लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न

LMG–001. लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न

लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी – समंजस, जबाबदार आणि कामाचा माणूस.

१. लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न

चौथीत शिकणारा छोटासा मॉन्टी रॉबर्ट.

एकदा शिक्षिकेनी वर्गात निबंध लिहायला विषय दिला, “मोठेपणी तुम्ही कोण होणार?”
कोणी लिहिलं – डॉक्टर. कोणी – इंजिनिअर. कोणी – शिक्षक. कोणी – अधिकारी.

मॉन्टीनी मात्र वेगळंच लिहिलं.
“मी मोठेपणी २०० घोड्यांच्या तबेल्याचा मालक होणार. त्या घोड्यांसाठी ४०० एकर हिरवंगार कुरण असणार.”

शिक्षिकेनी निबंधावर मोठ्ठं ‘नापास’ लिहिलं.
त्या म्हणाल्या, “मॉन्टी, तुझे वडील साधे घोड्यांना प्रशिक्षण देतात. तुमची आर्थिक परिस्थितीही साधी आहे. एवढं मोठं स्वप्न खरं होणार नाही. निबंध पुन्हा लिही.”

मॉन्टी शांतपणे म्हणाला,
“मॅडम, निबंध मी बदलू शकतो… पण माझं स्वप्न सोडणार नाही.”

वर्षे लोटली.
एके दिवशी त्याच शिक्षिका विद्यार्थ्यांना घोड्यांचा मोठा स्टड फार्म दाखवायला घेऊन गेल्या.

फाटकावर नाव होतं—
“मॉन्टी रॉबर्ट स्टड फार्म”

आत २०० घोडे होते. भोवताली शेकडो एकर हिरवंगार कुरण होतं.
शिक्षिका हसल्या आणि म्हणाल्या,
“मॉन्टी, बरं झालं… तू तुझं स्वप्न सोडलं नाहीस.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top