चंद्रावर पोचलेला भारत : Chandrayaan-3 ची गोष्ट
भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर पोचलं — हे तुम्हाला माहीतच असेल.
पण काही मूळ प्रश्न पडतात…
मानवाने चंद्रावर जायचं तरी कशाला?
उत्तर — नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी आणि विज्ञान पुढे नेण्यासाठी.
काय गरज आहे चंद्रावर जायची?
उत्तर — पृथ्वी, अवकाश आणि विज्ञान या भविष्यातील महत्त्वाच्या ज्ञानशाखा आहेत. त्या अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी.
भारताने एवढा खटाटोप, एवढा खर्च का करायचा?
उत्तर — अवकाश विज्ञानाच्या स्पर्धेत भारत आघाडीवर राहावा म्हणून. स्वतःच्या बळावर विज्ञानात प्रगती करण्यासाठी आणि देशाची उंची वाढवण्यासाठी.
आता ऐका चांद्रयान-३ ची रोमांचक गोष्ट…
एक छोटं रॉकेट उभं होतं.
त्यात भारताची मोठी स्वप्नं होती.
स्थान — श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश.
Satish Dhawan Space Centre मधून.
तारीख — १४ जुलै २०२३.
सगळे श्वास रोखून पाहत होते…
३… २… १…
प्रक्षेपण झालं!
रॉकेट आकाशात झेपावलं.
वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावर आनंद होता.
पण प्रवास सोपा नव्हता…
हळूहळू ते चंद्राजवळ पोहोचत होतं.
सगळ्यांचे डोळे स्क्रीनवर खिळले होते.
तारीख — २३ ऑगस्ट २०२३.
इतिहास घडला.
चांद्रयान-३ चंद्रावर उतरलं.
तेही दक्षिण ध्रुवाजवळ!
भारताने नवा विक्रम केला.
सगळे आनंदाने ओरडले —
“आपल्या भारताने करून दाखवलं!”
We did it… We did it!
संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं.
भारताची विज्ञानातील झेप सर्वांना दिसली.
परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम घडला.
भारताची मान उंचावली.
या यशामागे अनेक शास्त्रज्ञ होते.
S. Somanath
P. Veeramuthuvel
S. Mohana Kumar
त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली.
भारताचे पंतप्रधान
Narendra Modi
यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले —
“हे नवीन भारताचे पाऊल आहे.”
सगळ्यांच्या डोळ्यांत आनंद होता.
भारत माता की जय!
वंदे मातरम!
जय हिंद!
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


