अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी

Vitamin A

तोंडाने अ जीवनसत्वाचा डोस मुलांना आजारांपासून संरक्षण देतो आणि निरोगी ठेवतो.
भारतात सरकारी आरोग्य सेवा सहा महिन्यांनंतर पाच वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना दर सहा महिन्यांनी अ जीवनसत्वाचा डोस मोफत देते.
ही अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टीची सार्वजनिक आरोग्य सेवा आहे.
पण अनेक मुले खासगी डॉक्टरांकडून लसी घेतात. अशा मुलांना अ जीवनसत्वाचा डोस मिळत नाही.
खरं तर:
• खासगी बालरोग तज्ञांनी सरकारी यंत्रणेकडून अ जीवनसत्वाचा डोस मिळवून मुलांना द्यायला हरकत नाही.
• किंवा बाजारात मिळणाऱ्या अ जीवनसत्वाचा डोस:
o BLUE Capsule — 100000 IU
o RED Capsule — 200000 IU
वापरता येऊ शकतात.
मुलांचे कुटुंब, आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांनी अ जीवनसत्वाचा डोसचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.
ही फक्त “व्हिटॅमिन देणे” इतकी साधी गोष्ट नाही.
ही एक preventive health practice आहे.
ती समाजात सवय आणि संस्कार बनायला हवी.


अ जीवनसत्व म्हणजे “साधं व्हिटॅमिन” नाही. आहे मायक्रोन्यूट्रिअंट, पण बालपणात त्याचे काम फार मोठे आहे.
मूल बाहेरून निरोगी दिसू शकते, पण शरीरात शांतपणे अ जीवनसत्वाची कमतरता वाढत असू शकते.


अ जीवनसत्व कशासाठी आवश्यक आहे?
• दृष्टीसाठी
• रातांधळेपणा टाळण्यासाठी
• रोगप्रतिकारशक्तीसाठी
• वाढीसाठी
• त्वचा व शरीराच्या आतील आवरणांच्या आरोग्यासाठी
• संसर्गातून बरे होण्यासाठी
विशेषतः महत्त्वाचे:
• लहान बाळांसाठी
• वेगाने वाढणाऱ्या मुलांसाठी
• कुपोषित मुलांसाठी
• वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांसाठी


अ जीवनसत्व कुठून मिळते.
प्राणिजन्य पदार्थ:
• यकृत (liver)
• दूध
• चीज
• इतर प्राणिजन्य अन्न
वनस्पतीजन्य पदार्थ:
• गाजर
• भोपळा
• रताळे
• शेवग्याची पाने
• कढीपत्ता
• हिरव्या पालेभाज्या
• पिवळी-केशरी फळे


एक महत्त्वाची गोष्ट:
अ जीवनसत्व शोषण्यासाठी अन्नात थोडे fat आवश्यक असते.
म्हणून:
• फक्त गाजर खाऊन उपयोग नाही
• भाजीत थोडे तेल/तूप असणे उपयोगी ठरते
आपला पारंपरिक भारतीय आहार यासाठी उत्तम आहे:
• डाळ
• भाजी
• थोडे तेल/तूप
• दूध
• पोळी/भात
साधा. व्यावहारिक. वैज्ञानिक.


काही मुलांना Vitamin A deficiency चा धोका जास्त असतो:
• अकाली जन्मलेली बाळे
• कमी वजनाची बाळे
• कुपोषित मुले


Protein malnutrition आणि अ जीवनसत्व यांचा एक लपलेला संबंध आहे.
अ जीवनसत्व रक्तात एकटे फिरत नाही.
तिला “Retinol Binding Protein (RBP)” नावाच्या protein ची मदत लागते.
शरीरात protein कमी असेल तर:
• RBP कमी बनते
• अ जीवनसत्व नीट वाहून नेता येत नाही
• कमतरता निर्माण होते
म्हणजे:
मूल अ जीवनसत्व खात असते,
पण शरीराला ते योग्य प्रकारे वापरता येत नाही.
Nutrition हे एक टीमवर्क आहे — एकट्या nutrient चे काम नाही.


संसर्गाच्या, इन्फेक्शनच्या वेळी अ जीवनसत्व तात्पुरते कमी दिसू शकते.
जसे:
• गोवर
• कांजिण्या
• गालगुंड
• डांग्या खोकला
• Hand Foot Mouth Disease
अशा वेळी शरीरात inflammation वाढते आणि अ जीवनसत्व पातळी खाली जाते.


WHO च्या शिफारसी:
६ ते ११ महिने:
• 100000 IU — BLUE Capsule — एकदा
१ वर्ष ते ५ वर्ष:
• 200000 IU — RED Capsule — दर ६ महिन्यांनी
Vitamin A यकृतात साठवले जाते आणि शरीर ते हळूहळू वापरते.


Vitamin A supplementation मुळे:
• गंभीर आजार कमी होऊ शकतात
• रोगप्रतिकारशक्ती सुधारते
• बालमृत्यू कमी होण्यास मदत होते
एक छोटीशी capsule,
मुलाच्या भविष्यासाठी शांतपणे संरक्षण देत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top