किशोरवयातील वैयक्तिक स्वच्छता : मोठं होण्याची एक खूण [ PERSONAL HYGIENE IN ADOLESCENCE: A SIGN OF GROWING UP]
किशोरवयात शरीरात अनेक बदल घडू लागतात. उंची व वजन वाढते, हार्मोन्स सक्रिय होतात, घामाच्या ग्रंथी अधिक कार्य करू लागतात आणि शरीराला विशिष्ट वास येऊ लागतो.
शरीराला वास येणे हा आजार नाही. तो मोठं होण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे. मात्र वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास हा वास इतरांना अप्रिय वाटू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नकारात्मक छाप निर्माण करू शकतो.
घामाला स्वतःला फारसा वास नसतो. त्वचेवरील जंतू, मृत त्वचापेशी आणि शरीरावरील केस यांच्या संपर्कात घाम आल्यावर वास निर्माण होतो. काखा, जांघेचा भाग, पाय, टाळू आणि त्वचेच्या घड्या याठिकाणी हा वास अधिक जाणवतो.
किशोरवयात शरीराचा वास वाढण्याची काही कारणे:
- हार्मोन्समुळे घामाच्या ग्रंथी अधिक सक्रिय होणे
- काखेतील व जननेंद्रियाभोवती केस वाढणे
- त्वचा व केस तेलकट होणे
- नियमित अंघोळ न करणे
- घामाने भिजलेले कपडे, मोजे किंवा अंतर्वस्त्रे पुन्हा वापरणे
- तोंड, पाय, टाळू व गुप्तांगांची अपुरी स्वच्छता
यावर उपाय अगदी सोपे आहेत:
- दररोज नियमित अंघोळ करा
- खेळून किंवा व्यायामानंतर शरीर स्वच्छ धुवा
- काखा, जांघा, पाय आणि त्वचेच्या घड्या नीट स्वच्छ करा
- केस व टाळू स्वच्छ ठेवा
- रोज स्वच्छ अंतर्वस्त्रे व कपडे वापरा
- मोजे नियमित बदला
- दात व तोंडाची स्वच्छता राखा
- जननेंद्रिय व गुदप्रदेशाची स्वच्छता सांभाळा
- नखे स्वच्छ व लहान ठेवा
लक्षात ठेवा, किशोरवय म्हणजे फक्त उंची वाढणे किंवा आवाज बदलणे नाही. स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवातही याच वयात होते.
लोक आपल्या दिसण्याकडे, बोलण्याकडे, वागण्याकडे लक्ष देतात; पण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष देतात. स्वच्छता आपल्याला फक्त नीटनेटके बनवत नाही, तर इतरांचा विचार करणारी व्यक्ती बनवते.
मोठं होणं म्हणजे फक्त शरीराने वाढणं नाही; तर स्वतःबद्दल जागरूक होणं, इतरांचा विचार करणं आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणं होय.
किशोरावस्था तुमच्या शरीरात बदल आपोआप घडवते;
पण त्या शरीराची जबाबदारी स्वतः स्वीकारता,
तेव्हा खरी परिपक्वता सुरू होते.
PERSONAL HYGIENE IN ADOLESCENCE: A SIGN OF GROWING UP
As children enter adolescence, many physical changes begin to occur. The body grows rapidly, hormones become active, and sweat glands start working more vigorously. One common consequence is increased body odour.
Body odour is not a disease. It is a normal part of growing up. However, if personal hygiene is neglected, it can become unpleasant and affect how others perceive us.
Sweat itself is almost odourless. The smell develops when sweat mixes with bacteria naturally present on the skin, particularly in areas such as the armpits, groin, feet, scalp, and skin folds. Dead skin cells, body hair, and poor hygiene can further contribute to the problem.
Several factors make body odour more noticeable during adolescence:
- Increased activity of sweat glands under the influence of hormones
- Growth of axillary and pubic hair
- Oily skin and scalp
- Long intervals between bathing
- Reusing sweat-soaked clothes, socks, or undergarments
- Poor care of the scalp, feet, teeth, and private parts
Good personal hygiene is simple:
- Bathe regularly, especially after sports or heavy sweating
- Wash the armpits, groin, feet, and skin folds carefully
- Keep the scalp and hair clean
- Wear clean undergarments and fresh clothes every day
- Change socks regularly
- Maintain proper oral hygiene
- Pay attention to genital and perianal cleanliness
- Keep nails trimmed and clean
As you grow from a child into a young man or woman, personal hygiene becomes your own responsibility. Parents can remind you, but ultimately self-care must come from within.
People notice our appearance, our behaviour, our speech—and yes, even our personal hygiene. Cleanliness does not make a person great, but it makes a person pleasant, presentable, and respectful of those around them.
Growing up is not only about becoming taller and stronger. It is also about becoming more aware of yourself, more considerate of others, and more responsible for your own well-being.
PUBERTY CHANGES YOUR BODY AUTOMATICALLY.
MATURITY BEGINS WHEN YOU LEARN TO TAKE CARE OF THAT BODY YOURSELF.
– Dr. Anil Mokashi (Pediatrician)
MBBS, MD, DCH, FIAP, PhD
(Child Growth and Development)


