणात कातडीवर पडतात.त्यामुळे पोहतांना व घाम येत असेल तर सनस्क्रीन लोशन जास्त वेळा लावावे. चेहऱ्यावर सावली पडेल अशी टोपी घालावी. हात पाय दिसणार नाहीत असे अपारदर्शक ढिले कपडे घालावे. प्रखर उन्हात यू.व्ही किरण अडवणारे गॉगल घालावे. उष्माघात : पाणी प्या, ओल्या फडक्याने पुसून घ्या. शरीराचं तापमान नियंत्रण करणारा एक थर्मोस्टॅट नावाचं केंद्र मेंदूमध्ये असतं. हवेंचं तापमान वाढलं कि घाम येऊन शरीर थंड केलं जातं. लहान मुलांचं तापमान नियंत्रण केंद्र अपरिपक्व असल्याने ते व्यवस्थित काम करत नाही. पत्ता तापतो, भांडी तापतात तशी मुले तापतात. त्यांना थंड करावं लागतं. उन्हाळ्यात दिवसातून ३,४ वेळा ओल्या फडक्याने पुसून घ्यावे. शर्ट ओला करून पिळून अंगात घालावा. वाळलेल्या कोरडया माठाले पाणी गार होत नाही. वाळलेल्या ओल्या माठाले पाणी गार होते. शरीराला पाणी कमी पडले तरच उन्हाळा बाधतो. पाणी कमी पडले तर उकडून सुद्धा घाम येत नाही. शरीर तापतच जाते. तापाची औषधे (क्रोसिन) शरीर थंड करत नाहीत, घाम आणतात. शुष्कता स्थिती (डीहायड्रेशन) असेल तर तापाच्या औषधांचा गुण येत नाही. म्हणून भरपूर पाणी प्यावे. दिवसातून (चोवीस तासातून) ६ पेक्षा जास्त वेळा लघवी व्हावी. उन्हाळयामुळे, उलटी-जुलाबामुळे, आजारात अन्न पाणी कमी गेल्यामुळेसुद्धा शुष्कता स्थिती येते. उष्माघातामुळे शरीराचं तापमान वाढते. कातडी लाल होते, डोकं दुखतं, चक्कर येते. डोळे खोल जातात. लघवी कमी होते. नाडीचे ठोके वाढतात. दम लागतो. असंबद्ध बडबडणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणं दिसतात. असं काही जाणवलं तर शाळेत किंवा घरात मोठ्या माणसांना सांगायला हवे. उष्माघाताचे निदान योग्य झाले नाही तर टॉयफॉईड, मलेरिया, न्यूमोनिया असे चुकीचे निदान ठोकून औषधांचा मारा होतो. मूळ उष्माघात बाळावतोच राहतो. उष्माघाताच्या मुलाला ओ.आर.एस.(जलसंजीवनी) भरपूर पाजावे. कपडे कमी घालावे. पंखा चालू करावा. ओल्या कपडयाने पुसून घ्यावे. तर मुलांनो, ज्यांना सूर्यदाह आणि उष्माघातापासून स्वतःला वाचवायचे आहे त्यांनी सनस्क्रीन लावावे, पाणी प्यावे, ओल्या फडक्याने पुसावे आणि कूल रहावे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गुड बॉय सूर्य आणि बॅड बॉय सूर्य. Read Post »

Gestational Diabetes & Autism

Gestational Diabetes & Autism

Perinatal Hypoxia & Cerebral Palsy Why this comparison matters Both these pairs connect an early-life exposure to later neurodevelopmental outcomes.They share common downstream biology—oxidative stress and inflammation—yet differ significantly in: Understanding this distinction is essential for both clinical thinking and parental guidance. 1) Nature of Exposure Gestational Diabetes Mellitus (GDM)A chronic intrauterine metabolic environment Perinatal Hypoxia / Hypoxic-Ischemic Encephalopathy (HIE)An acute event 2) Primary Pathophysiology GDM → “Metabolic programming” Net effect:Subtle alterations in Hypoxia/HIE → “Energy failure and injury” Net effect: 3) Pattern of Brain Involvement GDM HIE 4) Clinical Outcomes GDM exposure Phenotype: Hypoxia/HIE Phenotype: 5) Strength of Evidence GDM ↔ Neurodevelopmental outcomes Key point: Good glycemic control reduces risk Hypoxia/HIE ↔ Cerebral palsy 6) Prevention & Clinical Levers GDM pathway Hypoxia pathway 7) A Unifying Teaching Frame “Acute injury vs. chronic programming.” Clinical One-liner “Hypoxia injures the brain; hyperglycemia shapes the brain.” 8) Practical Takeaways – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Gestational Diabetes & Autism Read Post »

Scroll to Top